Teaching And Learning Of Marathi Language Compulsory In all Schools

महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीने अधिनियम २०२० करिता माहिती संकलित करणे बाबत....


 संदर्भ :- १) महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्यासाठी आणि तद्संबंधित किंवा तदानुषंगिक बाबीसाठी तरदूत करण्याकरिता अधिनियम २०२०

 २) शासननिर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय मुंबई, क्रमांक: सं. २०१९/प्र.क्र.७८/एस.डी.४ दि.१ जून २०२०.

 ३) मा. अपर मुख्य सचिव यांनी ऑनलाईन मिटींगमध्ये दिलेल्या सूचना दि.७ जुलै २०२१.

 उपरोक्त शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्यासाठी अधिनियम पारित करण्यात आला असून त्याद्व राज्यात इयत्ता पहिली ते दहावी पर्यंत सर्व माध्यमाच्या, व्यवस्थापनाच्या व मंडळाच्या शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन अध्ययन सक्तीचे करण्यात आले आहे.

 सदर माहिती ही महाराष्ट्र राज्यातील CBSE, ICSE,IB, CAMBRIDGE या बोर्ड अंतर्गत

 शाळांना मराठी भाषा सक्तीची अधिनियम २०२० यास अनुसरून प्राप्त करण्याकरिता सूचित करण्यात आलेले आहे. या अंतर्गत लिंक तयार करण्यात आली आहे.

 त्यानुसार आपल्या अधिनस्त

असलेल्या CBSE,ICSE, IB,CAMBRIDGE या बोर्ड अंतर्गत शाळांना पुढील लिंकला क्लिक करून लिंक मधील सर्व प्रश्नांची माहिती भरणे बाबत सूचना देण्याबाबतची कार्यवाही आपल्या स्तरावरून करण्यात यावी.

                 Link 

  उपरोक्त माहिती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे. या कार्यालयास दि.३१/८/२०२१ पर्यंत प्राप्त होणे आवश्यक आहे. या कारणास्तव उपरोक्त विषयाबाबत तात्काळ कार्यवाही करण्यात यावी.

(मूळ टिपणी मा. संचालक यांनी मान्य केली आहे.)

(डॉ. विलास पाटील) सहसंचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad