राज्यातील शाळा सुरु होणेबाबत
आज चर्चासत्र व शिक्षकांना
मार्गदर्शन वेबिनार आयोजित
राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील शाळांचे वर्ग सुरक्षितपणे सुरु करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रास उपस्थित राहणेबाबत....
School Reopen In Maharashtra
उपरोक्त संदर्भीय शासन निर्णयानुसार राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता ५ ते १२ वी व शहरी भागातील इयत्ता ८ वी ते १२ च्या शाळांचे वर्ग सुरक्षितपणे सुरु करण्यासाठी शासनाने अतिरिक्त मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत. त्यानुसार उपरोक्तप्रमाणे
दिनांक 04 ऑक्टोबर 2021 पासून शाळा सुरु करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.
या अनुषंगाने दिनांक 01 ऑक्टोंबर 2021 रोजी सायं. 4.00 वा. ऑनलाईन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रात Webinar मा.ना.प्रा. वर्षाताई गायकवाड, मंत्री, शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य याबाबत मार्गदर्शन करणार आहेत.
तसेच मा. वंदना कृष्णा, अप्पर मुख्य सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग व टास्क फोर्समधील मान्यवर अधिकारीही या चर्चासत्रात मार्गदर्शन करणार आहेत.
तरी यु-ट्यूब लिंकद्वारे आपण स्वतः या चर्चा सत्रास उपस्थित राहावे.
दिनांक 01 ऑक्टोंबर 2021 रोजी सायं. 4.00 वा Live
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण
परिषद, महाराष्ट्र, पुणे ३०.

आपली प्रतिक्रिया व सूचना