Ads Area

Ek BHARAT Great BHARAT School Club Installation

 शाळांमध्ये क्लब स्थापन

 करणेबाबत

एक भारत-श्रेष्ठ भारत योजनेअंतर्गत शाळांमध्ये क्लब स्थापन करणेबाबत....

 संदर्भ:१.या कार्यालयाचे पत्र जा.क्.मराशैसप्रप/सा.शि.चि/२०१९/२१४/दि.८ जाने २०२० २.मा.राजेश कुमार मौर्य, उपसचिव भारत सरकार यांचे पत्र कार्यालास प्राप्त 

दिनांक ६जाने. २०२१


उपरोक्त विषयाबाबत, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या मार्फत एक भारत-श्रेष्ठ भारत योजनेबाबत नवीन मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

 भारतासारख्या विविधतेने नटलेल्या खंडप्राय देशामध्ये वेगवेगळ्या संस्कृती, भौगोलिक, जैविक विविधता, वेगवेगळे प्राणी, वनस्पती, संगीत, नृत्य, लघुचित्रपट- चित्रपट, हस्तकला, खेळ, सण-उत्सव, साहित्य, चित्र-शिल्प या सर्वांमध्ये विविधतेचे दर्शन होत आहे. 

Ek BHARAT Great BHARAT School Club Installation

याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करून विविधता टिकविणे व त्याबाबत उत्तरदायित्वाची भावना निर्माण होणे आवश्यक आहे. यासाठी देशातील राज्या-राज्यांची जोडी करुन राज्यांमधील उपरोक्त नमूद बाबींची माहिती करून घ्यावयाची आहे. यासाठी महाराष्ट्र राज्याची ओरिसा या राज्यात सोबत जोडी Pairing) करण्यात आलेली असून या शैक्षणिक वर्षांत ओरिसा राज्याबाबतचे उपक्रम घ्यावयाचे आहेत. एक भारत -श्रेष्ठ भारत या उपक्रमाअंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये संदर्भीय पत्रानुसार खालील उपक्रम घेण्याबाबत सूचित करण्यात आलेले आहे.

शाळांमध्ये एक भारत-श्रेष्ठ भारत क्लब ची स्थापनाः

 राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाध्या इयत्ता १ ते १२ वीच्या शाळांमध्ये एक भारत-श्रेष्ठ भारत क्लब (EBSB Club) ची स्थापना करण्यात यावी. या क्लबमध्ये शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनीचा समावेश


उपरोक्त तक्त्यात नमूद ४ उपक्रमांपैकी कोणतेही ३ उपक्रम एक भारत -श्रेष्ठ भारत अंतर्गत स्तरावर घेऊन अधिकाधिक विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्यावे.

 सदरील उपक्रम घेण्यासाठी ८ ओरिसा राज्याबद्दल अधिक माहितीचे परिशिष्ट ब सोबत जोडले आहे. परिशिष्ट ब मधील मा ओरिसा राज्याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून प्राप्त माहितीच्या मदतीने यादीत नमूद केल्े राबवावेत. उपक्रम पूर्ण झाल्यावर उपक्रमात सहभागी झालेले विद्यार्थी (मुले व मुलींची संख्या संख्या ही माहिती पुढील लिंकवर जाऊन भरण्यात यावी.

उपक्रमांची माहिती भरण्यासाठी लिंक 

https://www.research.net/r/EBSB2020


शिक्षणाधिकारी प्राथ.व माध्य,यांनी शाळांमध्ये एक भारत -श्रेष्ठ भारत क्लब (EBSB Club) ची स्थापना तसेच उपरोक्त उपक्रम आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांमध्ये राबविले जाणे व त्यावाबतची माहिती लिंक वर भरणे यासाठी आपल्या कार्यक्षेत्रातील शाळांना पत्र पाठवून अवगत करावे. शालेय स्तरावर उपक्रम राबवून त्याची माहिती लिंकवर भरल्यानंतरच राज्यस्तरावर दरमहा त्याचा एकत्रित अहवाल करून केंद्र शासनास सादर करता येईल.


संदर्भीय पत्र क्र.१ नुसार शिक्षणाधिकारी माध्य हे जिल्हा स्तरावरील नोडल/संपर्क अधिकारी तर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थामधील मधील अधिव्याख्याता हे उपजिल्हा संपर्क अधिकारी आहेत. 

प्राचार्य,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, शिक्षणाधिकारी माध्य. (नोडल/संपर्क अधिकारी) व अधिव्याख्याता (उपजिल्हा संपर्क अधिकारी) यांनी आपल्या जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये एक भारत-श्रेष्ठ भारत अंतर्गत उपरोक्त सर्व उपक्रम राबविले जातील यासाठी शाळा मुख्याध्यापक, शिक्षक यांना तालुकास्तरीय/केंद्रस्तरीय शिक्षण परिषदा, बैठका, झूम/गुगल मिटद्वारे प्रेरित करून शाळांना मार्गदर्शन करावे. आपल्या जिल्ह्यातील १०० टक्के शाळा या उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रयन्त करावे.

 दरमहा आपल्या जिल्ह्यातील शाळांनी राबविलेले उपक्रम व सहभागी विद्यार्थी यांची संख्यात्मक माहिती याचा आढावा घेतला जाईल.

शासन परिपत्रक

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad