शिष्यवृत्ती परीक्षा करिता शाळा व विद्यार्थी सहभाग वाढविणेबाबत
प्रशासन अधिकारी / शिक्षण प्रमुख / शिक्षणाधिकारी, म.न.पा. शिक्षण मंडळ, (सर्व) ६. गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती, (सर्व)
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) करीता शाळा / विद्यार्थी सहभाग वाढविणेबाबत...
संदर्भ :- शिष्यवृत्ती परीक्षा अधिसूचना
उपरोक्त विषयानुसार आपणास कळविण्यात येते की, राज्यातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती देण्याची योजना महाराष्ट्र राज्य शासनाने शैक्षणिक वर्षापासून सुरु केली आहे. जेणेकरुन हुशार व प्रज्ञावान विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे व त्यांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य व्हावे आणि त्यांचा आदर्श घेवून इतर विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी. सदर परीक्षेला शालेय स्तरावर अनन्य साधारण महत्त्व असून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून त्याचे दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या अथवा तिसऱ्या आठवड्यात आयोजन करण्यात येते.
निरिक्षण केले असता सन २०१५ पर्यंत इ. ४ थी व इ. ७ वी हे वर्ग जिल्हा परिषद शाळांना जोडलेले असल्याने शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ट होणान्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय होती.
तथापि शिष्यवृत्ती परीक्षेच्या स्तर बदलामुळे सन २०१७ पासून विद्यार्थी संख्येत कमालीची घट झालेली आहे
इ. ५ वी व इ. ८ वी हे दोन्ही वर्ग प्रामुख्याने माध्यमिक शाळांना संलग्न असून माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापक / शिक्षकांना शिष्यवृत्ती परीक्षेच्या माहितीच्या अभावामुळे विद्यार्थी संख्येत निम्म्याने घट झाल्याचे दिसून येते.
उपरोक्त सर्व बाबींचा विचार करता आपणास आदेशित करण्यात येते की, शिष्यवृत्ती परीक्षा करीता शिक्षणाधिकारी (प्राथमिक / माध्यमिक), गटशिक्षणाधिकारी व प्रशासन अधिकारी यांनी आपल्या जिल्हा / तालुका है महानगरपालिकेतील जास्तीत जास्त विद्यार्थी प्रविष्ट होतील या दृष्टीने आपल्या स्तरावरून खालीलप्रमाणे कार्यवाही करावी.
१. आपल्या अधिनस्त जिल्हा / तालुका / महानगरपालिकेतील १०० % शाळांमधील इ. ५ वी व इ. ८ वीचे किमान ५० % विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट करावे.
२. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख यांची व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी जिल्ह्यातील सर्व खाजगी शाळा मुख्याध्यापकांची ऑनलाईन विशेष सभा आयोजित करुन शाळा व विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करावे.
३. सर्व गटशिक्षणाधिकारी यांनी तालुक्यातील अधिनस्त सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांची ऑनलाईन विशेष सभा घेऊन शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सहभागी शाळा व विद्यार्थ्यांचे माहितीचा दररोज आढावा घ्यावा व सहभाग न नोंदविलेल्या शाळांना आवश्यक त्या सूचना द्याव्यात.
४. परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांपैकी जास्तीत जास्त विद्यार्थी उत्तीर्ण होतील यासाठी शाळास्तरावरुन ऑनलाईन विशेष मार्गदर्शनपर वर्गांचे आयोजन करावे. विशेष सभा / कार्यशाळेमध्ये शिष्यवृत्ती परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित बालभारतीकडून छपाई करण्यात आलेल्या मार्गदर्शिकेची माहिती करून द्यावी, जेणेकरुन विद्यार्थ्यांना सदर परीक्षेची तयारी करणे सोयीचे होईल. (मराठी, इंग्रजी, उर्दु व हिंदी या माध्यमांमध्ये शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शिका बालभारतीच्या सर्व विभागीय भांडारामध्ये छापील किंमतीवर १५ % सवलतीसह विक्रीस उपलब्ध आहेत.) शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांनी आपल्या अधिनस्त असणारे सर्व गटशिक्षणाधिकारी / विस्तार अधिकारी / केंद्रप्रमुख / सर्व शाळा मुख्याध्यापकांना याबाबत परिपत्रकाव्दारे सूचित करावे.
५. सदर परीक्षेस जास्तीत जास्त शाळा / विद्यार्थी सहभागी व्हावेत याकरीता आपल्या जिल्हयांतील प्रमुख
वर्तमानपत्रांमधून विनामूल्य प्रसिध्दी देऊन आवाहन करावे. उपरोक्त बाबींचा राज्यस्तरावरुन आढावा घेण्यात येणार असल्याने सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक यांनीही आपल्या अधिनस्त सर्व जिल्हयांचा वेळोवेळी आढावा घ्यावा.
उपरोक्तनुसार प्राधान्याने कार्यवाही करावी
(तुकाराम सुपे)
आयुक्त तथा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,
पुणे ०१.


आपली प्रतिक्रिया व सूचना