SENIOR AND SELECTION GRADE TRAINING Registration For Teachers

वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण

 2021 - 2022 नोंदणी प्रक्रिया सुरू

प्रशिक्षण नोंदणीचा कालावधी
 दिनांक ०५/०१/२०२२ पर्यंत वाढविण्यात आला आहे.
वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाचे नियोजन व संनियंत्रणाची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे सोपविण्यात आलेली आहे. 

Training Home

सदर प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नोंदणीकरिता परिषदेमार्फत पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे. सदरील पोर्टलवर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय या चार गटातील पात्र शिक्षक/ मुख्याध्यापक/प्राध्यापक/प्राचार्य यांनी नोंदणी करावयाची आहे. 
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण रजिस्टर नोंदणी साठी शालार्थ आयडी/जन्म तारीख व मोबाईल नंबर टाकल्यानंतर विना अनुदानित सेवा धरली जात आहे व शिक्षणसेवक कालावधी देखील धरला जात आहे त्यामुळे प्रशिक्षण नोंदणी करण्यासाठी ओटीपी नंबर येत आहे तरी विनाअनुदानित सेवा/शिक्षणसेवक धरून प्रशिक्षण नोंदणी होत आहे
सदर संदर्भातील सूचना पुढीलप्रमाणे - 

🥇१. प्रशिक्षणाकरिता नोंदणी करण्यासाठी मार्गदर्शक सूचना

२.दिनांक ३१ डिसेंबर २०२१ रोजी १२ वर्षे सेवा पूर्ण होणारे किंवा त्यापूर्वीच १२ वर्षे सेवा पूर्ण झालेले शिक्षक वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र ठरतील.

३.दिनांक ३१ डिसेंबर २०२१ रोजी २४ वर्षे सेवा पूर्ण होणारे किंवा त्यापूर्वीच २४ वर्षे सेवा पूर्ण झालेले शिक्षक निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र ठरतील.

🥇प्रशिक्षणाकरिता नोंदणी करण्यासाठी
खालील लिंक वर क्लिक करा
४. प्रशिक्षण नोंदणी दिनांक २३ नोव्हेंबर, २०२१ ते दिनांक ०५/०१/२०२२ पर्यंत वाढविण्यात आला आहे.

५. सदरचे प्रशिक्षण हे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. याबाबत नोंदणीनंतर पुढील सूचना
संबंधितांना Email द्वारे देण्यात येतील.

६. प्रस्तुत प्रशिक्षणासाठी पुढीलप्रमाणे ०४ गट करण्यात आलेले आहेत-
  •  गट क्र.१ प्राथमिक गट, 
  • गट क्र. २ माध्यमिक गट, 
  • गट क्र. ३ उच्च माध्यमिक गट, 
  • गट क्र. ४ अध्यापक विद्यालय गट.

 ७. प्रशिक्षणासाठी नोंदणी करतेवेळी शिक्षकाने स्वतःचा शालार्थ ID, शाळेचा UDISE क्रमांक इत्यादी माहिती सोबत ठेवावी. 

८. नोंदणी करत असताना नोंदणीसाठीचा आवश्यक OTP आपल्या मोबाईल क्रमांकावर तात्काळ येणार असल्याने आपला वापरात असणारा मोबाईल सोबत ठेवावा.

९. प्रशिक्षणार्थी यांच्याकडे स्वतःचा वापरात असणारा Email असणे आवश्यक आहे.
 सदरच्या प्रशिक्षणाचे पुढील सर्व पत्रव्यवहार व सूचना या नोंदणी करत असताना नोंदविलेल्या Email वर पाठविण्यात येतील.

१०. नोंदणी फॉर्म अंतिम करण्यापूर्वी आपली भरलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक पडताळणी करण्यात यावी. आपल्या माहितीमध्ये काही बदल / दुरुस्ती असल्यास "माहितीत बदल करा" या बटणावर क्लिक करून सुधारित माहिती भरता येईल.

११. प्रस्तुत प्रशिक्षणासाठी आवश्यक शासन निर्णय https://training.scertmaha.ac.in 
या पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. 
तसेच प्रशिक्षणाशी निगडीत अद्ययावत सूचना वेळोवेळी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील. 
१२. या प्रशिक्षणासाठी जिल्हा नोडल अधिकारी म्हणून संबंधित जिल्ह्याचे प्राचार्य, जिल्हा शिक्षण व

प्रशिक्षण संस्था हे असतील तर मुंबई शहर व उपनगर या जिल्ह्यांसाठी उपसंचालक, प्रादेशिक

विद्या प्राधिकरण, मुंबई हे जिल्हा नोडल अधिकारी असतील.

