Digital Leadership For Teaching And Learning In Classroom

राज्यातील सर्व शिक्षकांची गुगल क्लासरूम प्रशिक्षणासाठी आवश्यक नावनोंदणी सुरू| Google Classroom Training

मुदत वाढ

 दिनांक ३० नोव्हेंबर, २०२१  रात्री ११:५५ वाजता बंद करण्यात येणार आहे, याची नोंद घ्यावी.

प्रथम टप्प्यामध्ये राज्यातील एकूण ४०,००० शिक्षकांना ऑनलाईन स्वरूपामध्ये गुगल क्लासरूमचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. 

सद्यस्थितीमध्ये ग्रामीण भागातील इयत्ता ५ वी ते १२ वी च्या व शहरी भागातील इयत्ता ८ वी ते १२ वी च्या शाळा सुरु करण्यात आलेल्या आहेत. 

तरी दैनंदिन अध्यापनामध्ये विविध डिजिटल टूल्सचा यशस्वी व प्रभावी वापर शिक्षकांना करता येणे गरजेचे आहे.

Digital Training

विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक संदर्भ साहित्य अभ्यासावयास देणे, विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे व विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या अध्यापनाचा, गृहपाठाचा, सूचनांचा त्याच्या सोयीच्या वेळी पाहिजे तेव्हा लाभ घेता यावा यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे व गुगल यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील शिक्षकांना अध्यापनासाठी उपयुक्त असे

 "Digital Leadership for Teaching and Learning in the Classroom" 

या विषयावरील दोन दिवसीय वेबिनारचे आयोजन माहे डिसेंबर २०२१ मध्ये राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. सदरच्या वेबिनारमध्ये अध्यापनासाठी उपयुक्त अशा गुगल टूल्सच्या वापराबाबत प्रात्यक्षिकासह सविस्तर प्रशिक्षण दिले जाणार आहे.

तंत्रस्नेही शिक्षक तयार होण्याकरिता सुवर्णसंधी

तसेच याप्रशिक्षण वेबिनारकरिता उपस्थित राहणेसाठी नावनोंदणी करणे आवश्यक असल्याने प्रथमतः सर्व शिक्षकांनी प्रशिक्षणाकरिता नोंदणी करण्यासाठी

खालील लिंक वर क्लिक करा

या लिंकवर क्लिक करून नाव नोंदणी करावी. या प्रशिक्षणांतर्गत सर्व शिक्षकांना मोफत G-suit आय. डी. तयार करून दिला जाणार असल्याने नोंदणी असलेल्या शिक्षकालाच सदरचा G-suit आय. डी. Email व मोबाईलवर प्राप्त होईल, म्हणून Email Id आणि मोबाईल अचूकपणे नोंदवावा याची नोंद घ्यावी. सदर नावनोंदणी ही

 दिनांक ३० नोव्हेंबर, २०२१ रोजी रात्री ११:५५ वाजता बंद करण्यात येणार आहे, याची नोंद घ्यावी.

तरी राज्यातील सर्व शिक्षकांना सदर प्रशिक्षणाचा लाभ घेता यावा यादृष्टीने आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शिक्षकांना सदर वेबिनारसाठी वरील लिंकवर नावनोंदणी करणेसाठी सूचित करण्यात यावे. तसेच वेबिनारचे सविस्तर वेळापत्रक यथावकाश निर्गमित केले जाईल.

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad