विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी व अद्ययावतीकरण करणे आणि विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची माहिती स्टुडंट पोर्टलवरमध्ये अद्ययावत करणेबाबत.
विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची माहिती स्टुडंट पोर्टलवर अद्ययावत करणेकरीता आपणास खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.
१. विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी व अद्ययावतीकरण करण्यासाठी प्रत्येक गटसाधान केंद्रावर दोन याप्रमाणे एकूण ८१६ आधार नोंदणी संच उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. सदर आधार नोंदणी संचाद्वारे विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी व अद्ययावतीकरणाचे कामकाज करण्यासाठी आत्तापर्यंत संचालनालय स्तरावरून व्यस्त संस्थेमार्फत .४८१ आधार ऑपरेटरची सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तथापि सद्यस्थितीमध्ये कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची आधार नोंदणी व अद्ययावतीकरणाचे कामकाज पुढील आदेशापर्यंत थांबवण्यात आले आहे. याबाबतच्या विस्तृत सुचना संदर्भ क्र. ४ च्या पत्राद्वारे दिल्या आहेत.
विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी व अद्ययावतीकरणाच्या कामकाजासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत आधार नोंदणी संच (Aadhar Enrolment kit) उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सद्यस्थितीमध्ये शाळा बंद असल्यामुळे आधार नोंदणी व अद्ययावतीकरणाचे कामकाज थांबवण्यात आल्यामुळे आधार नोंदणी संच (Aadhar Enrollment kit) पंचायत समिती स्तरावर सुस्थितीमध्ये जतन करुन ठेवण्यात यावेत व याबाबतचा अहवाल प्राथमिक शिक्षण संचालनालयास व महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेस तात्काळ सादर करण्यात यावा.
आधार नोंदणी संचामध्ये युआयडीएआय यांचेकडील सॉफ्टवेअर अद्ययावत करुन सदर संच युआयडीएआयच्या प्रणालीशी संलग्नित करण्यात आलेला आहे. त्यामुळे आधार नोंदणी संचातील (Aadhar Enrollment kit) साहीत्याचा वापर इतर कोणत्याही कामकाजासाठी केला जाणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.
कोविड १९ चा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शैक्षणीक वर्ष सन २०२१-२२ मध्ये शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतल्यानंतर विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी व अद्ययावतीकरणाचे काम पूर्ण क्षमतेने व प्रभाविपणे" करण्याकरीता सुक्ष्म नियोजन करण्यात यावे. जसेकी, विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी व अद्ययावतीकरणाकरीता प्राधान्य क्रमानुसार आधार नोंदणीकेंद्र सुरु करण्याकरीता शाळा निश्चित करणे, आधार नोंदणी केंद्रावर नजिकच्या कोणत्या शाळेमधील विद्यार्थी जातील याचे नियोजन करण्यात यावे. शाळानिहाय ज्या विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी नव्याने करावयाची आहे अथवा विद्यार्थ्यांच्या आधार माहितीमध्ये बदल करावयाचा आहे याचा आढावा घेण्यात यावा आणि उक्त विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणी अथवा अद्ययावतीकरणाचा अर्ज भरून ठेवण्यात यावा. याबाबतचे आवश्यक । प्रशिक्षण शाळेच्या मुख्यध्यापकांना शिक्षकांना देण्यात यावे व इतर अनुषंगीक नियोजन करण्यात यावे.
विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील जिल्ह्यांचे मुद्दा क्र. १.३ मध्ये नमुद केल्याप्रमाणे सुक्ष्म नियोजन करून कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्यात यावा.
विद्यार्थ्याचे क्रमांकाची माहिती सरल प्रणालीअंतर्गत स्टुडंट पोर्टलमध्ये अद्ययावत करण्याच्या सुचना
राज्य शासनाने संदर्भ क्र. २ च्या पत्राद्वारे व संचालनालयाने संदर्भ क्र. ३ च्या पत्राद्वारे दिल्या आहेत. सदर
दोन्ही पत्राचे पुनश्च अवलोकन करण्यात यावे. विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची माहिती स्टुडंट पोर्टल मध्ये
अद्ययावत करण्याकरीता मा. अपर मुख्य सचिव, शालेय शिक्षण विभाग आणि मा. आयुक्त (शिक्षण) यांनी सुद्धा वेळोवेळी बैठका घेऊन उक्त कामकाजाचा आढावा घेतला आहे आणि विहित मुदतीमध्ये सदर कामकाज पुर्ण करण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. तरी विषयाचे गांभिर्य लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची माहिती सरल प्रणालीमध्ये अद्ययावत करण्याची कार्यवाही तात्काळ करण्यात यावी.
२.१ विद्यार्थ्यांकडे उपलब्ध असलेल्या आधार क्रमांकाची माहिती स्टुडंट पोर्टलवरती शाळा लॉगइन वरुन अद्ययावत करण्यात येत आहे
आपली प्रतिक्रिया व सूचना