Tilimili Mahamalika Broadcast On Sahyadri Channel

 टिलीमिली महामालिका सह्याद्री

 वाहिनीवरून प्रसारण


वर्ग पाचवी ते आठवीतील 

विद्यार्थ्यांकरिता

टिलीमिली नाटिकांची महामालिका" पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांसाठी मनोरंजनातून अभ्यास सोमवार दिनांक १५ मार्च २०२१ पासून 'दूरदर्शन-सह्याद्री' वाहिनीवरून प्रसारण सुरू

"एमकेसीएल नॉलेज फाऊन्डेशन' या पुण्यातील स्वयंसेवी संस्थेने पाचवी ते आठवी इयत्तांच्या दुसऱ्या सत्राच्या सर्व विषयांचे मराठी माध्यमातील शिक्षण दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर "टिलीमिली नाटिकां" मनोरंजनातून देण्याचे ठरविले आहे

 प्रत्येक इयत्तेसाठी दररोज दोन नाटिका प्रमाणे ४८ नाटिकांचा संच सादर केला जाईल. सर्व इयत्ता मिळून एकूण १९२ नाटिका सादर केल्या जातील,

महाराष्ट्राच्या महानगरापासून तर आदिवासी पाड्यांपर्यंत राहणाऱ्या लक्षावधी शालेय  विद्यार्थ्यांनी, पालकांनी व शिक्षकांनी या मालिकेच्या पहिल्या सत्रातील दैनदिन प्रसारणाचा लाभ घेतला होता.

 आता दुसऱ्या सत्रातही या नि:शुल्क सेवेचा लाभ राज्यात सर्वदूर राहणाच्या लक्षावधी टिली व मिली' अर्थात मुले व मुली त्यांच्या घरच्या, शेजारच्या किंवा परिसरातल्या दूरचित्रवाणी संचावर दिनांक १५ मार्च २०२१ पासून दिनांक १० एप्रिल २०२१ पर्यंत दररोज घेऊ शकतील,

बालरंगभूमी क्षेत्रातील प्रयोगशील मार्गदर्शिका श्रीमती स्वाती उपाध्ये तसेच त्यांच्या "प्रेरणा - एक कलामंच" या टीममधील तज्ज्ञ सहकारी व उत्साही आणि अनुभवी असे बालकुमार कलाकार या महामालिकेच्या निर्मितीत सहभागी झाले आहेत.

सर्वांनीही अवश्य पहावी

ही मालिका मुलांसोबत पालकांनी, शिक्षकांनी व मनोरजात्मक असल्याने इतर सर्वांनीही अवश्य पहावी. मुलांनी सादर केलेल्या नाटिका हेच या मालिकेतील शिक्षणाचे मुख्य माध्यम असल्याने मराठी समजणाऱ्या पण अमराठी माध्यमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या मालिकेचा पुरेपूर आस्वाद घेता येईल,

महामालिका

"टिलीमिली नाटिकामध्ये रंजक संवाद, वेधक प्रसंग, कसदार अभिनय, कलात्मक नेपथ्य, बाहल्यांचे खेळ, Role प्ले, चित्र,

प्रतिकृती, प्रयोग, शोध, खेळ, संगीत, गाणी, गप्पा गोष्टी या सर्वांची रेलचेल पहायला मिळेल.

 मुले नाट्यमय कृतींतून परस्परांच्या मदतीने स्वतःची अर्णबाधणी स्वतःच कशी करतात आणि शिकण्याचा आनंद लुटतात हे या मालिकेत सतत पहायला मिळेल. आनंददायक व ज्ञानरचनावादी प्रक्रिया आणि नाट्यामधून येणारी रंजकता यांचा सुरेख संगम या मालिकेतील प्रत्येक नाटिकेत अनुभवता येईल

सह्याद्री' दूरदर्शनवरील ही 

महामालिका 

  • टाटा स्काय वर १२७४,
  •  एअरटेल वर ५४८,
  •  डिश टीवी वर १२२९ 
  • व्हिडिओकॉन d2h वर ७६९, 
  • डीडी फ्रीडिश वर ५२५ आणि
  •  हायवेवर ५१३ या क्रमांकाच्या चॅनल्सवर उपलब्ध  येईल.

वेळापत्रक

"टिलीमिली' महामालिकेचे दैनंदिन प्रसारण (रविवार वगळून) खालीलप्रमाणे असेल:

इयत्ता पाचवी ते आठवी

सोमवार, दिनांक १५ मार्च २०२१ ते शनिवार, दिनांक १० एप्रिल २०२१

इयत्ता वेळ 

आठवी

सकाळी ७.३० ते ८.३०

सातवी

सकाळी ९ ते १०,००

सहावी

 सकाळी १० ते ११.००

पाचवी

सकाळी ११.३० ते दुपारी १२.३०

वर दर्शविलेल्या प्रत्येकी एक तासात त्या त्या इयत्तेसाठी प्रत्येकी २५ मिनिटांच्या दोन नाटिका सादर होतील व त्यात ५ मिनिटांचे मध्यंतर असेल

आता LIVE पहा आपल्या मोबाईलवर 
खालील Link वर क्लिक करा

Live पहा

एमकेमीएल नीलेज फाउंदेशनचे प्रसिद्धीपत्रक

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad