Ads Area

SSC And HSC Exam Time Table

 उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इ.१२वी

 व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र 

इ.१०वी

 एप्रिल-में २०२१ लेखी 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे ४११००४.


विषय : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) एप्रिल-में २०२१ लेखी परीक्षा वेळापत्रकाबाबत...

वेळापत्रक

एप्रिल-में २०२१ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या


पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रके मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दिनांक १६/०२/२०२१ पासून उपलब्ध करून देण्यात आलेली होती. सदर बेळापत्रकांबाबत सुचना असल्यास मंडकाकडे दिनांक २२/०२/२०२१ पर्यंत लेखी स्वरूपात मागविण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार संघटना, पालक, शिक्षक व विद्यार्थी यांचेकडून प्राप्त झालेल्या सूचनांचे अवलोकन करून, इ.१२वी व इ.१०वी ची संभाव्य वेळापत्रकेच अंतिम करण्यात आलेली आहेत. अंतिम बेकापत्रकान्सार लेखी परीक्षा खालील कालावधीत आयोजित केलेल्या आहेत.

वेळापत्रक डाऊनलोड

तपशील


उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (सर्वसाधारण व द्विलक्षी विषय) व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम


(पुनर्रचित व जुना अभ्यासक्रम) माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा


लेखी परीक्षा कालावधी


शुक्रवार दि. २३ एप्रिल २०२१ ते शुक्रवार दि. २१ मे २०२१


गुरुवार दि. २९ एप्रिल २०२१ ते गुरुवार दि. २० मे २०२१


उपरोक्त कालावधीमध्ये आयोजित केलेली दिनांकनिहाय सविस्तर अंतिम वेळापत्रके मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.in 

संकेतस्थळावर दिनांक २६/०२/२०२१ पासून उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.


मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा/उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय यांचेकडे छापील स्वरुपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सअँप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये.


प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा/कनिष्ठ महाविद्यालय यांना कळविण्यात येत आहे. सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

Time Table Download


दिनांक : २६/०२/२०२१


(डॉ.अशोक भोमले)


सचिव,


राज्यमंडळ, पुणे-४

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad