राज्यातील प्रस्तावित आदर्श शाळा निवड निकषांच्या मसुद्याबाबत अभिप्राय कळविणेबाबत.
संदर्भ : मा.मंत्री,शालेय शिक्षण विभाग यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीतील
निर्णय,दि.१०डिसेंबर २०२०
उपरोक्त संदर्भीय विषयान्वये, राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना समान गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी मार्च २०२० मध्ये पार पडलेल्या राज्याच्या द्वितीय (अर्थसंकल्पीय ) अधिवेशनात जाहीर केल्यानुसार शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा "आदर्श शाळा " म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेतील पहिल्या टप्प्यात राज्यातील गटसाधन केंद्रे / शहर साधन केंद्रातून प्रत्येकी एक शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करणेसाठी निवड करण्यात येणार आहे.
सदर प्रस्तावित शाळा निवड करणेसाठी विकसित करण्यात आलेला निवड निकष मसुदा आपल्या अवलोकनार्थ सोबत देण्यात आला आहे. सदर निवड निकष मसुद्याचे अवलोकन करून संबंधित निवड निकष मसुद्यामध्ये आवश्यक अशा सुधारणात्मक बाबींसह आपले अभिप्राय दि.१० जानेवारी २०२१ अखेर
lgcdapt@maaacin
या मेलवर कळविण्यात यावेत.
निकष मसुदा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
आदर्श शाळा योजनेची उद्दिष्ट्ये
१)राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा विहीत निवड निकषांच्या आधारे निवडणे.
२)शाळेतील भौतिक सुविधा अद्ययावत करणे.
३)शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी मापदंड निश्चित करणे.
४)शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक संघ, शिक्षक पालक संघ इत्यादी विविध समिती यांचा सहभाग वाढविणेबाबत उद्बोधन करणे.
५)शालेय प्रशासनाबाबत पर्यवेक्षीय यंत्रणा, मुख्याध्यापक यांचेसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करणे.
६)शैक्षणिक क्षेत्रात होणारे नाविन्यपूर्ण प्रयोग, अध्यापनशास्त्रीय तंत्रे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अंमलबजावणी इत्यादीबाबत मुख्याध्यापक व शिक्षक यांना प्रशिक्षण देणे.
७)शाळांतील शैक्षणिक गुणवत्ता तपासणीसाठी मूल्यांकन प्रक्रिया निश्चित करणे.
आदर्श शाळा योजनेचे निकष
अ. शालेय इमारत ( भौतिक सुविधा ) : -
१)शाळेचे स्थान मध्यवर्ती असावे.
२)शाळा सिद्धी व स्वच्छ शाळा प्रकल्पामध्ये उल्लेख केलेल्या सर्व भौतिक सुविधा असणे अपेक्षित आहे.
३)भविष्यवेधी दृष्टीकोनातून वाढती पटसंख्या, विद्यार्थ्यांची व शिक्षकांची निवासव्यवस्था, इत्यादी बाबींच्या अनुषंगाने बांधकामासाठी पुरेशा जागेची उपलब्धता असणे अपेक्षित आहे.
४)शाळेस संरक्षकभिंत असावी.
५)शालेय वातावरण अध्ययनपूरक व पर्यावरणपूरक असावे.
६)शाळेस विद्युतीकरण सुविधा असावी.
७)RTE नियमानुसार पटसंख्येच्या प्रमाणात शिक्षक असावेत.
८)आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीकोनातून शाळेतील सर्व यंत्रणा अद्ययावत असावी.
९)शालेय इमारत चाईल्ड फ्रेंडली व इको फ्रेंडली असणे अपेक्षित आहे.
१०)शाळेत वाय-फाय यंत्रणा वा नेट कनेक्टीव्हीटी असणे अपेक्षित आहे.
११)शाळेसाठी पूर्ण क्षमतेचे सोलर युनिट असणे अपेक्षित आहे.
१२)शालेय इमारतीत वायुविजन व्यवस्थित असावे.
१३)विद्यार्थ्यांच्या शारीरिक,मानसिक व सर्वांगीण विकासासाठी क्रीडांगण सुविधा असणे अपेक्षित आहे. ( राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या खेळांची प्रमाणित मैदाने )
१४)शाळेत विज्ञान प्रयोगशाळेसोबत अभ्यासक्रमात अंतर्भूत विविध विषयनिहाय प्रयोगशाळा असणे अपेक्षित आहे.
१५)विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात प्रथमोपचार पेटी अद्ययावत असावी.
१६)रेनवॉटर हार्वेस्टिंगची व्यवस्था असावी.
१७)विविध कार्यक्रमांच्या आयोजनासाठी पुरेशी ध्वनी, प्रकाश व बैठक व्यवस्था असणारे सुसज्ज सभागृह असावे.
१८)परिसरातील प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित वाहतूक व्यवस्था असणे अपेक्षित आहे.
१९)शालेय प्रांगणात अंगणवाडी,बालवाडी (पूर्व प्राथमिक वर्ग ) असणे अपेक्षित आहे.
आ. शालेय वातावरण : -
१)शालेय वातावरण विद्यार्थ्यांच्या अंगभूत कौशल्यांचा,२१ व्या शतकातील विविध कौशल्यांचा विकास करण्यास पूरक असे असावे.
२)अभ्यासक्रमातील अंतर्भूत विविध विषयनिहाय, वर्गनिहाय, वयोगटानुरुप पुरेसे व हाताळण्यास योग्य असे शैक्षणिक साहित्य असावे.
३)अभ्यासपूरक व अभ्यासेतर कृतिकार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.
४)नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये नमूद केल्यानुसार विद्यार्थ्यांची अंगभूत व व्यावसायिक क्षमता ओळखून त्या क्षमतेच्या विकासास अनुरुप विविध उपक्रम आणि कार्यक्रमांचे आयोजन करणे अपेक्षित आहे.
५)भविष्यकाळातील व्यावसायिक उच्चतम मागणीचा अंदाज बांधून संबंधित बाबींचे प्राथमिक प्रशिक्षण सुरुवातीपासून देण्याची व्यवस्था करणे अपेक्षित आहे.
६)शाळेकडे सुरक्षितता,आरोग्य व स्वच्छतेबाबत नियमावली व यंत्रणा असणे आवश्यक आहे.
अभिप्राय नोंदवा
इ. शाळा विकास आराखडा : -
१)शाळेच्या गरजा निश्चितीसाठी संबंधित शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीने शाळा विकास आराखडा तयार करणे अपेक्षित आहे. त्यामध्ये भौतिक सुविधा, आकर्षक शालेय परिसर, शाळा इमारत, वर्गखोल्या, स्वच्छतागृहे, पेयजल सुविधा, संरक्षक भिंत, वसतिगृहे व्यवस्था, फर्निचर, शैक्षणिक संसाधने, ग्रंथालये, संगणक कक्ष, डिजिटल सुविधा, विज्ञान प्रयोगशाळा, वाहतूक व्यवस्था इत्यादींचा समावेश असणे अपेक्षित आहे.
२)शालेय विकास आराखड्याच्या दृष्टीकोनातून लोकसहभागाच्या माध्यमातून शाळेने ठराविक निधी जमविणे अपेक्षित आहे. शाळा विकास आराखड्यानुसार अपेक्षित खर्चाच्या रकमेच्या २०% निधी शाळेने लोकसहभागातून जमविणे अपेक्षित आहे. उर्वरित ८०% निधीची उपलब्धता शासनाकडून करण्यात येणे अपेक्षित आहे.
३)शालेय विकास निधीचे सनियंत्रण व सदर निधीतून केलेल्या कामाचे योग्य पर्यवेक्षण होण्यासाठी आवश्यक पदाची नेमणूक होणे अपेक्षित
तसेच सदर प्रस्तावित शाळा निवड निकष मसुद्याबाबत जनतेकडून अनुषंगिक सूचना मागविणेसाठी
शिर्षक | Link's |
शाळा निवड |


आपली प्रतिक्रिया व सूचना