Republic Day Celebrating Guideline

 प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचावत,

 दिनांक २६ जानेवारी, २०२१.

दिनांक २६ जानेवारी, २०२१ रोजी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी म्हणजे सकाळी ०९-१५ वाजता आयोजित करण्यात यावा.

 सदर समारंभ आयोजित करताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे तथा सूचनांचे अनुपालन करण्यात यावे. या मुख्य शासकीय समारंभात मर्यादित निमंत्रितांना सहभागी होता यावे 

याकरिता या दिवशी सकाळी ठिक  ८-३० ते १०-०० च्या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येवू नये,

 जर  कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असेल तर त्यांनी ध्वजारोहण समारंभ सकाळी ठिक ८-३० वा. च्या पूर्वी किंवा १०.०० वा. च्या नंतर करावा.



काही ठराविक जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूकी संदर्भात आचारसंहिता अंमलात असल्यास सर्व संबंधितांना यासंदर्भात खालीलप्रमाणे सूचना देण्यात याव्यात.

अ) ध्वजारोहणाच्या नेहमीच्या स्थळामध्ये बदल करण्यात येऊ नये.

ब) कार्यक्रमाचा राजकीय व्यासपीठासारखा वापर करु नये.

क) मा.पालकमंत्री यांच्या भाषणाचा आशय केवळ ऐतिहासिक पार्श्वभूमी, ऐतिहासिक मान्यवरांचे कार्य आणि कर्तृत्व यापुरतेच मर्यादित असावा आणि त्यांनी कोणतेही राजकीय स्वरुपाचे भाषण करु नये, बलिदान केलेल्या हुतात्मांच्या तसेच देशाचा गौरव यापुरतीच भाषणे मर्यादित असावीत.
वृक्षारोपण, आंतर शालय/आंतर महाविद्यालय यांच्या स्तगया Online पदतीद्वारे वाद विवाद स्पर्धा, प्रश्नमंजूषा/देशभक्तीपर निबंध व कविता यांचे आयोजन करावे.
 प्रभात फेऱ्या काढण्यात येऊ नये, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध खेळांचे आयोजन करण्यात येऊ नये. महत्त्वाचे योजनेचा शुभारंभ करावा.

संबंधित विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी आपल्या अधिकार क्षेत्रात प्रजासत्ताक दिन समारंभ साजरा करण्याकरिता आवश्यक ती कार्यवाही करावी. त्यांच्या अधिकार क्षेत्रात त्या दिवशी कोरोना विषाणूच्या पाश्वभूमीच्या संदर्भात सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करुन सर्व बाबी योग्य त-हेने कार्यान्वित होतील याबाबत

त्यांनी व्यक्तीश: दक्षता घ्यावी.



अधिक माहितीकरिता वरील PDF डाऊनलोड करा

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad