Celebrate School Entrance Ceremony Education

सोमवारी शाळा सुरू करताना शिक्षणाचा उत्सव साजरा करा ! मा. शालेय शिक्षणमंत्री

Back To School

दिनांक 04 ऑक्टोंबर सोमवारपासून पुन्हा राज्यभरातील शाळा सुरक्षितपणे सुरू होत आहेत. 

मा. शालेय शिक्षणमंत्री, शिक्षणतज्ज्ञ यांनी या शिक्षकांना दिल्या  महत्त्वाच्या सूचना

त्यामुळे शिक्षणाचा शाळाप्रवेश ऊत्सव घेताना कोविड नियमांचे पालन करून ऊपक्रम घ्यावा विद्यार्थ्यांचे स्वागत व्हायला हवे, असे मत शालय शिक्षणमंत्री यांनी व्यक्त केले. 

तसेच विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तक, शालेय गणवेश वाटप करून शिक्षणाचा शाळा प्रवेश उत्सव साजरा करू शकता

 दिनांक 01/10/2021 शुक्रवारी सायंकाळी वेबिनार आयोजित करण्यात आले होते. 

शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर टास्क फोर्सचे सदस्य, शिक्षणतज्ज्ञ व शालेय शिक्षण विभागातील अधिकारी यांच्या उपस्थितीत यशस्वीपणे वेबिनार चे आयोजन झाले

शालेय शिक्षणमंत्री या वेबिनारच्या अध्यक्षस्थानी होत्या, त्यावेळी माननीय शिक्षण मंत्री यांनी मुख्याध्यापक व शिक्षकांना महत्त्वपूर्ण सूचना व मार्गदर्शन केले

आता मुलांची शाळेत जाण्याकरिता शारीरिक व मानसिक तयारी करणे हे पालकांसाठी मोठे आव्हान असणार आहे

 असल्याची प्रतिक्रिया मानसोपचारतज्ज्ञ डॉ. समीर दलवाई यांनी दिली.

पहिल्या दोन आठवड्यात अभ्यासक्रम व परीक्षा  नको

 तसेच पहिल्या दोन आठवड्यात विद्यार्थ्यांचे किमान परीक्षा, अभ्यासक्रम या गोष्टी घेऊ नयेत, मुलांना आधी शाळेत योग्य पद्धतीने व्यक्त होऊ द्यावे.

आपल्या वर्गातील येणारे विद्यार्थ्यांना समजून घेऊन अध्यापन करावे, असे आवाहन शिक्षण तज्ज्ञ हेमांगी जोशी यांनी केले. शिक्षकांनीसुद्धा स्वतःचे मानसिक स्वास्थ्य जपावे, असेही त्यांनी सांगितले.

 सकारात्मक वातावरण निर्मिती होऊ द्या कोरोना काळात शिक्षकांनी अध्ययन अध्यापनाच्या बाबतीत राबविलेल्या विविध प्रयोगाचे कौतुक करावेसकारात्मक वातावरण निर्मिती होऊ द्या कोरोना काळात शिक्षकांनी अध्ययन अध्यापनाच्या बाबतीत राबविलेल्या विविध प्रयोगाचे कौतुक करून शाळा सुरक्षित सुरू करण्यासाठी शिक्षक, पालक, विद्यार्थी, प्रसार माध्यमे, सामाजिक संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते मोलाची भूमिका बजावू शकतात, असा आशावाद शिक्षणतज्ज्ञ वसंत काळपांडे यांनी सांगितले

विशेष सूचना

• मागील दीड वर्ष मुलांना बळजबरीने स्क्रीनसमोर बसवण्यात आले. आता शाळा सुरु झाल्यावर अचानक स्क्रीनबंदी करू नये. टप्प्याटप्प्याने इतर कृतींमधला सहभाग वाढवत नेल्यास आपोआप स्क्रीन टाईम कमी होत जाईल

