वर्धापन दिन समारंभ 1 मे 2021
महाराष्ट्र दिन साजरा करण्याबाबत मार्गदर्शन सूचना
महाराष्ट्र राज्य स्थापना
शासन परिपत्रक
महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोनाबाधितांची वाढती रुग्ण संख्या विचारात घेवून कोरोना विषाणुची साखळी तोडण्यासाठी (Break The Chain) व सदर विषाणूचा प्रसार आपत्ती व्यवस्थापन विभागाने दि. १३ एप्रिल २०२१ च्या आदेशान्वये दि.१ मे २०२१ च्या सकाळी ७.०० वाजेपर्यंत राज्यात संचारबंदीसह कडक निर्बंध लागू केले आहेत. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठीच्या तरतुदी विचारात घेवून राज्यात महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६१ वा वर्धापन दिन समारंभ गतवर्षी प्रमाणेच अत्यंत साधेपणाने आयोजित करण्याच्या दृष्टीने खालीलप्रमाणे निदेश देण्यात येत आहेत:
१) जिल्हा मुख्यालयात केवळ एकाच ठिकाणी सकाळी ८.०० वा. फक्त ध्वजारोहण करण्यात यावे. विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी विभागीय आयुक्त पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक व अमरावती यांनी ध्वजारोहण समारंभाकरीता योग्य तो व्यवस्था करावी. तेथील जिल्हाधिका-यांनी ध्वजारोहणाचा वेगळा कार्यक्रम आयोजित करु नये.
इतर सर्व जिल्ह्यात केवळ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्यालयाच्या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात यावे.
२) वरील नमुद ठिकाणी केवळ पालकमंत्री विभागीय आयुक्त मुख्यालयी समारंभ असल्यास विभागीय आयुक्त, महापौर/नगराध्यक्ष, जिल्हाधिकारी, ज्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय आहे त्या ठिकाणचे पोलीस आयुक्त आयुक्त, महानगरपालिका, जिल्हा पोलीस अधिक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद एवढयाच पदाधिकारी/अधिकारी यांनी उपस्थित रहावे, सदर कार्यक्रमाकरिता इतर मान्यवरांना आमंत्रित करण्यात येवू नये,
(३) कवायती/संचलन आयोजन करण्यात येवू नये.
४) विधीमंडळ, मा. उच्च न्यायालय व इतर संविधानिक कार्यालयांमध्ये कमीत कमी उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात यावे.
ध्वजारोहण करणारे पालकमंत्री महोदय काही अपरिहार्य कारणामुळे कार्यक्रमस्थळी उपस्थित राहू न शकल्यास, विभागीय आयुक्त मुख्यालयो विभागीय आयुक्तांनी व जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिकारी यांनी ध्वजारोहण करावे.
६) आपत्ती व्यवस्थापन विभागाने कोविड-१९ च्या अनुषंगाने दिलेल्या सुरक्षित वावर व इतर सर्व नियमाचे काटेकोर पालन करण्यात यावे. सर्वांसाठी मास्क बंधनकारक राहील, याची दक्षता घेण्यात यावी.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नांवाने,
(राजेंद्र गायकवाड )
अवर सचिव,
महाराष्ट्र शासन


आपली प्रतिक्रिया व सूचना