विद्यार्थी शिष्यवृत्ती रक्कम पहा
PFMS प्रणाली
Student Scholarship Amount
Student Scholarship Bank Statement
आपल्या शाळेतील विद्यार्थी शिष्यवृत्ती करिता आपण दरवर्षी विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती फार्म Online भरतो
पण विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रक्कम जमा होते की नाही हे आपल्याला माहीत होत नाही मग अशावेळी काय करावे
तसेच शाळेत पालक शिष्यवृत्ती रक्कम विषयी वारंवार विचारणा करतात त्यावेळेस आपल्याला ही पद्धत माहीत असायला हवी
आता पण बँकेत न जाता विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रक्कम आपल्या मोबाईलवर आपल्याला पाहता येईल
या पद्धतीला PFMS प्रणाली म्हणतात
या मार्फत विद्यार्थी शिष्यवृत्ती रक्कम बँकेत जमा झाली की नाही याबाबत पाहता येते
त्याकरिता खालील वेबसाईटवर क्लिक करा
PFMS प्रणाली वेबसाईट
आता Website Dashboard ओपन होईल त्यात बँकेचे नाव टाका
त्यानंतर बँकेचे नाव आपोआप येईल
बँकेची नावावर क्लिक करा
आता विद्यार्थ्यांचे अकाउंट नंबर टाकावे
संपूर्ण प्रक्रिया झाल्यावर Search करुन Download करा
किंवा
विद्यार्थ्यांचे Application NSP ID टाकून Search वर क्लिक करा
आता खाली विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती रक्कम दिसेल
आतापर्यंत विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रक्कम जमा झाली असेल तर आपल्याला खालील Bank Statement दिसेल
वरील प्रमाणे सर्व विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रक्कम जमा झाली की नाही हे वर्ग शिक्षक सुद्धा आपल्या मोबाईलवर पाहू शकता
जर विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रक्कम जमा झाली नसेल तर विद्यार्थ्यांचा फॉर्म NSP वेबसाईटवरुन विड्रॉल करावे त्यानंतर विद्यार्थ्यांचे नवीन फॉर्म भरावे


आपली प्रतिक्रिया व सूचना