Ads Area

Internet Speed In Marathi

Internet Speed In Marathi

*मोबाईल इंटरनेटचा स्पीड वाढविण्यासाठी काही सोपे उपाय*

आपल्याला Online काम करताना Internet ची आवश्यकता असते तेव्हा आपल्याला Internet Speed खुप गरजेचे असते.

सदर  उपायांनी होईल समस्येपासून सुटका .
अँड्रॉईड मोबाईलच्या इंटरनेटला स्पीड मिळत नाही म्हणून अनेकांची काम होत नाही.अगदी  कामाच्या वेळी इंटरनेटचा स्पीड कमी झाल्यास काय करावे ते सुचत नाही.

 अगदी ३ जी किंवा ४ जी इंटरनेट असेल तरीही योग्य तो स्पीड न मिळाल्याने आपल मन लागत नाही . परंतु आता आपण महत्त्वाचे सोपे उपाय केल्यास या समस्येपासून नक्कीच सुटका होऊ शकते.
तर पाहु इंटरनेट स्पीड मिळविण्याच्या खास महत्त्वाचे टिप्स त्या आपण पाहू या…

Internet Speed In Marathi

१.💥  *अनावश्यक ॲप  अनइन्स्टॉल* 

अनेकदा आपण जेव्हावेळेस आवश्यक असणारी अॅप्लिकेशन्स डाऊनलोड करतो. परंतु त्या नंतर ती अॅप्स अजिबात उपयोग करीत नाही. पण ज्या अॅप्सची तुम्हाला जे मोबाईल ॲप आपण वापरतो तेच मोबाईल अप्लिकेशन ठेवा  मोबाईलमध्ये जास्त अॅप्स असतील तर त्याचा इंटरनेटच्या स्पीडवर परिणाम होतो.
म्हणून जे ॲप आपण वापरत नाही ते अनइन्स्टॉल करा
आता आपले मोबाईलची इंटरनेटचे स्पीड वाढेल

२. 💥 *प्रिफर नेटवर्क सेट करा*

 आपल्याला मोबाईलवर किती स्पीडचे इंटरनेट वापरायचे आहे हे तुम्ही ठरवू शकता. त्यानुसार मोबाईल ४ जी पर्यंत सपोर्ट करत असेल तर जास्तीत जास्त स्पीडचे इंटरनेट वापरल्यास तुमचे सर्फींग सोपे होईल. त्याकरीता सेंटींग करा ३ जी आणि ४ जी नेटवर्कचा पर्याय निवडा आणि तो वापरा.

३. 💥 *फास्ट ब्राऊजर* 

 आपल्याला नेहमीच ऑनलाइन काम असेल किंवा ब्राउझर वर नेट सर्च असेल तर आता चांगल्या प्रतीचे Application प्ले स्टोर ला उपलब्ध आहे
प्ले स्टोअला खूप मोठा प्रमाणावर चांगले ब्राऊजर असतात ज्यामुळे तुम्ही इंटरनेटचा स्पीड वाढवू शकता. चांगले  Application म्हणजे *ओपेरा मिनी*, *यूसी ब्राऊजर*, *क्रोम* यांचा समावेश आहे. याशिवाय प्ले स्टोर तून कोणतंही अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यापूर्वी ते कोणत्या ब्राऊजरमधून होतंय याकडे आवर्जून लक्ष द्यावे जेणेकरून मोबाईल इंटरनेट ला स्पीड येईल.

४. 💥 *ब्राऊजर मोडमध्ये टेक्स  मोडनिवडा*

  आपण जेव्हा गुगल सर्च करताना तुम्हाला केवळ टेक्स्ट सर्च करायचा असेल आणि इमेजेसची गरज नसेल तर अॅपच्या सेटींग्जमध्ये जाऊन टेक्स मोड निवडा. कारण इमेजला इंटरनेटची स्पीड जास्त लागते टेक्स्ट ला  इंटरनेट ची स्पीड कमी लागते
 त्यामुळे इंटरनेटचा स्पीड वाढण्यास चांगली मदत होईल.

५. 💥 *Cache क्लिअर करा*

आपण ब्राऊझर वर सर्च जास्त करीत असेल तर आपल्या मोबाईल मध्ये प्रत्येक वेबसाईटचे Cache
 तयार होते त्यामुळे इंटरनेट स्पीड कमी होते
स्पीड कमी मिळत असेल, तर मोबाईलचे ब्राउझर चे *cache* क्लीअर करा
ज्याप्रमाणे कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपची cache मेमरी क्लिअर करतो त्याचप्रमाणे मोबाईलचीही cache क्लिअर करणे आवश्यक असते. याशिवाय मोबाईलचे इंटरनेटचे स्पीड वाढणार नाही
 तसेच cache मेमरी जास्त झाली की इंटरनेटचा स्पीड कमी होते त्यामुळे वेळच्या वेळी cache क्लिअर करत राहा.
या कारणाने आपल्या मोबाईलची व ब्राउझर चे पेज रिफ्रेश होईल यामुळे ब्राउजर ची हिस्ट्री क्लिअर झाल्याने स्टोरेज कमी होईल याचा फायदा मोबाईल इंटरनेट स्पीड वाढविण्याकरीता
 होईल
या  पोस्टातील सर्व व महत्त्वाचे उपायोजना केले तर नक्कीच आपल्या मोबाईलचे इंटरनेटचा स्पीड वाढेल.
वरील सर्व टिप्स आपण उपयोगात आणले तर आपल्या मोबाईलचे स्पीड वाढून आपले ऑनलाईन काम तसेच ऑनलाइन माहिती सर्च लवकर होईल.


 

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad