मोड्युल पूर्ण करून प्रमाणपत्र
देण्यात येईल
नमस्कार!
CIET,NCERT, नवी दिल्ली मार्फत आयोजित ऑनलाईन निष्ठा प्रशिक्षण राज्यातील हिंदी,इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकांसाठी दीक्षा प्लॅटफॉर्म वरती दि.28 नोव्हेंबर 2020 पासून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचेद्वारा सुरू करण्यात आले आहे
ऑनलाईन पद्धतीने निष्ठा प्रशिक्षणाचे सर्व बाब लक्षात घेवून हिंदी व इंग्रजी माध्यमाचे
वर्ग 1ली ते 8वी ला अध्यापन करणारे शिक्षक करिता
सर्व मोड्युल दिनांक 1मार्च ते 15मार्च 2021 सदर कालावधीमध्ये एकाचवेळी दीक्षा प्लॅटफॉर्म वर ऑनलाईन निष्ठा प्रशिक्षणाचे उपलब्ध करून दिले जाणार आहेत
महाराष्ट्र राज्यातील इंग्रजी व हिंदी माध्यमाचे वर्ग 1ली ते 8वी ला अध्यापन करणारे एकूण 1,10,000 शिक्षक हे प्रशिक्षण घेत आहेत.
मोड्युल पूर्ण करणे
दिनांक 26.02.2021रोजी निष्ठा प्रशिक्षणाची शेवटची बॅच समाप्त होत आहे
म्हणून ऑनलाईन NISHTHA Training चे एकूण प्रशिक्षणाचे सर्व अठरा मोड्युलाचे भाग पूर्ण होत आहेत.
पण हिंदी व इंग्रजी माध्यमाचे इ.1ली ते 8वी साठी अध्यापन करणाऱ्या बरेच शिक्षकांचे निष्ठा प्रशिक्षणाचे काही भाग मोड्युल अपूर्ण राहिले आहेत
त्यामुळे NISHTHA Training मोड्युलचे प्रमाणपत्र प्राप्त झालेले नाही.
तसेच ऑनलाईन निष्ठा प्रशिक्षणाचे सर्व 18 मोड्युल पूर्ण करणे आवश्यक आहे.
प्रशिक्षण पूर्ण करणे
ऑनलाईन निष्ठा प्रशिक्षण करिता ज्यांनी नोंदणी केली आहे किंवा
सर्व शिक्षकांकरिता आवश्यक असल्याने ज्या शिक्षकांचे NISHTHA Training कोर्सेस मोड्युल अपूर्ण आहेत
पण ऑनलाईन NISHTHA Training सुरू केले नाही अशा सर्व शिक्षकांनी
दिनांक 1ते 15 मार्च 2021 दरम्यान ऑनलाईन निष्ठा प्रशिक्षण पूर्ण करावे.
ऑनलाईन उत्तर चाचणी प्रमाणपत्र
दिनांक 15 मार्च नंतर निष्ठा प्रशिक्षणाचे सर्व अठरा मोड्युलची मिळून एक ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण उत्तर चाचणी राष्ट्रीय स्तरावरुन आयोजित केली जाईल
ऑनलाईन निष्ठा प्रशिक्षण संदर्भात उत्तर चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या शिक्षकांना CIET,NCERT, नवी दिल्ली मार्फत अंतिम प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे
NISHTHA Training चे उत्तर चाचणी यशस्वी पूर्ण झाल्यावर ज्या शिक्षकांनी सदर प्रशिक्षणाचे सर्व अठरा मोड्युलची कोर्स पूर्ण झाल्यावर आपल्याला प्रमाणपत्र आपल्या Diksha App लॉगिन ला देण्यात येईल


माझे सर्व मोडयुल पुर्ण झाले आहेत अंतिम प्रमाणपत्र केव्हाव कसे मिळेल याबाबत माहिती द्यावी हि विनंती
ReplyDeleteआपली प्रतिक्रिया व सूचना