विद्यार्थ्याकरिता मोठी बातमी
NMMS निवड यादी जाहीर
NMMS परीक्षा निकाल जाहीर
NMMS गुण यादी जाहीर
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२०-२१ इ.८ वी साठी परीक्षा दिनांक ०६ एप्रिल २०२१ गुणयादीबाबत.
सन २००७-०८ पासून राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) ही मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्सेस भारत सरकार नवी दिल्ली यांचे मार्फत राबविली जात आहे. आर्थिक मागास विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या प्रज्ञेची जोपासना, तसेच त्यांचे १२ वी पर्यंत शिक्षण पूर्ण व्हावे हा या योजनेचा गाभा आहे. प्रज्ञावान विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवत्तीच्या स्वरुपात आर्थिक मदत करण्यात येते.
सदर शिष्यवृत्ती १२ वी पर्यंत मिळते. सन २०१७-१८ पासून शिष्यवृत्तीचा दर दरमहा रु.१,०००/
( वार्षिक रु.१२,०००/-) आहे. इ. ८ वी तील आर्थिक दुर्बल घटकातील ज्या पालकांचे उपन्न रु. १,५०,०००/- पेक्षा कमी आहे व जे विद्यार्थी अनुदानित शाळेत शिकत असतात त्या विद्यार्थ्यांना परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे सदर शिष्यवृत्तीचे वाटप होते.
शिष्यवृतीसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची निवडयादी दिनांक १८/०८/२०२१ रोजी परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे.
निवड यादी पहा
शिष्यवृत्तीसाठीची निवडयादी जाहीर झाल्यानंतर निवडयादीत कोणताही बदल करण्यात येणार नाही.
सदर परीक्षेसाठी उत्तीर्ण होण्यासाठी दोन्ही विषयात एकत्रित खाली नमूद केल्याप्रमाणे गुण मिळणे आवश्यक आहेत.
जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांचे बँक खातेबाबतची माहिती भरणे बंधनकारक आहे. तसेच याबाबतची सर्वच जवाबदारी संबंधित पालक व मुख्याधापक यांची असेल.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे मार्फत
दिनांक ०६ एप्रिल २०२१ रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेची (NMMS) विद्यार्थ्यांना प्राप्त गुणांची यादी परिषदेच्या
व
https://nmms.mscescholarshipexam.in/
या संकेतस्थळावर दिनांक २६/०७/२०२१ रोजी पाहता येईल.
विद्यार्थ्यांच्या नावातील स्पेलींग/जातीत / दिव्यांगत्वात / जन्म दिनांकात इ. बाबतची दुरुस्ती असल्यास सदरची दुरुस्ती
दिनांक ०४/०८/२०२१ पर्यंत परिषदेकडे nmms.msce@gmail.com
या ईमेलवर शाळेमार्फत पाठविण्यात यावी. सदर तारखेनंतर येणाऱ्या अर्जाचा दुरुस्त्यांचा विचार केला जाणार नाही. प्राप्त सर्व दुरुस्त्यांचा विचार करुन शिष्यवृत्तीस पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची निवडयादी परिषदेच्या www.mscepune.in व www.nmms.mscescholarshipexam.in या संकेतस्थळावर यथावकाश जाहीर करण्यात येईल.
सदर परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना कार्बनलेस उत्तरपत्रिका देण्यात आली असल्याने पेपरची गुणपडताळणी केली जात नाही.
आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,
पुणे १


आपली प्रतिक्रिया व सूचना