Ads Area

Ashram Shala Suru Karane Suchana

आश्रम शाळा सुरू करणे बाबत सूचना

 


राज्यातील शाळा सुरक्षितपणे सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना. सदर्भ: शालेय शिक्षण व क्रिडा विभाग शासन परिपत्रक क्र. संकीर्ण-२०२०/प्र.क्र.२०४"


एसडी-६, दि. १८ जानेवारी,२०२१


संदर्भाधीन परिपत्रकानुसार राज्यातील इयत्ता ५ वी ते ८ वी पर्यंतचे वर्ग दिनांक २७ जानेवारी, २०२१

पासून सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या परिपत्रकामध्ये कोविड-१९ वायत केंद्र शासनाच्या सूचनांचे तसेच शालेय शिक्षण विभागाच्या दि.१५ जून, २०२०, दि.२९ ऑक्टोबर, २०२० व दि. १० नोव्हेंबर, २०२० रोजीच्या परिपत्रकातील मार्गदर्शक सूचनाचे काटेकोरपणे पालन करण्याच्या तसेच शाळा व वर्ग सुरक्षितपणे सुरु होतील याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.


शालेय शिक्षण विभागाच्या उपरोक्त सूचनास अनुसरुन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या अधिपत्याखालील सर्व ५ वी ते ८ वी चे वर्ग असलेल्या आश्रमशाळा दि.२७ जानेवारी, २०२१ पासून न चुकता सुरू करणेबाबत आश्रमशाळातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्याना सूचना देण्यात याव्यात.

तसेच शालेय शिक्षण विभागाच्या दि १५ जून, २०२०, दि.२९ ऑक्टोबर, २०२० व दि. १० नोव्हेंबर, २०२० रोजीच्या परिपत्रकातील तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या दि. ११/११/२०२० च्या पत्रातील मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे सर्व आश्रमशाळा व वर्ग सुरक्षितपणे सुरु होतील याची दक्षता घेण्यात यावी.

 तसेच उपरोक्त सर्व परिपत्रक/पत्रान्वये दिलेल्या सूचनाची अमलबजावणी संबंधीत जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व इतर स्थानिक प्रशासनाच्या सूचना विचारात घेऊन तात्काळ करण्यात यावी.


सहपत्र: वरीलप्रमाणे


(म.हिं.बनसोडे

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन


Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad