ONLINE PROFESSIONAL DEVELOPMENT For EDUCATION LEADER PROGRAM

ऑनलाईन व्यावसायिक विकास

 कार्यक्रम

शालेय शिक्षण विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी
प्राचार्य,
वरिष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता,
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व),
 शिक्षणाधिकारी
 (प्राथमिक , माध्यमिक ,निरंतर )
 गटशिक्षणाधिकारी (सर्व),
विस्तार अधिकारी,(सर्व )
 केंद्र प्रमुख (सर्व )

विषय- शैक्षणिक नेतृत्त्वाचा ऑनलाईन व्यावसायिक विकास कार्यक्रम

आपणास ज्ञात असल्याप्रमाणे, *राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे, च्या वतीने  शिक्षण विभागातील अधिकारी यांच्या व्यावसायिक विकासासाठी 'ऑनलाईन व्यावसायिक विकास मंच' सन २०२०-२१ मध्ये तयार करण्यात आला होता. गतवर्षी  एकूण २८ खुले सत्र घेण्यात आली होती.
यामध्ये मा.मंत्री महोदया, श्रीमती. वर्षाताई गायकवाड, शालेय शिक्षण विभाग,
महाराष्ट्र राज्य ते राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शकांचे विविध सत्रे घेण्यात आली होती.

  सन २०२१-२२ मध्ये   
शैक्षणिक नेतृत्त्वाचा ऑनलाईन व्यावसायिक विकास कार्यक्रम

(ONLINE PROFESSIONAL DEVELOPMENT( OPD) For EDUCATION LEADER  PROGRAM)
 याची सुरुवात दिनांक ८ मे,२०२१ पासून करत आहोत.
 कोविड १९ च्या या परिस्थितीत अधिकारी यांचा व्यवसायिक विकास होऊन नवीन आव्हाने पेलण्याची मानसिकता, क्षमता ,कार्यप्रवणता , सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. यासाठी प्रेरणादायी, आरोग्य, नवीन शैक्षणिक धोरण, माहिती अधिकार ...अशा विविध विषयांवर परिषदेच्या CPD व IT विभागाच्या मार्फत विविध व्याख्याने  आयोजित करण्यात येणार आहेत.

कालावधी

           तरी या कार्यक्रमाचे  पहिले (१ ले) सत्र 
शनिवार दिनांक ०८ मे, २०२१ रोजी
वेळ  दु. ०२.४५ ते दु. ०४.३० वेळेत पार पडणार आहे. आपण सर्वांनी सदरच्या ऑनलाईन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.

विषय- भविष्यवेधी सर्वस्पर्शी 

शिक्षण


प्रमुख मार्गदर्शक- डॉ.बी.एम.हिर्डेकर

या सत्रसाठी YouTube वर उपस्थित राहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे

*दिनकर टेमकर* 
संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad