Ads Area

Indian Toy Fair Registration All

 भारतीय खेळणी जत्रा 2021

ITF 2021 Registration


*प्रिय विद्यार्थी,पालक आणि शिक्षक  मित्रहो,

खेळणी तयार 

विविध खेळ व खेळणी तयार करण्याच्या माध्यमातून विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या कल्पकतेला आणि सृजनशीलतेला चालना देणे व ती सादर करण्याची संधी देणे या हेतूने आर्टस  आणि  अ‍ॅस्थेटिक्स विभाग, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांचेमार्फत आपल्या देशातील पहिली भारतीय खेळणी जत्रा २०२१ (India Toy Fair २०२१) चे ऑनलाईन पद्धतीने

  दि. २७/२/२०२१ ते २/३/२०२१* या कालावधीमध्ये आयोजित करण्यात येत आहे. 

आपल्या  देशाचे पंतप्रधान *मा. श्री. नरेंद्र मोदी* यांच्या हस्ते  दि. 27 फेब्रुवारी 2021 रोजी ऑनलाइन पद्धतीने या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे.

नोंदणी

  जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळातील शिक्षक, विद्यार्थी  यांना भारतीय खेळणी जत्रा २०२१   यामध्ये ऑनलाईन पद्धतीने  सहभागी होण्यासाठी 

https://theindiatoyfair.in/register-now.php

 यावर  General visitor म्हणून नोंदणी करावी.

 देशातून 1000 पेक्षा जास्त सहभाग असलेल्या पहिल्या आभासी पद्धतीने होणाऱ्या खेळणी जत्रेचा आनंद घ्यावा

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.

इंडियन टॉय फेयर 2021

🧸 *इंडियन टॉय फेयर 2021: भारतीय खेळणी उद्योगाबद्दल मोदींची आशादायी 'मन की बात'!

👉 भारतात हे असे टॉय फेयर प्रथमच होत आहे. आपल्या देशाला खेळणी आणि तिचा इतिहास जुना आहे. आपल्या दैनंदिन वापरातील गोष्टी, आणि आपल्या जीवनशैलीची सांगड घालत आपल्या देशी खेळण्या बनवल्या गेल्या असल्याचे पुरावे इतिहासातही आहेत. 


💁🏻‍♀️ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बात कार्यक्रमातील भाषणात खेळणी बाजाराच्या संभाव्य क्षमतेबद्दल आपले मत मांडले होते. 


👍🏻देशी खेळण्यांना प्रोत्साहन देण्यासाठी उपलब्ध असणाऱ्या संधी यावरही त्यांनी प्रकाश टाकला होता. यातूनच खेळण्यांच्या जत्रेची (टॉय फेयर) कल्पना उदयास आली.


▶️ पंतप्रधान मोदींनी आज खेळण्यांच्या जत्रेचे (टॉय फेयर) दुरचित्रप्रणालीद्वारे उद्घाटन केले. याप्रसंगी त्यांनी 200 वर्षांपासून खेळणीचा इतिहास असलेल्या देशाला खेळणी उत्पादनात आत्मनिर्भर बनवण्याचे अवाहन केले. 


🔄 *रियुज आणि रिसायकल* या प्रणालीचा वापर करण्याचे मोदींनी आवाहन करत उद्योजकांना निसर्गाला वाचवण्यासाठी प्लास्टिकचा वापर कमी करत आकर्षक कल्पना पुढे आणून खेळणी बनवण्याचेही  आवाहन केले.


👌या सगळ्यातून सामान्य माणसाने आपली स्वदेशी खेळणी स्वीकारून आपल्या अशा छोट्या व्यवसायांना हातभार लावावा हीच टॉय फेयर आयोजित करण्यामागे आशा आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad