गणित विषयाच्या मराठी माध्यमासाठी
ई-साहित्य निर्मिती करणेकरिता
व्हिडीओ निर्मिती तज्ञ व भाषांतर तज्ञ
निवडणेकरिता
निवड प्रक्रिया राबविणेबाबत...
संदर्भ :-शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,मंत्रालय मुंबई यांचे पत्र क्र. संकीर्ण २०२०/१९० एस. डी-६ शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,मंत्रालय,मुंबई. दि.२५/११/२०२०.
राज्यातील इयत्ता पहिली ते दहावी विद्यार्थ्यांकरिता गणित विषयाचे मराठी माध्यम करिता दर्जेदार ई-साहित्य उपलब्ध व्हावे याकरिता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांचेमार्फत ई-साहित्य निर्मिती करण्यात येणार आहे
याकरिता उत्कृष्ट व्हिडीओ निर्मिती तज्ञ व भाषांतर तज्ञ यांची आवश्यकता आहे
राज्यातील बहुतांशी शिक्षक/क्षेत्रीय अधिकारी तंत्र-स्नेही असल्याने त्यांच्या ज्ञानाचा लाभ राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना होऊ शकेल
याकरिता व्हिडीओ निर्मिती व भाषांतर निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहे.सदर ई-साहित्य निर्मिती करणे करिता ४ व्हिडीओ निर्मिती तज्ञ व २० भाषांतर तज्ञांची आवश्यकता आहे.
निवड प्रक्रिया नोंदणी करिता लिंक-
सदर लिंक दिनांक १५/०३/२०२१ रोजी रात्री १२.०० पर्यंत भरावी. संबंधितांनी लिंक भरण्यापूर्वी खालील सूचनांचे लक्षपूर्वक वाचन करावे.
व्हिडीओ निर्मिती तज्ञ नोंदणी करण्याकरिता आवश्यक बाबी-
१. गणित विषय अध्यापनाचा अनुभव व तंत्रस्नेही असणारे स्थानिक स्वराज्य संस्था / शासकीय शाळेतील प्राथमिक/माध्यमिक शिक्षक,विषय सहाय्यक/ विषय साधन व्यक्ती नोंदणी करू शकतील.याकरिता गणित विषयाचे अतिरिक्त शिक्षकही नोंदणी करू शकतात.
२.प्रस्तुत व्हिडीओ निर्मितीकरिता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र पुणे या कार्यालयात स्टुडीओ तयार करण्यात येत आहे.तरी व्हिडीओ निर्मिती करणेकरिता पुणे येथील कार्यालयात किमान १ वर्ष या कालावधीकरिता किवा काम पूर्ण होईपर्यंत प्रत्यक्ष उपस्थित राहून कामकाज करावे लागेल.व्हिडीओ निर्मिती बाबतचे प्रशिक्षण या कार्यालयामार्फत देण्यात येईल.
३.याकरिता आपली नेमणूक निव्वळ तात्पुरत्या प्रतिनियुक्ती स्वरुपात नेमणूक असेल. कामपूर्ण
झालेनंतर आपणास मूळ आस्थापनेवर रुजू होण्यासाठी कार्यमुक्त करण्यात येईल. ४.या नेमणूक कालावधीतील आपले वेतन मूळ आस्थापनेवरून होईल.
५.या कामाकरिता कोणताही अतिरिक्त पूरक भत्ता किवा मानधन अनुज्ञेय असणार नाही.
६.दिलेल्या कालमर्यादेमध्ये कामकाज विहित निकषामध्ये पूर्ण करणे बंधनकारक राहील.निकषानुसार कामकाज न झाल्यास आपणास कार्यमुक्त करण्यात येईल.
भाषांतर तज्ञ नोंदणी करण्याकरिता आवश्यक बाबी-
१. गणित विषय अध्यापनाचा अनुभव असणारे व तंत्रस्नेही स्थानिक स्वराज्य संस्था /शासकीय शाळेतील तसेच सर्व व्यवस्थापनाच्या (शासकीय,निमशासकीय,खाजगी अनुदानित,खाजगी विनाअनुदानित) शाळेतील प्राथमिक/माध्यमिक शिक्षक, क्षेत्रीय अधिकारी, विषय सहाय्यक,विषय साधन व्यक्ती, अतिरिक्त शिक्षक, गणित विषयाचे निवृत्त शिक्षक नोंदणी करू शकतात.
२. भाषांतर करावयाचे कामकाज हे ऑनलाईन स्वरुपात करावयाचे असल्याने सदर कामकाज त्यांचे दैनंदिन शालेय /कार्यालयीन कामकाज सांभाळून घरी काम करू शकतात.
३.सदर करिता कामाच्या स्वरूपानुसार मानधन देय असेल.
४. पुरविण्यात येणाऱ्या निकषानुसार विहित कालावधीमध्ये भाषांतराचे काम पूर्ण करणे बंधनकारक असेल.
उपरोक्त बाबींचे अवलोकन करून आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शिक्षक व क्षेत्रीय अधिकारी यांना नोंदणी करण्यासाठी अवगत व प्रोस्ताहित करावे.


आपली प्रतिक्रिया व सूचना