Suggestions For Actions Regarding Financial Year Transfers

 आर्थिक वर्षातील बदल्यांसंदर्भात

 करावयाच्या कार्यवाहीबाबतच्या

 सूचना


महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ मधील तरतूदीनुसार
राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रत्येक वर्षी एप्रिल व मे महिन्यात सर्वसाधारण बदल्या करण्यात येतात. तथापि, कोविड १९ च्या संसर्गजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे, मागील सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात सर्वसाधारण बदल्या तसेच काही अपवादात्मक परिस्थितीमुळे किंवा विशेष कारणामुळे करावयाच्या बदल्या दि. ३१ जुलै २०२० पर्यंत करण्याचे आदेश संदर्भाधीन दि. ७ जुलै २०२० च्या शासन निर्णयान्वये निर्गमित केले होते. तदनंतर संदर्भाधीन दि. २३ जुलै २०२० च्या शासन निर्णयान्वये बदलीची मुदत दि.१० ऑगस्ट २०२० पर्यंत वाढविण्यात आली होती.

सन २०२०-२१ हे आर्थिक वर्ष संपून आता, सन २०२१-२२ हे आर्थिक वर्ष सुरु झाले आहे. त्यामुळे प्रशासकीय विभागांकडून सन २०२१-२२ या चालू आर्थिक वर्षात बदली अधिनियमानुसार बदल्या करण्यात याव्यात किंवा कसे याबाबत विचारणा करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने, सन २०२१-२२ या चालू आर्थिक वर्षात राज्य शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत सूचना देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय

सद्यस्थितीत राज्यात कोविड-१९ या संसर्गजन्य रोगाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता, सन २०२१-२२ या चालू आर्थिक वर्षी दि. ३० जून, २०२१ पर्यंत, बदली अधिनियमानुसार कोणत्याही बदल्या (सर्वसाधारण बदल्या तसेच काही अपवादात्मक परिस्थितीमुळे किंवा विशेष कारणामुळे करावयाच्या बदल्या) करण्यात येऊ नयेत, असे या शासन निर्णयान्वये सूचित करण्यात येत आहे.

०२. तथापि, उपरोक्त नमूद कालावधीत केवळ खालील कारणास्तव बदली अनुज्ञेय राहील. १) सेवानिवृत्तीमुळे रिक्त होणारी पदे भरणे.

२) करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील रिक्त पदे भरणे.

३) शासकीय कर्मचाऱ्याच्या विरोधात गंभीर स्वरुपाची साधार तक्रार प्राप्त झाल्यामुळे बदली करणे आवश्यक असल्याची बदली करणाऱ्या सक्षम प्राधिकाऱ्याची खात्री पटल्यास करावयाची बदली.

०३. कोविड-१९ या संसर्गजन्य रोगाच्या प्रादुर्भावाचा वेळोवेळी आढावा घेऊन याबाबत पुढील आदेश निर्गमित करण्याची कार्यवाही करण्यात येईल.

०४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या

संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२१०५१०१६४०३९६००७ असा आहे. 

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad