इयत्ता ११ वी व १२ वी सुधारित
विषय योजना व मूल्यमापन योजना
काही विषयांसाठी सवलत
देणेबाबत
शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक ०८ ऑगस्ट, २०१९ च्या शासन निर्णयानुसार सुधारित अभ्यासक्रम व पाठयक्रमासाठी सन २०१९-२० पासून इयत्ता ११ वी साठी व सन २०२०-२१ पासून इयत्ता १२ वी साठी सुधारित विषय योजना व मूल्यमापन योजना निश्चित करण्यात आलेली आहे.
त्यामध्ये शाखानिहाय Group - A, Group - B व Group C मध्ये विषयांची विभागणी करण्यात आलेली असून शाखानिहाय कनिष्ठ महाविद्यालयांनी / विद्याथ्यांनी विषय निवड करण्याबाबत धोरण निश्चित करण्यात आलेले आहे
सदर विषय योजनेनुसार :
अ) पुढील विषय कनिष्ठ महाविद्यालय स्तरांसाठी बंद करण्यात आलेले आहेत.
१. अवेस्ता- पहलवी
२. सामान्यज्ञान
३. हिंदी उपयोजित
४. मराठी साहित्य
५. इंग्रजी साहित्य
&. Occupational orientation 3iaifa Stenography (English / Marathi)
ब) कला व विज्ञान शाखेसाठी यापूर्वी निश्चित केलेला शिक्षणशास्त्र ( Education ) हा विषय सुधारित विषय योजनेनुसार Group - C मध्ये फक्त कला शाखेसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे .
क) जुन्या विषय योजनेनुसार अनिवार्य विषयांव्यतिरिक्त असलेले समाजशास्त्र, मानसशास्त्र, तर्कशास्त्र, सहकार, राज्यशास्त्र यासारख्या एकापेक्षा अधिक विषयांची निवड करणे कनिष्ठ महाविद्यालयांना / विद्यार्थ्यांना शक्य होते
मात्र सुधारित विषय योजनेनुसार Group - C मध्ये समाविष्ट केलेल्या अशा एकाच विषयाची निवड करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे.
शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक ०८ ऑगस्ट, २०१९ च्या शासन निर्णयानुसार विषय योजनेत झालेल्या बदलांची नोंद घेवून उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी सन २०१९ -२० पासून इयत्ता ११ वी साठी व सन २०२०-२१ पासून इयत्ता १२ वी साठी विषय निवड व अध्यापन याबाबत कार्यवाही करणे आवश्यक होते.
परंतू , काही कनिष्ठ महाविद्यालयांनी उपरोक्त बदलांची दखल न घेता जुन्या विषय योजनेनुसार विषयांचे अध्यापन अद्यापही सुरु ठेवलेले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन २०२१ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरुन घेताना दिनांक ०८ ऑगस्ट २०१९ च्या संदर्भिय शासन निर्णयाची अंमलबजावणी करुन त्याप्रमाणे विषय निवडीचे विकल्प उपलब्ध करुन दिलेले आहेत
त्यामुळे जुन्या विषय योजनेनुसार विषय सुरु ठेवलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांना परीक्षेची आवेदनपत्रे भरताना विषय निवडीमध्ये अडचणी येत आहेत,
त्यामुळे परीक्षेची आवेदनपत्रे भरणे शक्य होत नाही. या बाबींचा विचार करून संदर्भाधीन शासन निर्णयात सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय:
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित विचारात घेता ज्या विद्यार्थ्यांनी पुर्वीच्या विषय योजनेनुसार विषयांची निवड केलेली आहे त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जावू नये यासाठी सन २०२१ च्या नियमित परीक्षेसाठी खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी:
१. अवेस्ता - पहलवी, सामान्यज्ञान ( सैनिकी शाळांसाठी), हिंदी उपयोजित. मराठी साहित्य, इंग्रजी साहित्य, Occupational orientation अंतर्गत Stenography (English / Marathi) हे बंद झालेले विषय ज्या विद्यार्थ्यांनी घेतलेले आहे
त्यांना सदर विषयाची उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इ.१२ वी) परीक्षा देण्याची एकमेव व अंतिम संधी सन २०२१ च्या नियमित परीक्षेसाठी देण्यात यावी
तथापि सदर परिक्षेमध्ये किंवा काही विषयात विद्यार्थी उत्तीर्ण न झाल्यास त्या विद्यार्थ्यांना पूर्वीच्या विषय योजनेनुसार तोच विषय घेऊन परिक्षेस प्रविष्ट होता येईल.
शिक्षणशास्त्र (Education) हा विषय सुधारित विषय योजनेनुसार Group C मध्ये फक्त कला शाखेसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.
मात्र विज्ञान शाखेतील ज्याविद्यार्थ्यांनी सदर विषय घेतलेला आहे त्यांना सदर विषयाची उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इ.१२ वी) परीक्षा देण्याची एकमेव व अंतिम संधी सन २०२१ च्या नियमित परीक्षेसाठी देण्यात यावी .
तथापि सदर परिक्षेमध्ये किंवा काही विषयात विद्यार्थी उत्तीर्ण न झाल्यास त्या विद्यार्थ्यांना पूर्वीच्या विषय योजनेनुसार तोच विषय घेऊन परिक्षेस प्रविष्ट होता येईल.
३. जुन्या विषय योजनेनुसार अनिवार्य विषयांव्यतिरिक्त असलेले समाजशास्त्र मानसशास्त्र , तर्कशास्त्र, सहकार, राज्यशास्त्र यासारख्या एकापेक्षा अधिक विषयांची निवड करणे कनिष्ठ महाविद्यालयांना / विद्यार्थ्यांना शक्य होते
. मात्र सुधारित विषय योजनेनुसार Group -C मध्ये समाविष्ट केलेल्या अशा एकाच विषयाची निवड करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे .
तथापि, ज्या कनिष्ठ महाविद्यालयांनी / विद्यार्थ्यांनी Group C मध्ये एकापेक्षा अधिक विषयांची निवड करुन अध्ययन अध्यापन केले आहे , त्यांना सदर विषयाची उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इ.१२ वी) परीक्षा देण्याची एकमेव च अंतिम संधी सन २०२१ च्या नियमित परीक्षेसाठी देण्यात यावी .
तथापि सदर परिक्षेमध्ये किंवा काही विषयात विद्यार्थी उत्तीर्ण न झाल्यास त्या विद्यार्थ्यांना पूर्वीच्या विषय योजनेनुसार तोच विषय घेऊन परिक्षेस प्रविष्ट होता येईल.
४. शैक्षणिक वर्ष सन २०२१-२२ पासून इयत्ता १२ वी साठी अशी सवलत देण्यात येणार नाही व सर्व उच्च माध्यमिक शाळा /कनिष्ठ महाविद्यालयांनी शासन निर्णय दि.८ ऑगस्ट,२०१९
व दि.११ नोव्हेंबर,२०१९ रोजीचे शुध्दीपत्रकानुसार सुधारित विषय योजनेची अंमलबजावणी करणे अनिवार्य राहील व बंद झालेल्या विषयांचे अथवा शाखेसाठी उपलब्ध नसलेल्या विषयांचे अध्यापन तातडीने बंद करणे आवश्यक आहे.
ही बाब शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांनी सर्व शैक्षणिक संस्थांच्या तात्काळ निदर्शनास आणावी
सदर प्रकरणी सुधारीत विषय योजना व मुल्यमापन योजनेसंदर्भात यापूर्वी निर्गमित केलेले शासन निर्णय व सुधारित शासन निर्णयांची काटेकोर अंमलबजावणी करणेबाबत संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र,पुणे व शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांनी योग्य ती दक्षता घ्यावी.


आपली प्रतिक्रिया व सूचना