Ads Area

PAT Two First Term Exam Time Table Available For Download

समग्र शिक्षा प्रकल्प अंतर्गत सन २०२५ २६ या शैक्षणिक वर्षात नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) मधील संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT २) च्या आयोजनाबाबत....

संदर्भ : प्रस्तुत कार्यालयाचे पत्र जा. क्र. राशैसंप्रपम/मूल्यमापन/पा.चा. जिल्हा पत्र/२०२५-२६/SCERT ३८.०/२९/२०२५ - EVALUATION १/१३१९४६९/२०२५ दिनांक ०९/०७/२०२५.

उपरोक्त संदर्भीय विषयान्वये सन २०२५ २६ या शैक्षणिक वर्षात इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी १ व संकलित मूल्यमापन चाचणी २ अशा तीन नियतकालिक चाचण्यांचे नियोजन करण्यात येत आहे. 

नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत संकलित चाचणीचे आयोजन दिनांक १० ते १३ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत करण्यात येत आहे.

सदर चाचणी अंतर्गत प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांच्या इयत्ता दुसरी ते आठवीतील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा तसेच खाजगी अनुदानित शाळातील विद्यार्थ्यांची चाचणी होणार आहे.

प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्तानिहाय अपेक्षित अध्ययन संपादणूक प्राप्त केली आहे किंवा नाही याची पडताळणी होऊन अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास या चाचणीमुळे शिक्षकांना मदत होईल. सदर चाचण्या इयत्ता १० वी व १२ वी बोर्ड परीक्षेप्रमाणे नाहीत, यामुळे विद्यार्थ्यांना याचा अतिरिक्त ताण देऊ नये. चाचण्यांचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांनी अध्ययन निष्पत्ती किती प्रमाणात प्राप्त केलेल्या आहेत हे शिक्षकांनी लक्षात घेऊन गरजेनुरूप अध्ययन अध्यापन प्रक्रियेत मूलभूत सुधारणा करणे व कृती-कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे हा आहे.

➤ संकलित मूल्यमापन -१ चाचणी उद्देश/उपयोग/फायदे :-

१) अध्ययनाचे मूल्यमापन या तत्वाकडून अध्ययनासाठी मूल्यमापन या तत्वाकडे वळणे,

२) विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पती संपादणूक पड़ताळणे व त्यामध्ये वाढ करणे,

३) अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास मदत करणे.

४) राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (NAS) मधील संपादणूक वाढविण्याच्या दृष्टीकोनातून मदत करणे.

५) अध्ययनात मागे असणा-या विद्यार्थ्यांना पुढे नेण्याच्या दृष्टीकोनातून कृतिकार्यक्रम तयार करणे व अंमलबजावणीस दिशा देणे.

६) इयत्ता व विषयनिहाय अध्ययन निष्पत्तीमधील राज्याची संपादणूक स्थिती समजण्यास मदत होणे.

 ➤ नियतकालिक मूल्यांकन चाचण्या (PAT) कालावधी

अ. क्र. तीन नियतकालिक मूल्यांकन चाचणी प्रकार

कालावधी

१.संकलित मूल्यमापन चाचणी, सत्र - १

दिनांक १० ते १३ ऑक्टोबर २०२५

२.संकलित मूल्यमापन चाचणी,

माहे एप्रिल २०२६ (संभाव्य)

सत्र २

संकलित मूल्यमापन चाचणी १ चे माध्यम व विषय :

सदर चाचणी ही एकूण दहा माध्यमात होईल, प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या तीन विषयांची इयत्ता २ री ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी चाचण्यांचे आयोजन करण्यात येणार आहे.

➤संकलित चाचणी- १ चा अभ्यासक्रम:

प्रचलित पद्धतीनुसार भाषा, गणित व इंग्रजी करिता प्रथम संत्रात अभ्यासक्रम / अध्ययन निष्पत्ती/

मुलभूत क्षमता यावर आधारित असेल

संकलित मूल्यमापन चाचणी १ चे वेळापत्रक (कालावधी दिनांक १० ते १३ ऑक्टोबर २०२५)

अ.क्र. विषय इयत्ता चाचणी दिनांक व वेळ लेखी परीक्षा

वेळापत्रक डाऊनलोड करा 

वेळापत्रक 

शासन परिपत्रक 

उत्तर सूची खालील WhatsApp Group  वर मिळेल 

What's Up Group Join 

➤ What's Up Group Join 

What's Up ग्रुप जॉईन करा
WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad