Ads Area

Use Of Email And WhatsApp For Government Work in State.

राज्यात शासकीय कामकाजासाठी

 ईमेल तसेच व्हॉट्सअॅपचा वापर 

ग्राह्य धरण्याबाबत.

महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणू प्रसारावरील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लागू करण्यात आलेल्या लॉक डाऊनच्या अनुषंगाने राज्यात शासकीय कामकाजासाठी ईमेल तसेच What's Up चा वापर ग्राह्य धरण्याबाबत.

https://www.digitalbrc.in/2021/06/use-of-email-and-whatsapp-for.html

 शासन परिपत्रक :

कोरोना विषाणूंचा (COVID- १९) प्रसार राज्य शासकीय कार्यालयांमध्ये होऊ नये, तसेच राज्यातील अधिकारी / कर्मचारी यांना त्यांचा संसर्ग होऊ नये म्हणून विविध प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्याच्या दृष्टीने या विभागाच्या संदर्भ क्रमांक १, २ व ५ येथील शासन निर्णयान्वये विविध सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.

२. लॉकडाऊनच्या कालावधीत राज्य शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती नियंत्रित करण्यात येत आहे. तसेच भविष्यातही अशा प्रकारची परिस्थिती लक्षात घेता शासकीय अधिकारी / कर्मचारी यांनी त्यांचे घरातच राहूनही कार्यालयीन आवश्यकतेनुसार व तातडीनुसार शासकीय कामकाजाचा निपटारा करणेसाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे.

 यासाठी शासकीय ईमेल (जसे एनआयसी मेल, इ.), त्यांच्या नेहमीच्या वापरातील अन्य ईमेल तसेच What's Up चा वापर शासकीय कामकाजासाठी तसेच संबंधितांना सूचना / आदेश देण्यासाठी करणे ग्राह्य धरण्यात येईल.

सबब सर्व राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत

अ) प्रत्येक अधिकारी / कर्मचारी यांनी त्यांचे शासकीय ई-मेल आयडी / त्यांच्या नेहमीच्या वापरातील अन्य ई-मेल आयडी तसेच एस. एम. एस / व्हॉट्सअॅपची सुविधा असलेला मोबाईल क्रमांक, त्यांचे कार्यालय प्रमुखांस उपलब्ध करून द्यावा.

ब) शासकीय कामकाजासाठी शासकीय ई मेल आयडी / त्यांच्या नेहमीच्या वापरातील अन्य ईमेल आयडी तसेच व्हॉट्सअॅपचा वापर करून त्यांच्या कामाचा जास्तीत जास्त निपटारा करावा.

क) प्रस्ताव ई-मेलद्वारे फॉरवर्ड केल्यानंतर त्याबाबतची सूचना लगेचच संबंधितां एस.एम.एस (SMS) / व्हॉट्सअॅपवरून (Whatsapp) देण्याबाबत दक्षता घेण्यात यावी.

ड) उक्त पद्धतीने वरिष्ठांकडून प्राप्त सूचनेनुसार ईमेलद्वारे अंतिम मान्यतेसाठी सादर केलेला प्रस्ताव (फॉरवर्ड केलेला प्रस्ताव ) हा, तो सादर करणारे व अंतिम मान्यता देणारे या दोन्ही स्तरामधील अधिकाऱ्यांनी पाहिला, तपासला व मान्य केला आहे, असे गृहित धरण्यात येईल.

प्रस्ताव तयार करणाऱ्या अधिकारी / कर्मचारी यांनी प्रस्ताव ई-मेलद्वारे अंतिमतः फॉरवर्ड करण्यापूर्वी तो सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून फॉरवर्ड करावा व त्याची प्रत (C.C. मध्ये) सर्व संबंधित अधिकाऱ्यांना चिन्हांकित करावी.

तरी सर्व मंत्रालयीन अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव तसेच मंत्रालयाच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख तसेच कार्यालय प्रमुख यांना विनंती करण्यात येते की, त्यांनी सदर सूचना त्यांचे नियंत्रणाखालील अधिकारी / कर्मचारी यांचे निदर्शनास आणाव्यात.

५. उक्त सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील.

६. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक क्र. २०२००६०५१४०३१९१९०७ असा आहे


Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad