Ads Area

PSLM Information All In Update

शालेय नेतृत्व विकास व व्यवस्थापन

 शालेय नेतृत्व विकास व व्यवस्थापन कार्यक्रमाची (PSLM) माहिती संबधितापर्यंत पोहचविणेबाबत 


उपरोक्त विषयान्वये राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशिक्षण संस्था (निपा), नवी दिल्ली अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय शालेय नेतृत्व विकास सेंटर (NCSL) मार्फत तयार केलेल्या हा कार्यक्रम देशभरातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणस्तरावरील शाळाप्रमुखांसाठी हा कार्यक्रम विनामुल्य उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

 तसेच भविष्यात शाळाप्रमुख होण्यासाठी इच्छुक असलेले  शिक्षक या कार्यक्रमाचा लाभ घेऊ शकतात.

 त्यानुसार राज्यभरातून सदर कार्यक्रमास चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. त्याबद्दल सर्व सहभागी प्रशिक्षणार्थीँचे मनस्वी अभिनंदन.

नोंदणीचा अहवाल 

नुकताच राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशिक्षण संस्था(निपा) .नवी यांचेकडून जिल्हानिहाय झालेल्या नोंदणीचा अहवाल या कार्यालयास प्राप्त झालेला आहे.

  •  अहवाल नुसार राज्यातून ७८६९ नोंदणी झालेली आहे.  प्रथम क्रमांकावर नागपूर जिल्ह्याची सर्वाधिक नोंदणी झालेली आहे
  •  तर त्याखालोखाल जळगाव, सातारा, मुंबई उपनगर, पुणे असे आघाडीवर असलेली जिल्हे आहेत.
  •  तर इतर जिल्ह्यांची नोंदणी अल्पप्रमाणात आहे.
  •  शालेय नेतृत्व आणि व्यवस्थापन आणि शालेय सुधारणा आणि परिवर्तन होण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणस्तरावर शाळाप्रमुख व  शिक्षक यांना या कार्यक्रमाचा लाभ व्हावा 
  • आपआपल्या स्तरावरून नोंदणीसाठी आवाहन व प्रोत्साहित करावे

मिपा संस्थेचे अधिकृत Link

मिपा संस्थेचे अधिकृत फेसबुक पेज

FACEBOOK

PSLM कोर्स माहिती साठी YouTube link

PSLM COURSE


Program on School Leadership and Management - PSLM

शालेय नेतृत्व व व्यवस्थापन ऑनलाइन स्वरूपातील व राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशिक्षण संस्था (निपा), नवी दिल्ली अधिकृत 

प्रमाणपत्र प्राप्त होणारा कोर्स मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत राष्ट्रीय वेबपोर्टलवर उपलब्ध आहे.

 खालील दिलेल्या वेबपोर्टल वर नोंदणी करून स्वतःचे लॉगीन व पासवर्ड

मुख्याध्यापकांनी तयार करून आणि कोर्स विहित मुदतीत सर्वच मुख्याध्यापकांनी पूर्ण करावा,

नोंदणी करिता खालील वेबपोर्टल लिंक दिली आहे

वेब पोर्टल


फेसबुक पेज व YouTube channel ला आपण Like व Subscribe करा

 उपलब्ध मार्गदर्शन संदर्भात नोटिफिकेशन मिळून अधिकाधिक संख्येने अधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षक यांना राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय तज्ञांचे मार्गदर्शनाचा लाभ होईल.


लॉगिन  व कोर्स पूर्ण करण्यासाठी आवश्यक तांत्रिक साहाय्य करिता कार्यालयीन वेळेत खालील तज्ञ व्यक्तींची दिलेल्या भ्रमणध्वनी नुसार मदत घेता येईल.


श्री. धनंजय क्षिरसागर :- 

98 6044 3300 

श्री. ओमप्रकाश शेळके :-

 98 2229 0630


(डॉ. नेहा बेलसरे)

संचालक

महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (मिपा), औरंगाबाद

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad