Ads Area

SSC Maharashtra Evaluation Guidelines

वर्ग १०वी मुल्यमापन कार्यपद्धती बाबत

 अध्ययन अध्यापन प्रक्रियेची फलनिष्पती तपासण्यासाठी व विद्यार्थ्यांची संपादन पातळी नि करण्यासाठी मूल्यमापन प्रक्रिया महत्वपूर्ण आहे. कोविड १९ च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रा मंडळामार्फत आयोजित करण्यात येणारी शैक्षणिक वर्ष २०२०- २१ मधील इयत्ता दहावीची लेखी परीक्षा करण्यात आली असली तरी वर्षभर शाळांमध्ये शिक्षकांनी ऑनलाइन, ऑफलाईन अध्यापन करत असत

व्हाट्सअप बेस्ड मूल्यमापन, कृतीपुस्तिका, गृहकार्य, स्वाध्याय, सराव चाचण्या, प्रथम सत्र पर परीक्षा इत्यादी विविध मार्गांनी विद्यार्थ्यांचे ऑनलाईन / ऑफलाईन मूल्यमापन केलेले आहे. इयत्ता ९ वी १० वी साठी सुधारित मूल्यमापन योजना शासन निर्णय दिनांक ०८ ऑगस्ट

नुसार सन २०१९-२० पासून लागू करण्यात आली आहे. सदर मूल्यमापन योजनेनुसार विद्यार • विषयासाठी १०० गुणांचे मूल्यमापन करण्यात येते. यामध्ये इ. १० वी साठी प्रत्येक विषयाची लेखी परीक्षा व २० गुणांची तोंडी/प्रात्यक्षिक परीक्षा / अंतर्गत मूल्यमापन परीक्षा मंडळामार्फत मंडळामार्फत घेण्यात येणारी परीक्षा रद्द केल्यामुळे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी दि. १८ मे २०२१ रोजी शासनास सादर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने शैक्षणिक वर्ष मधील इ. १० वी च्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये इयत्ता ९ वीचे विषयनिहाय सरा प्रथम सत्र परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन यांच्या आधारे संपादणूकीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन कर निकाल जाहीर करण्यात आलेले आहेत. इयत्ता ९ वी चे मूल्यमापन हे सन २०१९-२० मध्ये कोि परिस्थितीपूर्वी करण्यात आलेले आहे व विद्यार्थ्यांचे संपादणूकीचे विश्वासार्ह अभिलेख सरल देखील उपलब्ध आहेत. याचा विचार करून इ. ९ वी अंतिम मूल्यमापन व इ. १० वी वर्षभरातील विविध मूल्यमापन साधनांद्वारे करण्यात आलेल्या मूल्यमापनाच्या आधारे माध्यमिक शालांत (इ. १० वी) परीक्षा सन २०२१ चा निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. ही अ परिस्थितीतील सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठीची तात्पुरती व्यवस्था आहे.

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेचा निकाल तयार क पुढीलप्रमाणे कार्यपद्धती अवलंबण्यात यावी.

अ) नियमित विद्यार्थ्यांसाठी कार्यपद्धती

इयत्ता ९ वी व इयत्ता १० वी या दोन्ही इयत्तांसाठी विषयनिहाय मूल्यमापन योजना ही स याच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये इयत्ता ९ वीचे विषयनिहाय सराव चाचण्या, प्रथम अंतर्गत मूल्यमापन यांच्या आधारे संपादणूकीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करून वार्षिक निक करण्यात आलेले आहेत. कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे शैक्षणिक वर्ष २०२०- २१ मध्ये राज्यात भागातील शाळा या स्थानिक परिस्थितीमुळे एकाचवेळी सुरू होऊ शकल्या नाहीत. तसेच राज्या शाळांमध्ये इ.१० वी च्या मूल्यमापन प्रक्रियेतील सराव चाचण्या, प्रथम सत्र परीक्षा, सराव परी सर्वच परीक्षा घेण्यात आल्या आहेतच असे नाही.

वरील वस्तुस्थिती विचारात घेता वस्तुनिष्ठ मूल्यमापन होण्या राध्यमि प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा सन २०२१ चा निकाल तयार करताना विद्य मधील इयत्ता ९ वी ची अंतिम संपादणूक आणि इ. १० वी मध्ये वर्षभरातील श) आधारे प्राप्त संपादणूक यांचा खालीलप्रमाणे एकत्रित विचार करण्यात यावा.


१. विद्यार्थ्याच्या शैक्षणिक वर्ष २०१९-२० मधील इ. ९ वीच्या अंतिम निकालातील विषयनिहाय १०० पैकी गुणांचे इ.१० वी साठी विषयनिहाय ५० पैकी गुणात रूपांतर करणे.


[. मंडळामार्फत शाळांना गुण भरण्याची संगणकीय प्रणाली उपलब्ध करून देण्यात येईल. त्यामध्ये इ. १० वी परीक्षेसाठी प्रविष्ट असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे इ. ९ वीच्या अंतिम निकालाचे विषयनिहाय १०० पैकी प्रत्यक्ष प्राप्त गुण भरण्याची सुविधा असेल. यामध्ये शाळांनी गुण भरल्यानंतर सदर गुणांचे विषयनिहाय ५० गुणांत संगणकीय प्रणालीव्दारे रूपांतर करण्यात येईल.

सदर गुणांची वस्तुनिष्ठता पडताळण्यासाठी शाळांनी शैक्षणिक वर्ष २०१९-२० मधील इ. ९

वीच्या सरल प्रणालीमध्ये शाळांनी नमूद केलेल्या इ. ९ वी च्या विद्यार्थीनिहाय वार्षिक


निकालावरून करण्यात येईल. शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये इयत्ता ९ वीचे विषयनिहाय


सराव चाचण्या प्रथम सत्र परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन यांच्या आधारे संपादणूकीचे


वस्तुनिष्ठ मूल्यमापन करून वार्षिक निकाल जाहीर करण्यात आलेले आहेत. २. विद्यार्थ्याच्या इ. १० वीच्या प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा यामधील एक वा अधिक लेखी परीक्षांमधील विषयनिहाय ८० पैकी प्राप्त गुणांचे ३० पैकी गुणांत रूपांतर करणे.


विद्यार्थ्याने प्रथम सत्र परीक्षा, सराव (पूर्व) परीक्षा या दोन्ही परीक्षा दिल्या असल्यास सदर


दोन परीक्षांपैकी सर्वोत्तम एकूण गुण असलेल्या एका परीक्षेचे विषयनिहाय प्राप्त गुण विचारात घेऊन त्या ८० पैकी प्राप्त गुणांचे ३० पैकी गुणांत रुपांतर करण्यात यावे. ॥ विद्यार्थ्याने प्रथम सत्र परीक्षा, सराव (पूर्व) परीक्षा यामधील एकच परीक्षा दिली असल्यास त्या परीक्षेतील विषयनिहाय ८० गुणांपैकी प्राप्त झालेल्या गुणांचे ३० पैकी गुणांत रुपांतर


करावे, अपवादात्मक परिस्थितीत ज्या माध्यमिक शाळांमध्ये प्रथम सत्र व सराव परीक्षा या परीक्षांचे आयोजन करणे शक्य झाले नाही अशा शाळांनी वर्षभरात इ.१० वीच्या अभ्यासक्रमावर आयोजित केलेल्या सराव चाचण्या, स्वाध्याय, गृहकार्य, प्रकल्प यापैकी एक किंवा अधिक कार्याला विद्यार्थ्यास विषयनिहाय प्राप्त झालेल्या एकूण गुणांचे ३० पैकी गुणात रुपांतर करावे,


( विषयनिहाय ३० गुणांपेक्षा जास्त अथवा कमी गुणांचे मूल्यमापन केले असल्यास त्याचे ३० पैकी गुणांत रुपांतर करावे.) iv. ज्या शाळांमध्ये वरील प्रमाणे मूल्यमापन करणे शक्य झाले नाही त्यांनी सराव चाचण्या,


स्वाध्याय, गृहकार्य, प्रकल्प इत्यादी पैकी एक किंवा अधिक बाबींची पूर्तता करून घेऊन त्या


आधारे विद्यार्थ्यास विषयनिहाय प्राप्त झालेल्या एकूण गुणांचे ३० पैकी गुणात रुपांतर


करावे. उपरोक्तप्रमाणे अंतिम केलेले विद्यार्थीनिहाय व विषयनिहाय ३० पैकी गुण मंडळाच्या संगणक प्रणालीत भरण्यात यावेत.

३. मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार विद्यार्थ्यास इ. १० वीच्या अंतिम तोंडी / प्रात्यक्षिक परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन यामध्ये प्रत्यक्ष प्राप्त झालेले २० पैकी गुण अंतिम निकालात समाविष्ठ करणे.


ज्या माध्यमिक शाळांनी विषयनिहाय मंजूर आराखड्यानुसार तोंडी / प्रात्यक्षिक परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन केलेले आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यास विषयनिहाय प्रत्यक्ष प्राप्त झालेले २० पैकी गुण संगणकीय प्रणालीत भरण्यात यावेत.


अपवादात्मक परीस्थितीत ज्या माध्यमिक शाळांमध्ये तोंडी/ प्रात्यक्षिक परी मूल्यमापन करण्यात आले नसेल ते शाळांनी मंडळाच्या प्रचलित कार्यपध्द करावे.


याशिवाय श्रेणी विषयांसाठी विद्यार्थ्यांना प्राप्त झालेल्या श्रेणी संगणक प्रणाली करावी.

  • ९ वी च्या निकालाचे  ५० गुण
  • लेखी   ३० गुण
  • प्रात्यक्षिक व तोंडी  २० गुण
  • प्रत्येक विषय  १०० गुण
  • एकूण  ६०० गुण

विद्यार्थ्यांचे दहावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन 30 गुण,*


*विद्यार्थ्यांचे दहावीचे गृहपाठ तोंडी परीक्षा/ प्रात्यक्षिक परीक्षा यांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापन 20 गुण*


*विद्यार्थ्यांचा नववीचा विषयनिहाय अंतिम निकाल 50 गुण याप्रमाणे विषयनिहाय एकूण 100 गुण (नववी संपादणूक यासाठी 50 टक्के भारांश आणि दहावी संपादणूक यासाठी 50 टक्के भारांश)*

४. उपरोक्त कार्यप्रणालीनुसार अंतिम करण्यात आलेल्या निकालाने समाधान न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी कोविड -१९ ची परिस्थिती सर्वसामान्य झाल्यानंतर राज्य मंडळामार्फत प्रचलित पध्दतीनुसार आयोजित केल्या जाणाऱ्या श्रेणीसुधार योजनेअंतर्गत यापुढील लगतच्या दोन परीक्षांमध्ये प्रविष्ठ होण्याची संधी उपलब्ध असेल. माध्यमिक / उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा श्रेणीसुधार योजनेचे (Class Improvement Scheme) सर्व नियम या विद्यार्थ्यांना लागू असतील.


ब) पुनर्परीक्षार्थ्यांसाठी कार्यपद्धती

मूल्यमापनाचा तपशिल

१. राज्य मंडळाच्या यापूर्वीच्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या

विषयांमध्ये लेखी परीक्षेत प्राप्त गुणांची सरासरी विद्यार्थ्याचे इ.१० वीचे अंतिम तोंडी/ प्रात्यक्षिक परीक्षा

अंतर्गत मूल्यमापन

एकूण गुण

गुण

८० गुण

२० गुण

१०० गुण


१. राज्य मंडळाच्या यापूर्वीच्या परीक्षेत एक वा अधिक विषयांत अनुतीर्ण झाल्यामुळे पुनर्परीक्षार्थी म्हणून प्रविष्ट झालेल्या विद्याथ्र्यांच्या बाबतीत त्याने मंडळाच्या यापूर्वीच्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विषयांच्या लेखी परीक्षेतील ८० पैकी प्राप्त गुणांच्या सरासरी एवढे गुण प्रविष्ट झालेल्या विषयाच्या लेखी परीक्षेसाठी संगणक प्रणालीमार्फत देण्यात येतील.


ज्या वर्षामध्ये १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात आली आहे त्या वर्षीच्या उत्तीर्ण विषयांबाबत १०० गुणांचे ८० गुणात रुपांतर करून, सरासरी एवढे गुण प्रविष्ट झालेल्या विषयांच्या लेखी परीक्षेसाठी संगणक प्रणालीमार्फत देण्यात येतील.


माध्यमिक शाळांनी अशा विद्यार्थ्यांचे यापूर्वी उत्तीर्ण झालेल्या विषयासमोर संगणक प्रणालीमध्ये परीक्षेचे वर्ष व बैठक क्रमांक अचूक नोंदवावेत.


२. राज्य मंडळाच्या यापूर्वीच्या परीक्षांमध्ये एकाही विषयांत उत्तीर्ण न झालेल्या पुनर्परीक्षार्थ्याच्या बाबतीत. संबंधीत शाळांनी सराव चाचण्या, स्वाध्याय, गृहकार्य, प्रकल्प यापैकी एक किंवा अधिक बाबींची पूर्तता करून त्या आधारे विद्यार्थ्याचे मूल्यमापन करून विषयनिहाय ८० पैकी गुणदान करावे व ते संगणकीय

प्रणालीमध्ये भरावेत. अशा पुनर्परीक्षार्थ्यांच्या बाबतीत सदर विद्यार्थ्यास इ. ९ वीमध्ये प्राप्त झालेल्या एकूण गुणांची टक्केवारी संगणक प्रणालीमध्ये भरण्यात यावी.

३. खाजगी पुनर्परीक्षार्थ्यांच्या बाबतीत सदर विद्यार्थ्यास या पूर्वीच्या अंतिम इयत्तेत (इ.५ वी ते ९ वी मध्ये प्राप्त झालेल्या एकूण गुणांची टक्केवारी संगणक प्रणालीमध्ये भरण्यात यावी.

४. माध्यमिक शाळांनी विषयनिहाय प्रचलित मूल्यमापन आराखड्यानुसार तोंडी / प्रात्यक्षिक परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन केलेले आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यास विषयनिहाय प्रत्यक्ष प्राप्त झालेले २० पैकी गुण संगणकीय प्रणालीत भरण्यात यावेत.

५. अपवादात्मक परीस्थितीत ज्या माध्यमिक शाळांमध्ये तोंडी / प्रात्यक्षिक परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन करण्यात आले नसेल ते शाळांनी मंडळाच्या प्रचलित कार्यपध्दतीनुसार पूर्ण करावे.

अधिक माहिती करिता खालील लिंक वर क्लिक करा

शासन परिपत्रक

निकाल जून महिन्यात लागणार

शासन परिपत्रक डाऊनलोड करा

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad