SSC Maharashtra Exam New Decision

 शालांत प्रमाणपत्र वर्ग १० वी परीक्षा नविन निर्णय

माध्यमिक SSC प्रमाणपत्र वर्ग १० वी परीक्षा रद्द करण्याबाबत

SSC Maharashtra Board Exam

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ माध्यमिक SSC प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा आयोजित करण्यात येते.

 सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी सदर परीक्षा माहे मे २०२१ मध्ये आयोजित करण्याचे प्रस्तावित होते. तथापि, कोविड १९ रोगाच्या प्रार्दुभावामुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे, राज्य मंडळामार्फत आयोजित करण्यात येणारी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा रद्द करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ठ सर्व विद्यार्थ्यांचे तसेच परिक्षेशी संबंधित सर्व घटकांचे हीत लक्षात घेता, शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे:

माध्यमिक SSC प्रमाणपत्र वर्ग १० वी परीक्षा रद्द करण्याबाबत

 माध्यमिक SSC प्रमाणपत्र वर्ग १० वी परीक्षा रद्द करण्याबाबत

शासन निर्णय:

सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कडून आयोजित करण्यात येणारी माध्यमिक शालांत SSC प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा रद्द करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. याअनुषंगाने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, विनियम १९७७ मध्ये आवश्यक ते बदल करण्याबाबत मंडळाने यथोचित कार्यवाही करावी.

इयत्ता दहावीची परीक्षा रद्द केल्यामुळे, गुणपत्रक / प्रमाणपत्र देण्याबाबत तसेच वर्ग ११ वी प्रवेश प्रक्रियेबाबत स्वतंत्रपणे निर्देश निर्गमित करण्यात येतील.

सदरचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेला असून त्याचा संकेतांक क्रमांक २०२१०५१२१२२१४१७६२१ असा आहे. 

शासन परिपत्रक

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( राजेंद्र पवार)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

Tags

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आपली प्रतिक्रिया व सूचना

Top Post Ad

Below Post Ad