वर्ग बारावीच्या परीक्षाही रद्द
मोठी बातमी वर्ग दहावी नंतर वर्ग बारावीचीही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
HSC Examination update
राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने इयत्ता १२ वी च्या परीक्षा रद्द करण्याबाबत निर्णय घेतलेला आहे.
या अनुषंगाने राज्य मंडळामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेसाठी प्रविष्ठ सर्व विद्यार्थ्यांचे तसेच परीक्षेशी संबंधित सर्व घटकांचे हित लक्षात घेता शासनाने पुढीलप्रमाणे निर्णय घेतला आहे:
शासन निर्णय:
HSC Examination latest News
सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत आयोजित करण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षा विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षिततेचा विचार करता रद्द करण्यात येत आहे.
इयत्ता १२ वी च्या परीक्षेसाठी प्रविष्ठ विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे उत्तीर्ण करण्यात यावे.
इयत्ता बारावीची परीक्षा रद्द केल्यामुळे, अंतर्गत मूल्यमापनाच्या कार्यपद्धतीबाबत तसेच गुणपत्रक / प्रमाणपत्र देण्याबाबत स्वतंत्रपणे निर्देश निर्गमित करण्यात येतील. सदरचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर
उपलब्ध करुन देण्यात आलेला असून त्याचा संकेतांक क्रमांक २०२१०६१११७२०४५४१२१ असा आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाने पाठवलेला प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन विभागाने स्वीकारला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक (Maharashtra Board) शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षाही रद्द झाल्या आहेत.
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी बारावीच्या परीक्षा रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे पाठवल्याचं बुधवारी (ता.2) सांगितलं होतं. मंत्रिमंडळाच्या बैठकीतही बारावीची परीक्षा रद्द करण्याबाबत चर्चा झाली होती.बारावीच्या परीक्षेसदर्भातील परिस्थिती आम्ही मंत्रिमंडळासमोर मांडली. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे आमचा प्रस्ताव कळवला आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक दोन दिवसांतच होईल. त्यांची परवानगी आली की आम्ही परीक्षेचा निर्णय जाहीर करू,” असे शिक्षणमंत्री माननीय वर्षा गायकवाड यांनी सांगितले होते.
विद्यार्थी आरोग्य प्रथम प्राधान्य
केंद्र सरकारने दोन दिवसापूर्वीच ‘सीबीएससी’ बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. राज्य सरकारनेही याबाबत विचारणा केली होती. आम्ही मंत्रीमंडळाला इतर राज्यांची माहिती दिली. त्यानुसार आम्ही बारावी परीक्षेच्या निर्णयाची फाईल आपत्ती विभागाकडे सोपवत आहोत.राज्य सरकारच्या या निर्णयामुळे बारावीच्या 14 लाख विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
आता या प्रस्तावाला आपत्ती व्यवस्थापन विभागाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे बारावीच्या परीक्षा रद्द करण्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. परीक्षा रद्द करण्याची भूमिका आमची पहिल्यापासूनच होती असंही वडेट्टीवार म्हणाले


आपली प्रतिक्रिया व सूचना