• ज्या मुलांचे पालक मुलांना शाळेत पाठवणार नाहीत किंवा जी मुले स्वतःहून शाळेत यायला लगेच तयार नसतील, त्यांना शाळेत आलेल्या मुलांसोबत जोडून घ्यायची सोय असावी. सुरुवातीला काही काळ वर्गात ऑनलाईन-ऑफलाईन हायब्रीड मॉडेल वापरावे. इतर मुले वर्गात आलेली बघून पालक आणि मुलांचे मतपरिवर्तन होऊ शकेल. अचानक ऑनलाईन बंद केल्यास त्यांच्यामध्ये मागे पडल्याची भावना निर्माण होईल.

• मास्क आणि सॅनिटायजर वापरण्यावरून मुलांमध्ये मतभेद असू शकतील; हा हेटाळणीचा आणि थट्टेचा विषय होऊ शकतो, याबद्दल शिक्षकांनी संवेदनशील राहून परिस्थिती हाताळावी.

• सॅनिटायजरचा वापर आता बहुतेक सर्व शाळा करतीलच, पण त्याचसोबत स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहामध्ये पाणी, मुलामुलींसाठी स्वतंत्र आणि स्वच्छ स्वच्छतागृहे, यादेखील महत्त्वाच्या गोष्टी आहेत, हे शिक्षक आणि प्रशासनाने विसरू नये. शाळेच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायजरची बाटली ठेवली म्हणजे शाळेतला आरोग्याचा प्रश्न सुटला असे समजू नये.

• मागील दीड वर्षातील अध्ययन नुकसान (लर्निंग लॉस) भरुन काढण्यासाठी प्रयत्न केले जातील, त्याचसोबत खेळ, व्यायाम, कला, या गोष्टीदेखील मुलांनी मिस केल्या आहेत. जास्तीचे तास, मिळेल तेवढा वेळ गणित, शास्त्र, भाषा शिकवण्यासाठी वापरून या गोष्टींचे आणखी नुकसान करू नये. उलट या गोष्टीच मुलांना पुन्हा शाळेमध्ये आणायला आणि टिकवून ठेवायला मदत करणार आहेत.

• आता हंगामी स्थलांतर सुरु झाले आहे. शिक्षण हमी पत्रकाची अंमलबजावणी मूळ गाव आणि स्थलांतराचे ठिकाण अशा दोन्हीकडच्या शाळांनी करावी. आता पुन्हा शिक्षकांनी 'सरल'मध्ये आधार कार्ड नोंदवल्याने दुसरीकडे पटावर घेता येणार नाही वगैरे कारणे सांगू नयेत.

• आठवीपासून पुढच्या वर्गात परत न आलेली मुले-मुली हमखास बालमजूर आणि बालविवाहाला बळी पडलेली असणार, याबद्दल शाळा आणि स्थानिक प्रशासनाने संवेदनशील राहून स्वतःहून शोधमोहीम व इतर उपाययोजना करावी.

• सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मागच्या दीड वर्षात ऑनलाईन शिक्षणाचा एक्सेस असो अथवा नसो, मुले त्यांच्यावर आणि कुटुंबावर ओढवलेल्या परिस्थितीतून खूप काही शिकली आहेत. त्यांना आपले अनुभव इतर मुलांसोबत आणि शिक्षकांसोबत शेअर करण्यासाठी शाळेत वेळ आणि संधी मिळावी.

• मार्च २०२० मध्ये लॉकडाऊन लागला तेव्हा संपूर्ण यंत्रणा बेसावध होती. आता पुन्हा अशी काही परिस्थिती ओढवली तर शाळेचा बॅकअप प्लॅन काय, यावर शिक्षक आणि मुलांनी एकत्र बसून चर्चा करावी, नियोजन करावे, संवाद आणि अभ्यासाची साधने विकसित करावीत. जिल्हा पातळीवर याचा अभ्यास करण्यासाठी गट नेमावेत.

खालील लिंक वर क्लिक करून Webinar पाहा

       मार्गदर्शन वेबिनार

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad