Intra District Teacher Transfer New Information

जिल्हातंर्गत बदली अपडेट

बदली प्रक्रिया नवीन माहिती

दिनांक 12 नोव्हेंबर 2022 रोजी अपडेट

जिल्हा परिषदेतील शिक्षक संवर्गाच्या सन २०२२ मधील जिल्हांतर्गत बदल्यांबाबत......

जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत / आंतरजिल्हा बदल्यांसाठी संदर्भीय

 दिनांक ०७.०४.२०२१ च्या दोन स्वतंत्र शासन निर्णयान्वये सुधारित धोरण विहित करण्यात आले आहे. सदर धोरणातील तरतूदीनुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत (बदलीस पात्र असलेल्या / विशेष संवर्ग भाग-१ मधील / विशेष संवर्ग भाग-२ मधील शिक्षकांची यादी, निव्वळ रिक्त पदांची यादी, संभाव्य रिक्त पदांची यादी, जिल्ह्यातील अवघड क्षेत्र घोषित करणे, इत्यादी) वेळोवेळी आपणास शासन स्तरावरुन निर्देश देण्यात आलेले आहेत.

२. शासनाच्या संदर्भीय क्र. २) येथील दिनांक ०७.०४.२०२१ च्या शासन निर्णयान्वये विहीत करण्यात आलेल्या सुधारित धोरणानुसार जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात आली आहे. आता, शासनाच्या संदर्भीय क्र. १) येथील शासन निर्णयान्वये विहीत करण्यात आलेल्या सुधारित धोरणानुसार जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतची कार्यवाही सुरु करण्यात येणार आहे. सदर शासन निर्णयात नमूद केल्यानुसार बदलीस पात्र असलेल्या शिक्षकांना विवरण पत्र - १ बदलीस पात्र शिक्षक' मध्ये (पृष्ठ क्र. १७ वर नमूद केल्याप्रमाणे अ) (मला बदली नको असून प्रशासकीय बाबीमुळे माझी बदली होत असल्यास, बदलीने नियुक्तीसाठी माझा खालील प्राधान्यक्रम विचारात घ्यावा) किंवा आ) (मला बदली हवी असून विनंतीने बदलीसाठी माझा खालील प्राधान्यक्रम विचारात घ्यावा) या पर्यायापैकी एक पर्याय निवडण्याची मुभा असून अशा शिक्षकांनी कोणताही पर्याय न निवडल्यास संबंधित शिक्षक प्रशासकीय बदलीसाठी पात्र राहतील, अशी तरतूद आहे.

३. जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबत दिनांक ०७/१०/२०२२ रोजी जिल्हा परिषद शिक्षक बदली अभ्यास गटासमवेत व्हीसीद्वारे बैठक आयोजित केली होती. सदर बैठकीतील चर्चेच्या अनुषंगाने जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीबाबतच्या संदर्भीय क्र.१) येथील दिनांक ०७/०४/२०२१ च्या शासन निर्णयाचे विवरण पत्र -१ बदलीस पात्र शिक्षक" बाबत खालीलप्रमाणे अधिकचे स्पष्टीकरण देण्यात येत आहे :-

जर एखाद्या शिक्षकांने सदर विवरण पत्र १ मध्ये नमूद केलेला उक्त अ) येथील पर्याय निवडल्यास, अशा शिक्षकांच्या प्रशासकीय बाबीमुळे होत असलेल्या बदलीवेळी उपलब्ध असलेल्या रिक्त जागी, अशा शिक्षकांची बदली होईल. सदर बदली पूर्णतः प्रशासकीय असल्याने अशा शिक्षकांना त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार व सेवाजेष्ठतेने बदली मिळेलच असे नाही. मात्र, जर एखाद्या शिक्षकाने सदर विवरण पत्र - १ मध्ये नमूद केलेला उक्त आ) येथील पर्याय निवडल्यास अशा शिक्षकांना त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार व सेवाजेष्ठतेने बदली मिळू शकेल.

