नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण
शालेय नेतृत्व विकास कार्यक्रमांतर्गत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सजगता यावी व NEP २०२० अंमलबजावणी परिणामकारक होण्यासाठी वेबिनारला ऑनलाईन उपस्थित राहणे अनिवार्य असणे बाबत
संदर्भ : मा.संचालक, महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था,औरंगाबाद यांचे पत्र क्रमांक मिपा/प्रशिक्षण/SIN२०२०-२१/२८९, दिनांक २६/११/२०२०.
उपरोक्त संदर्भाकित विषयानुसार आपणास अमरावती जिल्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शिक्षक व अधिकार्यासाठी शालेय नेतृत्व विकास कार्यक्रमांतर्गत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण साजगता यावी व NEP २०२० अंमलबजावणी परिणामकारक होण्यासाठी जिल्ह्याकरीता चेबिनार
दिनांक ११ जानेवारी ते १५ जानेवारी २०२१ रोज सकाळी ११.३० ते १.०० दरम्यान आयोजित केलेला आहे.
सदर वेबिनारचे उद्घाटन मा.ना.बच्चुभाऊ कडू, राज्यमंत्री, शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांचे हस्ते
सोमवार दि.११ जानेवारी २०२१ रोजी राकाळी ११.३० वाजता होणार असल्याने अमरावती जिल्ह्यातील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक,केंद्र प्रमुख, पर्यवेक्षिय यंत्रणेतील सर्व अधिकारी, सर्व शिक्षण प्रेमी मंडळी, पालक व विद्यार्थी यांनी दररोज दि.११ जानेवारी ते १५ जानेवारी २०२१ सकाळी ११.३० ते १.०० दरम्यान यु-ट्युब च्या खालील लिक वर ऑनलाईन जॉईन होण्यासाठी आपण सर्वापर्यंत सदर लिंक पोहचेल व जास्तीत जास्त सहभागी वेबिनार ला उपस्थित राहतील यासाठी आपले स्तरावरून विशेष प्रयत्न करण्यात यावे.
आपण स्वतः या सर्व तारखांना विहित वेळेत उपस्थित राहणे अनिवार्य आहे. यु-ट्युब ला जॉईन होतांना स्वतःचे पूर्ण नाव व तालूक्याचे नाव कमेंट बॉक्स मध्ये नोंदवावे.
1 अमरावती दिनांक 11.1.2021 सकाळी 11:30 ते 1:00
*NEP 2020 च्या माध्यमातून मानवी हक्क,निरंतर विकास,राहणीमान विश्वकल्याणाकरिता शैक्षणिक नेतृत्व विकास*
*श्री. प्रशांत डवरे*
वरिष्ठ अधिव्याख्याता
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, अमरावती
@@@@@@@@@@
2 अमरावती दिनांक 12.1.2021 सकाळी 11:30 ते 1:00
*Adversity quotient (AQ) and School Leadership*
*डॉ.श्री. प्रशांत गावंडे*
वरिष्ठ अधिव्याख्याता
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, अमरावती
@@@@@@@@@@
3 अमरावती दिनांक 13.1.2021 सकाळी 11:30 ते 1:00
*समवायात्मक अध्ययन-अध्यापन आणि NEP 2020*
*श्री.दीपक चांदुरे*
अधिव्याख्याता
प्रादेशिक विद्या प्राधिकरण, अमरावती
@@@@@@@@@@
4 अमरावती दिनांक 14.1.2021 सकाळी 11:30 ते 1:00
*कृतीशिल शिक्षण : शाळा प्रमुखाची भूमिका*
*श्री.अतुल गायगोले व अमृता गायगोले*
संचालक, शाश्वत कन्सेप्ट स्कूल, अमरावती
@@@@@@@@@@
5 अमरावती दिनांक 15.1.2021 सकाळी 11:30 ते 1:00
*शाळा संकुल,स्थानिक प्रशासन आणि शालेय शिक्षण*
*श्री.पंडित पंडागळे*
निवृत्त उपशिक्षणाधिकारी
जिल्हा परिषद अमरावती

आपली प्रतिक्रिया व सूचना