राष्ट्रीय विज्ञान दिवस उपक्रमांचाबत
दिनांक 28 फेब्रुवारी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमांचाबत......
प्रति,
1. विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)
2. शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक (सर्व ) 3. प्राचार्य , जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)
4. शिक्षणाधिकारी/ शिक्षण प्रमुख/ प्रशासन अधिकारी (महानगरपालिका सर्व)
5. शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई
विषय : राष्ट्रीय विज्ञान दिवस -
दिनांक 28 फेब्रुवारी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमांचाबत......
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, बालभारतीमार्फत राष्ट्रीय विज्ञान दिवस दिनांक 28 फेब्रुवारी निमित्त विद्यार्थी, पालक, शिक्षक यांचेसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. (उपक्रम तपशील सोबत जोडला आहे.)
तरी सदर उपक्रमांचा लाभ घेणेविषयीच्या सुचना सर्व विदयार्थी, शिक्षक व अनुषांगिक घाटकांना देण्याविषयीची कार्यवाही आपलेमार्फत करण्यात यावी.
(दिनकर पाटील) संचालक पाठ्यपुस्तक मंडळ, पुणे 4
दिनांक 28 फेब्रुवारी हा दिवस सर्वत्र राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्त पाठ्यपुस्तक मंडळ, बालभारती तर्फे सर्व विद्यार्थी पालक व शिक्षक वर्गास राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. या दिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालमारतीच्या शास्त्र बिभागामार्फत
सर्वांसाठी विज्ञान, आरोग्य यांचे महत्व, जीवनातील विज्ञानाची उपयुक्तता स्पष्ट करणारी विविध तज्ज्ञांची व्याख्यानमाला (मार्गदर्शन सत्रे) आयोजित करण्यात येत आहे.
विषय
विज्ञान आणि शारीरिक आरोग्य
m (Asthma)
विज्ञान आणि मानसिक आरोग्य
विज्ञान : जाणून घेऊया चंद्रकला
The Story of Scientist
Lise Meitner
विज्ञान आणि शारीरिक आरोग्याचे
महत्त्व
दिनांक 1 मार्च 2021 पासून टप्प्याटप्याने तज्ज्ञांची व्याख्याने बालभारतीच्या
या संकेतस्थळावर आणि बालभारतीच्या YOUTUBE
https://www.youtube.com/c/eBalbharati-msbt
करून देण्यात येणार आहेत.
दिनांक 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस' विशेष उपक्रम
दिनांक 28 फेब्रुवारी हा दिवस सर्वत्र राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्त पाठ्यपुस्तक मंडळ, बालभारती तर्फे सर्व शिक्षक वर्गास राष्ट्रीय विज्ञान दिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. या दिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारतीच्या शास्त्र विभाग आणि संशोधन विभागामार्फत राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षकांसाठी विज्ञान विषय संदर्भाने नवोपक्रम लेखन व विज्ञान अध्यापन विषयी Paper Presentation उपक्रम/ स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. या उपक्रमात सर्व शिक्षकांनी सहभागी होऊन याचा लाभ घ्यावा,
स्तर : प्राथमिक स्तर , माध्यमिक स्तर , उच्च माध्यमिक स्तरावर अध्यापन करणारे शिक्षक
विषय :
1. विज्ञानातील नवोपक्रम
2. तंत्रस्नेही विज्ञान अध्यापन
3. भविष्यातील विज्ञान अध्यापन आणि शिक्षक भूमिका
4. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 : विज्ञान अध्यापनाची नवी दिशा
लेख /पेपर पाठविण्यासाठी मेल आय.डी:
research_officer@ebalbharati.in
research_officer@ebalbharati.in
संपर्क क्र . 020-25716139, 25716121
लेख /पेपर पाठविण्यासाठी कालावधी : दिनांक 1 मार्च 2021 ते 15 मार्च 2021
लेखन माध्यम व शब्दमर्यादा : मराठी/ इंग्रजी/ हिंदी - 2000 ते 2500 शब्द व्याकरण दृष्ट्या निर्दोष , Font Size - मराठीसाठी (Unicode) 16 व इंग्रजीसाठी Times New Roman 12)
(लेख / पेपर हा ओपन फाईल व पीडीएफ या दोन्ही स्वरूपात मेल करणे आवश्यक व त्यावर शिक्षक नाव,अध्यापन स्तर, आस्थापना, पत्ता , Email आय. डी., मोबाईल क्रमांक नोंद करावा.)
श्री. दिनकर पाटील


आपली प्रतिक्रिया व सूचना