पाठ्यपुस्तकांचा पूनर्वापर करणे
पाठ्यपुस्तकाांचा पुनर्वापर
करण्याबाबत.
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण र्व क्रीडा विभाग
शालेय विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील पयार्वरणाचे महत्त्व समजार्वे या उद्देशाने
विद्यार्थ्यांना त्यांच्या शालेय अभ्यासक्रमात "पयार्वरण" या विषयाचा समावेश केला आहे.
तसेच, कृतीयुक्त शिक्षणसाठी त्याांच्या गावातील पयार्वरणाच्या संरक्षणासाठी उपक्रम राबविले येतात.
पयार्वरण जतनासाठी "वापर कमी करणे, पुन्हा वापर करणे, पुनर्वापर करणे (Reduce, Re-use, Re-Cycle)" ही संकल्पना मुलांना शिकविले जाते. सदर
संकल्पना एक भाग म्हणून पाठ्यपुस्तकाचे प्रायोगिक तत्वावर पुनर्वापर करण्याची योजना
राबविणे बाब शासनाच्या विचाराधीन होती.
समग्र शिक्षा योजनेअंतर्गत इयत्ता 1 ली ते 8 र्वी तील विद्यार्थ्यांना दरवर्षी
मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येते.
विद्यार्थ्यांना दरवर्षी सुमारे रू.200 कोटी पेक्षा जास्त
खर्च येतो. शालेय विद्यार्थ्यांना
दरवर्षी वाटप केलेल्या पाठ्यपुस्तकाांपैकी काही विद्यार्थी पाठ्यपुस्तकांची
योग्य रीतीने जपणूक करतात व त्यांना सुस्थितीत ठेवतात, अशा पाठ्यपुस्तकांचे संकलन करुन त्याचा पुनर्वापर केल्यामुळे पुढील वर्षी त्याचे फेरर्वाटप करणे शक्य होते. पुस्तकाचा
पुनर्वापर केल्याने काही प्रमाणात कागदाची बचत होईल. शैक्षणिक वर्षापासून 2021 मध्ये प्रायोगिक तत्त्वावर पाठ्यपुस्तकांचे पुनर्वापर करण्याचा पर्थदर्थी (Pilot) प्रकल्प राबविण्याचे शासनाने
ठरविले आहे.
समग्र शिक्षा योजनेअंतर्गत शशक्षा ज्या शाळेत शासनामार्फत मोफत पाठ्यपुस्तक योजना राबवली
जाते अशा शाळेतील मुलांना सर्व पालकांना आवाहन करण्यात येते की, त्याांनी जुनी
(सन 2019-20 व 2020-21 मध्ये) वापरलेली पाठ्यपुस्तके त्याांच्या शाळेत जमा करावी ही
ऐच्छिक योजना राहील. यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तकेे सुस्थितीत ठेवण्याची सवय लागेल
सध्या शाळा बंद असल्यामुळे, सदर उपक्रम जेव्हा शाळा
सुरू होतील तेव्हा राबविण्यात यावे, पाठ्यपुस्तके जमा झाल्यानंतर सदर पुस्तकाची वर्गवारी करण्यात यावे
हा एक चांगला उपक्रम आहे
पाठ्यपुस्तकांचा पुनर्वापर करण्याबाबत.
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
शासन परिपत्रक क्रमांकः बालभ-२०२०/प्र.क्र.१२९/एस.डी.३ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२
दिनांक:०८ डिसेंबर,२०२०
पार्श्वभूमी
शालेय विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील पर्यावरणाचे महत्व समजावे या उद्देशाने विद्यार्थ्यांना त्यांच्या शालेय अन्यासक्रमात "पर्यावरण" या विषयाचा समावेश केला आहे. तसेच, कृतीयुक्त शिक्षणासाठी त्यांच्या गावातील पर्यावरणाच्या संरक्षणासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात.
पर्यावरण जतनासाठी वापर कमी करणे, पुन्हा वापर करणे, पुनर्वापर करणे (Heduce, Ra-use, Re-Cycle)" ही संकल्पना मुलांना शिकविली जाते. सदर संकल्पनेचा एक भाग म्हणून पाठ्यपुस्तकांचे प्रायोगिक तत्वावर पुनर्वापर करण्याची योजना राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
समग्र शिक्षा योजनेतर्गत इयत्ता १ ली ते ८ वी तील विद्याच्यांना दरवर्षी शासनाकडून मोफत पाठयपुस्तकांचे वाटप करण्यात येते. यासाठी दरवर्षी सुमारे रू.२०० कोटी पेक्षा जास्त खर्च येतो.
शालेय विद्याध्यांना वाटप केलेल्या पाठ्यपुस्तकांपैकी काही विद्यार्थी पाठ्यपुस्तकांची योग्य रितीने जपणूक करतात व त्यांना सुस्थितीत ठेवतात,
अशा पाठ्यपुस्तकांचे संकलन करुन त्याचा पुनर्वापर केल्यामुळे पुढील वर्षी त्याचे फेरवाटप करणे शक्य होते.
पुस्तकाचा पुनर्वापर केल्याने काही प्रमाणात कागदाची बचत होईल. शैक्षणिक वर्ष २०२१ मध्ये प्रायोगिक तत्वावर पाक्यपुस्तकांचे पुनर्वापर करण्याचा पथदर्थी (Pilot) प्रकल्प राबविण्याचे शासनाने ठरविले आहे. परिपत्रक
समग्र शिक्षा अंतर्गत ज्या शाळेत शासनामार्फत मोफत पाठ्यपुस्तक योजना राबविली जाते अशा शाळेतील मुलांना व पालकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी जुनी (सन २०१९-२० किंवा २०२०-२१ मध्ये) वापरलेली पाठ्यपुस्तके त्यांच्या शाळेत जमा करावी
ही ऐच्छिक योजना राहील. यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तके सुस्थितीत ठेवण्याची सवय लागेल.
सध्या कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव सर्वत्र असल्यामुळे, सदर उपक्रम जेव्हा शाळा सुरू होतील तेव्हा राबविण्यात यावा. पाठ्यपुस्तके जमा झाल्यानंतर सदर पुस्तकांची वर्गवारी
शासन परिपत्रक क्रमांका बालम-२०२०/प्र.क्र./एस.सी.३
शाळास्तरावर करण्यात यावी व त्याचा अहवाल संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथ.), यांच्याकडे विहित मार्गाने सादर करण्यात यावा
सदर माहिती संकलित करण्यासाठी शिक्षण संचालक (प्राथ.), यांनी मसुदा तयार करून सर्व संबंधितांना द्यावा.
सदर उपक्रम पहिल्या वर्षी प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येणार असून सदर उपक्रमातून कागदाची बचत झाल्यामुळे झाडाचे संवर्धन होण्यास मदत होईल.
प्रस्तुत उपक्रमातून किती पाठ्यपुस्तके जमा होतील तसेच, विद्यार्थी किंवा पालकांचा प्रतिसाद बघून त्यासंबंधी पुढील निर्णय घेण्यात येईल
सदर योजनेस जास्तीत जास्त प्रतिसाद मिळावा हा दृष्टीने सर्व संबंधितांनी आवश्यक कार्यवाही करावी.
प्रस्तुत शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२०१२०९१५३५२८५० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.


आपली प्रतिक्रिया व सूचना