४. सदर बाब जिल्हांतर्गत बदलीचे ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी संबंधित गट शिक्षण अधिकारी, पंचायत समिती यांच्यामार्फत सर्व शिक्षकांच्या निदर्शनास आणावी व त्याबाबतची पोच संग्रही ठेवावी, ही विनंती.

@@@@@@@@@@@@@@@

दिनांक 11 नोव्हेंबर 2022 रोजी अपडेट

संवर्ग 1

संवर्ग 2 

फार्म कसे भरावे संपूर्ण मार्गदर्शन

जिल्हातंर्गत बदली अपडेट


➡️ व्हिन्सीस कडुन जिल्हांतर्गत बदलीसाठीच्या बदलीपात्र शिक्षक, बदली अधिकारप्राप्त शिक्षक याद्या  राज्यातील सर्व मा.EO लॉगिनवर उपलब्ध करून  दिलेल्या आहेत. सदर याद्या जिल्हा स्तरावरून जिल्हा शिक्षण विभागाकडून लवकरच शिक्षकांसाठी जिल्हा निहाय  प्रदर्शित करण्यात येतील.

➡️ लवकरच  नवीन वेळापत्रक शासनस्तरावरून निर्गमित होण्याची शक्यता आहे.

➡️ जिल्हा अंतर्गत बदल्या बाबत राज्य सरकार कडून दिलेली अपडेट.

➡️ राज्य सरकारने  दिलेल्या आदेशानंतर बदल्यांची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीसाठीचे पोर्टल 
दिनांक 5 नोव्हेंबरपासून सुरू होणार होते बदल्यांच्या वेळापत्रकामध्ये किरकोळ बदल करून  बदल्यांची ही प्रक्रिया दिनांक 5 जानेवारी 2023 पर्यंत पूर्ण करणे अपेक्षित आहे

➡️ बदली पात्र शिक्षकांच्या याद्या व बदली अधिकार पात्र शिक्षकांच्या याद्या जाहीर झाल्यानंतर संवर्ग 1 व संवर्ग 2 ला होकार किंवा नकार देण्यासंदर्भात तारखा जाहीर होतील

➡️ संवर्ग 1 व संवर्ग 2 च्या याद्या संवर्ग 1 व संवर्ग 2 च्या शिक्षकांनी होकार किंवा नकार दर्शविल्यानंतरच जाहीर होतील

➡️ खालील प्रक्रिया संभाव्य तारखांमध्ये सुरू होऊ शकते

➡️ दिनांक 24 ते 26 नाव्हेंबरपर्यंत विशेष संवर्ग 1 मध्ये येणाऱ्या शिक्षकांनी होकार दर्शविल्यास तीन दिवसांत पोर्टलवर 1 ते 30 किंवा आपल्या आवश्यकतेनुसार पसंतीक्रम नोंदवता येईल*

➡️ *संवर्ग भाग 1 च्या शिक्षकांना पसंती क्रमानुसार शाळा न मिळाल्यास,  पूर्वीचीच शाळा कायम राहील.

➡️ *विशेष संवर्ग भाग-2 साठी प्राधान्यक्रम भरण्याची मुदत 1 ते 12 डिसेंबरपर्यंत राहील.

➡️ *त्यामध्ये 30 शाळांचा प्राधान्यक्रम नोंदवता येईल. प्राधान्यक्रमानुसार शाळा न मिळाल्यास, विशेष संवर्ग भाग 2 मधील शिक्षकांची बदली होणार नाही. त्यांची पूर्वीचीच शाळा कायम राहील.

➡️ *तसेच ज्या शिक्षकांना बदली अधिकार प्राप्त आहेत, त्यांना 8 ते 12 डिसेंबरपर्यंत प्राधान्यक्रम भरता येणार आहे

 ➡️ *30 शाळांचा प्राधान्यक्रम 3 दिवसांत ऑनलाइन पोर्टलवर नोंदवावा लागणार आहे.

➡️ *दरम्यान, बदली नको असल्यास, तसेच बदलीपात्र शिक्षक नसल्यास, प्राधान्यक्रम न भरल्यास शिक्षकाची बदली होणार नाही - असे शासनाकडून कळविण्यात आले आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad