National Teacher Award Applications For This Year Online

 सन २०२१ चे राष्ट्रीय शिक्षक

 पुरस्कार आवेदन ऑनलाईन

 मागविण्याबाबत

National Teacher Award

संदर्भ:- मानव संसाधन विकास मंत्रालय नवी दिल्ली यांच्या अधिकृत वेबपोर्टलवरील माहितीवरून

मानव संसाधन विकास मंत्रालय, नवी दिल्ली यांनी राष्ट्रीय पुरस्कारासाठी सन २०१७ पासून मार्गदर्शक सूचना सुधारित केल्या आहेत. ऑनलाईन आवेदने स्विकारण्यासाठी वेबपोर्टल विकसित केले असून दिनांक ०१ जून, २०२१ पासून MHRD वेबसाइट वर

प्रथम खालील लिंकवर नावनोंदणी करा 

नावनोंदणी लिंक

त्यानंतर खालील लिंकवर लॉगिन करून संपूर्ण माहिती भरा

Login लिंक

 या लिंकवर नावनोंदणी सुरू झालेली आहे. त्यानुसार राज्यातील शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व मान्यताप्राप्त अनुदानित खाजगी प्राथमिक / माध्यमिक / उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांनी आपली आवेदने 

www.mhrd.gov.in 

यावेबवरील

नावनोंदणी लिंक

 या लिंकवर दिनांक २० जून २०२१ पर्यंत सादर करावयाची आहेत.

दिनांक १ जून पासून वेबपोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी लिंक सुरू करण्यात आली आहे. दिनांक २० जून पर्यंत इच्छुक शिक्षकांनी राष्ट्रीय पुरस्कारासाठी ऑनलाईन नोंदणी करावयाची आहे. आपल्या जिल्हयातील स्थानिक वर्तमानपत्रातून मोठ्या प्रमाणात प्रसिध्दी देण्यात यावी सोबत प्रसिद्धी पत्रकाचा नमुना सादर केला आहे.

शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळा (न.पा./ म.न.पा./जि.प.), मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित शाळा (प्राथमिक/माध्यमिक / उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक पात्र मुख्याध्यापक ऑनलाईन आवेदन भरण्यास पात्र आहेत.

अधिक माहिती व सविस्तर सूचनांसाठी सोबत माहिती प्रत जोडली आहे मानव संसाधन विकास मंत्रालयाने दिलेल्या सोबतच्या वेळापत्रकानुसार व मार्गदर्शक सूचनानुसार विहित वेळेत अंमलबजावणी करावी.

शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे

. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी अर्ज मागविण्याबाबत जाहीर प्रकटन

दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त प्रातिनिधिक स्वरुपात शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

 केंद्र शासनाने सन २०२१ च्या शिक्षक पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्याचा निर्णय घेतलेला आहे.

 दिनांक ०१ जून, २०२१ पासून लिंकवर या नावनोंदणी सुरू झालेली आहे.

 इच्छुक शिक्षकांनी दिनांक २० जून पर्यंत राष्ट्रीय पुरस्कारासाठी ऑनलाईन नोंदणी करावयाची आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad