Adhyayan Nishpati
Utara Vachan
अध्ययन निष्पती
मला पंख फुटले तर, मी खूप खूप उंच भरारी मारेन,
पतंगाप्रमाणे आकाशात इकडून तिकडे गिरक्या मारून, गरुड, घार इत्यादी पक्षांबरोबर पाठशिवणीचा खेळ खेळताना तर किती मज्जा येईल !
सारेच माझ्याकडे अचंबित होऊन पाहतील. वर्तमानपत्रात पहिल्या पानावर 'पक्ष्यांप्रमाणे झेपावणारा मुलगा' या शीर्षकाखाली बातमी येईल
. मग काय जाईल तिकडे माझीच चर्चा. कोणी म्हणेल नव्या युगातील 'वीर हनुमान' तर कोणी म्हणेल 'स्पायडर मॅन'.मला पंख फुटले तर शाळेला जाताना सायकल थोडीच न्यावी लागणार !
पक्ष्यांप्रमाणे सुर्रकन उडत येऊन शाळेत दाखल होईन. वाटेत भेटणाऱ्या मित्रांना कोंबडीच्या पिलाप्रमाणे पायात पकडून त्यांना शाळेत आणून सोडेन
शाळेत गेल्यावर सारे मित्र माझ्याच भोवताली गोळा झालेले असतील. त्यांना मी आकशात झेपावताना उंच भरारी मारताना येणारे चित्तथरारक अनुभव सांगेन.
सुटीत मामाच्या गावी जायला वाहन थोडेच लागणार ! त्यामुळे पेट्रोलची बचत. पैशाची बचत आणि प्रदूषणापासून सर्वांची मुक्तता.
हे सारे तेव्हा घडेल, जेव्हा मला पंख फुटतील ......


आपली प्रतिक्रिया व सूचना