१३. प्रशिक्षण शुल्क भरणा करणेसाठी प्रशिक्षणार्थी यांचेकडे स्वतःच्या बँक खात्याचा सर्व तपशील

इंटरनेट बँकिंग/ क्रेडीट / डेबिट कार्ड / UPI payment ने सदर प्रशिक्षण शुल्क ज्या बैंक खात्यावरून भरणार आहे त्याचा आवश्यक तपशील सोबत ठेवावा. उदा. युझर आयडी, पासवर्ड इ. 

१४. सदर प्रशिक्षण सशुल्क असल्याने प्रति प्रशिक्षणार्थी रु.२,०००/- (अक्षरी रुपये दोन हजार मात्र) शुल्क ऑनलाईन पद्धतीने (Credit & Debit Card, Internet Banking, UPI Payment) अदा करणे आवश्यक आहे. प्रशिक्षणासाठी आवश्यक सर्व माहिती अचूक पद्धतीने भरली आहे याची खातरजमा झाल्यानंतरच प्रशिक्षण शुल्क ऑनलाईन अदा करावे, एकदा जमा केलेले प्रशिक्षण शुल्क कोणत्याही कारणात्सव परत केले जाणार नाही याची नोंद घ्यावी, यासंदर्भात परिषदेशी कोणताही पत्रव्यवहार करू नये.

१५. नोंदणी अर्ज भरताना काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास स्वतःच्या रजिस्टर ईमेल वरून


 या  Email वर संपर्क करावा.

१६. वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी व निवड श्रेणीसाठी पात्र होणेकरिता विहित गटातील संदर्भीय शासन निर्णयातील प्रशिक्षण पूर्ण करणे ही एक अट आहे. केवळ प्रशिक्षण पूर्ण केले म्हणजे संबंधित शिक्षक वरिष्ठ / निवड श्रेणीसाठी पात्र ठरणार नाहीत. त्याकरिता उपरोक्त शासन निर्णयातील इतर नमूद अटी पूर्ण करणे बंधनकारक आहे.

१७. नोंदणी केलेल्या शिक्षकांचे उपरोक्त प्रशिक्षण गटनिहाय प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात येईल. 

१८. शासन निर्णयातील अटी व शर्ती तपासून त्याबाबत वरिष्ठ/ निवडश्रेणी मंजूर करण्याची कार्यवाही विभागीय / जिल्हा स्तरावर करण्यात येईल.

१९. सदर प्रशिक्षणासंबंधी अद्ययावत माहितीसाठी वेळोवेळी https://training.scertmaha.ac.in 
हे संकेतस्थळ पहावे.

उपरोक्त सूचना आपल्या कार्यक्षेत्रातील चारही गटातील शिक्षक संवर्गातील पात्र शिक्षकांना आपल्या स्तरावरून द्याव्यात व सदर प्रशिक्षणासाठी नावनोंदणी करण्यास आदेशित करण्यात यावे.

संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.

   नोंदणी करिता सूचना 

वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण २०२१-२०२२ नोंदणी साठीच्या सूचना पात्र शिक्षकांनी

खालील लिंकवर क्लिक करून नोंदणी सुरु करावी
  • आपला शालार्थ आय. डी. नोंदवावा.
  • आपली जन्म दिनांक नोंदवा.
  • वापरात असणारा आपला मोबाईल क्रमांक नोंदवावा.
  • नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर आलेला OTP नोंदवून पडताळणी करून घ्यावी.
  • आपला प्रशिक्षण प्रकार निवडावा.
  • नोंदणी फॉर्म मधील आपली संपूर्ण माहिती अचूक नोंदवा.
  • आपला प्रशिक्षण गट निवडा
  • आपण भरलेल्या माहितीची पडताळणी करावी. दुरुस्ती/ बदल असल्यास Edit बटनावर क्लिक करून आवश्यक बदल करू शकता.
  • बदल/ दुरुस्ती नसल्यास I agree all above instructions. वरील चेक बॉक्स टिक मार्क (~) करावी.
प्रशिक्षण शुल्क भरणा करणेसाठीच्या उपलब्ध सुविधांपैकी आपणाकडे असलेल्या सुविधेमार्फत प्रशिक्षण शुल्क भरणा करावा. प्रशिक्षण शुल्क भरल्याचे चलन जतन करून ठेवावे.

शुल्क भरणा करणेसाठी Credit & Debit card, Internet Banking अथवा UPI Payment करता येईल.

प्रशिक्षण नोंदणी यशस्वीपणे पूर्ण झाल्यास आपणास प्रशिक्षण शुल्क भरल्याची पावती Email द्वारे प्राप्त होईल.

ट्रेनिंग बाबत पुढील सूचना वेळोवेळी उपरोक्त संकेतस्थळावर व ई-मेलद्वारे देण्यात येतील

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad