संच मान्यता! राज्यातील सर्व शाळांची
एकाच वेळी पट पडताळणी होणार!
महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाने महत्त्वाचा आदेश जारी करत राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती व त्यांची पोर्टलवरील नोंद यांची व्यापक पडताळणी होणार.
🔍 पडताळणीचे कारण काय?
गेल्या काही वर्षांपासून अनेक शाळांकडून —
▪ पोर्टलवर दाखवलेली विद्यार्थीसंख्या
▪ प्रत्यक्ष वर्गात उपस्थित विद्यार्थी
या दोन्हीमध्ये मोठा फरक असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
यामुळे:
✔ बनावट विद्यार्थी दाखवणे
✔ शाळांना मिळणाऱ्या अनुदानात गैरव्यवहार
✔ शिक्षकांची अनावश्यक पदे वाढवणे
✔ शासनाचा आर्थिक तोटा
🏫 आता पुढे काय होणार?
शालेय पोर्टलवरील डेटा पडताळणीसाठी तिन्ही स्तरांवर तपासणी केली जाणार:
1️⃣ शाळा स्तर
• मुख्याध्यापक व वर्गशिक्षकांनी
• सर्व माहिती पुन्हा तपासून
• चुकीच्या नोंदी दुरुस्त करणे
• अनुपस्थित/शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांची नोंद अद्ययावत करणे
2️⃣ गटशिक्षणाधिकारी स्तर
• शाळांना केंद्र प्रमुख, विस्ताराधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांनी भेट देऊन प्रत्यक्ष उपस्थित विद्यार्थ्यांची पडताळणी
• हजेरी व पोर्टल डेटा तुलना आवश्यक तिथे निर्देश व दुरुस्ती करणार
• राज्यस्तरावर एकाचवेळी विशेष तपासणी
विशेष पथक अचानक शाळांना भेट देणार
• प्रत्यक्ष उपस्थितीची पडताळणी
• पोर्टलवरील डेटाशी मेळ तपास
चुकीची माहिती भरलेली असल्यास संबंधित मुख्याध्यापक , केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी आणि शिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
दाखल नसलेल्या विद्यार्थ्यांची नावं पोर्टलवर टाकल्यास गंभीर गुन्हा मानला जाणार आहे.
चुकीची नोंद दिसताच तत्काळ दुरुस्ती करणे बंधनकारक.
गटशिक्षणाधिकाऱ्यांद्वारे अंतिम पडताळणी दिनांक १५ डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश.
हॅशटॅग
#विद्यार्थीपटपडताळणी
#शिक्षणविभाग
#सर्वशाळातपासणी #शिक्षक #शाळा


आपली प्रतिक्रिया व सूचना