संच मान्यता 2025 - 2026
आधार वैध झालेले विद्यार्थी संख्या ग्राहय असणार
सन २०२५-२६, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यता
: १. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग यांची राज्यस्तरीय आढावा बैठक दिनांक ३०.०५.२०२५
२. शासन निर्णय क्रमांक एसएसएन २०१५/(प्र.क्र.१६/१५)/टिएनटी-२, दिनांक १५.०३.२०२४
संच मान्यता 2025 - 2026
सन २०२५-२६ प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यता करणेबाबत
1) सन 2025 26 ची संच मान्यता कशी होणार?
2) संच मान्यतेसाठी कोणती तारीख ग्राह्य धरली जाणार?
3) संच मान्यतेपूर्वी आपणाला पोर्टल वरती कोणकोणती कामे पूर्ण करावी लागणार?
4) मुदतीत संच मान्यता करण्यासाठी शाळा लॉगिन करावयाची कामे कोणती?
सविस्तर वाचा
➤ उपरोक्त विषयास अनुसरुन आपणांस कळविण्यात येत आहे की, सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून सरल पोर्टल व युडायस प्लस या दोन्ही पोर्टलवरील माहिती वेगवेगळी न भरता ती एकाच पोर्टलला भरण्याची सुविधा दिलेली आहे. त्यानुसार युडायस प्लस पोर्टल वरच विद्यार्थी माहिती पूर्ण करण्यात यावी.
संच मान्यतेसाठी ऑनलाईन प्रणालीमध्ये यु-डायस प्लस वरील माहितीच्या आधारे संच मान्यता करण्यात येणार असल्याचे दिनांक ३०.०५.२०२५ रोजीच्या बैठकीत सूचना देण्यात आल्या होत्या.
➤ सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाची रांच मान्यता दिनांक ३०, सप्टेंबर २०२५ अखेरची पटावरील नोंद झालेल्या पैकी आधार वैध विद्यार्थी संख्या विचारात घेवून संच मान्यता करण्यात येणार आहेत.
दिनांक ३०.०९. २०२५ नंतर आधार वैध झालेले विद्यार्थी संख्या व नव्याने नोंदणी झालेली विद्यार्थी संख्या संच मान्यता अथवा संच मान्यता दुरुस्तीसाठी ग्राहय धरण्यात येणार नाही.
सन २०२५-२६ या वर्षाची संच मान्यता करताना ३० सप्टेंबर २०२५ अखेरची पटावरील नोंद विचारात घेताना विद्यार्थी वयानुरुप वर्गात प्रवेश घेतलेला असेल याची खात्री करण्यात यावी.
➤ शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) व गटशिक्षणाधिकारी यांनी संच मान्यतेच्या अनुषंगाने पटावरील विद्यार्थी नोंदी आधार वैध पडताळणीचे कामकाज दिनांक ३०, सप्टेंबर २०२५ अखेर किंवा दिनांक ३०.०९.२०२५ च्या तत्पुर्वी पूर्ण करण्यात यावेत.
अधिकचा कालावधी देता येणार नाही याची दक्षता घ्यावी ही बाब आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांच्या निदर्शनास तातडीने आणन द्यावी, असे शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे
What's Up Group Join
➤ What's Up Group Join


आपली प्रतिक्रिया व सूचना