सन २०२१-२२ च्या इयत्ता ११ वी
प्रवेशासंदर्भात कार्यपध्दती
निश्चित करण्याबाबत
सन २००९-१० या शैक्षणिक वर्षापासून मुंबई, ठाणे व रायगड जिल्हयातील मुंबई महानगर विकास प्राधिकरण (MMRDA) क्षेत्रातील सर्व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामध्ये इ.११ वी प्रवेश ऑनलाईन पध्दतीने करण्याबाबत संदर्भाधीन क्रमांक २ येथील दि.२८.०५.२००९ च्या शासन निर्णयान्वये आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे संदर्भाधीन क्रमांक ५ येथील दि.०३.०३.२०१४ च्या शासन पत्रान्वये सन २०१४-१५ या शैक्षणिक वर्षापासून पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील इ.११ वी चे प्रवेश ऑनलाईन पध्दतीने करण्याबाबत शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे. इ. ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया मुंबई महानगर विकास प्राधिकरण (MMRDA) पुणे आणि पिंपरी-चिंचवड क्षेत्रासोबत सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून नागपूर, अमरावती, नाशिक, औरंगाबाद या महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय यांना लागू करण्याचा निर्णय संदर्भाधीन क्रमांक १० येथील दि.०७.०१.२०१७ च्या शासन निर्णयान्वये घेण्यात आला. इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी वेळोवेळी संदर्भाधीन शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत.
उपरोक्त नमुद महानगरपालिका क्षेत्रांव्यतिरिक्त राज्यातील अन्य शहरी व ग्रामीण भागांमध्ये ११ वी प्रवेश हे कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर ऑफलाईन पद्धतीने करण्यात येतात.
असामान्य परिस्थितीमुळे इ. १० वीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे तसेच परीक्षेसंदर्भातील सर्व घटकांचे हित लक्षात घेऊन मा. मंत्रिमंडळाने खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे:
सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत आयोजित करण्यात येणारी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ. १० वी) रद्द करण्यात यावी.
तसेच इ. १०वीच्या परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट इ. ११ वी मध्ये प्रवेश देण्यात यावा." मा. मंत्रीमंडळाने घेतलेल्या प्रस्तुत निर्णयाच्या अनुषंगाने, इ. १० वीची परीक्षा रद्द करण्याबाबत
दि. १२ मे २०२१ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. परीक्षा रद्द केल्यामुळे गुणपत्रक / प्रमाणपत्र देण्याबाबत स्वतंत्रपणे निर्देश निर्गमित करण्यात येतील असे स्पष्ट करण्यात आले.
मा. मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार तसेच इ. १० वीची परीक्षा रद्द केल्यामुळे सन २०२१-२२ या वर्षासाठी इ. ११ वी प्रवेशासाठी कार्यपध्दती ठरविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय:
मा. मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षामध्ये
इ. १० वीच्या परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट इ. ११ वी मध्ये प्रवेश देण्यात यावा. सन २०२१-२२ या वर्षासाठी इ. ११ वी प्रवेशासाठी खालीलप्रमाणे कार्यपध्दती ठरविण्यात येत आहे:
सामाईक प्रवेश परीक्षा (CET)
१. इ. ११ वी प्रवेशासाठी संपूर्ण राज्यामध्ये एक सामाईक प्रवेश परीक्षा (CET) घेण्यात येईल.
२. सदर सामाईक प्रवेश परीक्षा राज्य मंडळाच्या इ. १० वीच्या अभ्यासक्रमावर आधारीत असेल
३. सदर सामाईक प्रवेश परीक्षेसाठी प्रश्न पत्रिकेचे स्वरूप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाचे
(Multiple Choice Objective Type Questions) असेल. सदर परीक्षा O.M.R. आधारीत असेल
४. सदर सामाईक प्रवेश परीक्षा १०० गुणांची राहील व परीक्षेचा कालावधी दोन तासांचा असेल
५. इ. ११ वी प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा (CET) ही विद्यार्थ्यांसाठी पूर्णत: ऐच्छिक असेल.
इ. ११ वीची प्रवेश प्रक्रीया राबविताना सामाईक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना सामाईक प्रवेश परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्राधान्य देण्यात येईल.
म्हणजेच इ. ११ वीच्या प्रवेश प्रक्रीयेच्या पहिल्या टप्यामध्ये सामाईक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्राधान्याने प्रवेश देण्यात येईल.
सामाईक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशानंतर, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये रिक्त राहीलेल्या उर्वरित जागा ज्या विद्यार्थ्यांनी सामाईक प्रवेश परीक्षा दिलेली नाही अशा विद्यार्थ्यांसाठी खुल्या असतील
व त्या जागांवर सामाईक प्रवेश परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता १० वीच्या मुल्यमापन पध्दतीनुसार मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येतील. स
२०२१-२२ या वर्षासाठी इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रीयेबाबत सर्वसमावेशक मार्गदर्शक सूचना स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील.


आपली प्रतिक्रिया व सूचना