किशोर गोष्टी स्पर्धा
किशोर' सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त
सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त किशोरच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. आता 'मुलांच्या किशोर गोष्टी' ही स्पर्धा घेण्यात येत आहे.
यात वर्ग चौथी ते नववीचे विद्यार्थानी त्यांना आवडलेली किशोर मासिकातील गोष्ट व्हिडिओ रुपात ध्वनिचित्रमुद्रित करून पाठवायची आहे.
तज्ज्ञांची समिती हे व्हिडिओ पाहून त्यातून पहिला, दुसरा व तिसरा तसेच उत्तेजनार्थ क्रमांक निवडतील विजेत्या विद्यार्थ्यांना रोख रकमेच्या रूपात बक्षीस देण्यात येईल.
बक्षीस
प्रथम . बक्षिस रु. ५०००,
द्वितीय बक्षीस ३,००० व
तृतीय २०००
व उत्तेजनार्थ रु. १००० अशी ती रक्कम असेल.
विजेत्या विदयार्थ्यांच्या गोष्टी ई-बालभारतीच्या पुणे येथील स्टुडिओ मध्ये रेकॉर्ड करून त्या ई- बालभारतीच्या युट्यूब चॅनलवरून प्रसारित होतील.
स्पर्धेचे नियम -
१) ही स्पर्धा चौथी ते नववीच्या शालेय विदयार्थ्यांसाठी आहे.
२) विदयार्थ्यांनी मोबाईलच्या माध्यमातून आपली गोष्ट व्हिडिओ रेकॉर्ड करून पाठवावी.
३) ही स्पर्धा ३ री ते ५ वी आणि ६ वी ते ९ वी अशा दोन गटांत होईल. गोष्ट किशोर अंकातील असावी.
४) सुरुवातीला विदयार्थ्यांने आपले संपूर्ण नाव, वर्ग, शाळा व गोष्ट कोणत्या अंकातील आहे. याचा उल्लेख करावा.
५) किशोरचे सर्व जुने अंक बालभारतीच्या www.kishor.ebalbharati.in या वेबसाईटवर मोफत उपलब्ध आहेत.
६) गोष्ट ५ ते ७ मिनिटांची असावी.
७) विजेत्यांना पुढीलप्रमाणे बक्षीस देण्यात येईल.
प्रथम बक्षीस रु. ५०००,
द्वितीय बक्षीस ३,०००
व तृतीय २०००
व उत्तेजनार्थ रु. १०००.
८) व्हिडिओ पुढील Email वर पाठवावेत.
executive_editor_kishor@ebalbharati.in
९) स्पर्धेची अंतिम तारीख दिनांक ३१ ऑगस्ट २०२१ आहे.
१०) परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
११) संपर्क क्रमांक: ०२०-२५७१६१४४
Send me story
ReplyDeleteखूप छान
ReplyDeleteआपली प्रतिक्रिया व सूचना