Ads Area

Shaley Poshan Aahar Yojana Student Bank Account Update

शालेय पोषण आहार 

रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा 

विद्यार्थी खाते क्रमांक शालेय पोषण

 आहार योजना बाबत सूचना

शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत सन २०२१ मधील उन्हाळी सुट्टीच्या कालावधीतील लाभ DBT द्वारे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरण करण्याबाबत

संदर्भ:- शालेय शिक्षण विभागाकडील निर्देश पत्र जा.क्र. शापोआ - २०२१/प्रक्र.५५/एस.डी.३

दि. २३.०६.२०२१.

केंद्र शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम, २०१३ (NFSA) अंतर्गत देशातील सुमारे ८० कोटी लाभार्थ्यांना दरमहा ५ किलो प्रति लाभार्थी अन्नधान्याचे वेगवेगळ्या योजनांद्वारे वितरण करण्याचे जाहीर केले आहे

 केंद्र शासनाच्या मोफत धान्य देण्याच्या तरतुदीचा एक भाग म्हणून शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत सन २०२१ च्या उन्हाळी सुट्टीसाठी केवळ एक वेळ विशेष कल्याणकारी उपाय म्हणून सर्व पात्र विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेच्या आहार खर्चाच्या रकमेइतके आर्थिक साहाय्य थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरण करण्याचे नियोजन केलेले आहे.

केंद्र शासनाच्या उपरोक्त नियोजनाप्रमाणे योजनेस पात्र सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये उन्हाळी सुट्टीच्या कालावधीतील आहार खर्चाची रक्कम थेट लाभार्थी विद्यार्थ्याचे बँक खात्यामध्ये हस्तांतरण करण्याचा निर्णय संदर्भ पत्र क्र. २ अन्वये शासनाने घेतला आहे.

 शासन निर्देशानुसार जिल्ह्यातील शालेय पोषण आहार योजनेस पात्र सर्व लाभार्थ्याचे आधार लिंक बँक खाते माहिती खालील विहित नमुन्यात अद्ययावत करून तयार ठेवण्यात यावी, तसेच अद्याप ज्या विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडण्यात आले नसेल, 

अशा विद्यार्थ्यांचे आधार लिंक बँक खाते उघडण्याबाबत संबंधिताना आपल्यास्तरावरून लेखी सूचना निर्गमित करण्यात याव्यात,

 तसेच जिल्ह्यातील शापोआ योजनेस पात्र असलेल्या सर्व लाभार्थ्यांचे १००% बँक खाते उघडण्यात यावेत

 दिनांक ०९जुलै, २०२१ पर्यंत बँक खात्याची सर्व माहिती अद्ययावत करून जिल्हास्तरावर जतन करण्यात यावी, जेणेकरून शासनस्तरावरून पुढील निर्देश प्राप्त होताच उचित कार्यवाही करण्याकरीता सदर माहिती उपलब्ध करून देणे शक्य होईल.

 बँक खाते उघडण्याकरीता शाळेने संबंधित पालकांना आवश्यक ती मदत करण्याचे निर्देश आपल्या स्तरावरुन सर्व शाळांना निर्गमित करण्यात यावेत.

शालेय पोषण आहार नमुना 

विहित नमुना डाऊनलोड करा


Tags

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. Is it really an option to account.why and how students can open an account and just for merely a low amount. Education department doesn't know the cumbersome process of opening a bank account in students name if a parent is having two to three childrens then how hairs open 3 accounts and what minimum balance would be kept in every account the scheme is only meant for lower and lower middle class people and department is deliberately forcing people to open account later they will ask for a pan card also most of students Aadhar taken at a young age and at the age of 12 to 15 you can't update Aadhar regularly in view of this department should understand the logic.

    ReplyDelete

आपली प्रतिक्रिया व सूचना

Top Post Ad

Below Post Ad