इ. ५ व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा
अंतरिम निकाल जाहीर !आयुक्त
राज्य परीक्षा परिषद पुणे
Scholarship Exam Result 2022
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इ. ५ वी) ,पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) निकाल 2022
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे मार्फत दिनांक ३१ जुलै, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इ. ५ वी), शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) चा अंतरिम (तात्पुरता) निकाल सोमवार, दिनांक ०७ नोव्हेंबर २०२२ रोजी सायं. ०६.०० वाजता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अधिकृत वेबसाईट वर निकाल जाहीर करण्यात आला आहे
आपला निकाल पाहण्याकरिता
खालील लिंक वर क्लिक करा
विद्यार्थ्याकरिता Login
विद्यार्थ्यांनी आपला रोल नंबर टाकून निकाल पहा
खालील लिंक वर क्लिक करा
www.mscepune.in व https://www.mscepuppss.in
या परिषदेच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात येत आहे.
शाळांना आपल्या विद्यार्थ्याचा निकाल त्यांच्या लॉगीनमधून तसेच पालकांना आपल्या पाल्यांचा निकाल संकेतस्थळावर पाहता येईल.
गुणपडताळणी
विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करुन घ्यावयाची असल्यास संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये दिनांक ०७/११/२०२२ ते १७/११/२०२२ या कालावधीत ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपरकरीता रु. ५०/ याप्रमाणे शुल्काची रक्कम ऑनलाईन पेमेंटद्वारे भरणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, शहरी / ग्रामीण, अभ्यासक्रम इत्यादीमध्ये दुरुस्तीसाठी
दिनांक १७/११/२०२२ पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
सदर अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पध्दतीने पाठविल्यास स्वीकारले जाणार नाहीत.
विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
आवश्यक शुल्कासह
विहित मुदतीत आवश्यक शुल्कासह ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जानुसार गुणपडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये अर्ज प्राप्त झाल्यानंतर ३० दिवसांपर्यंत कळविण्यात येईल.
विहित मुदतीत ऑनलाईन आलेले गुणपडताळणी अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल, असे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे
M1210607166
ReplyDeleteM5210509190
ReplyDeleteM5210508190
ReplyDeleteH1210660042
ReplyDeleteआपली प्रतिक्रिया व सूचना