दहावी व बारावी परीक्षेची तारीख
जाहीर ! परीक्षा ऑफलाईन होणार
सन 2021 - 2022 इ. दहावी व बारावीचे परीक्षेचे वेळापत्रक शिक्षण विभाग कडून जाहीर करण्यात आले आहे
HSC Board Exam इ. बारावी
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार
बारावीच्या प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा दिनांक 14 फेब्रुवारी 2022 ते 3 मार्च 2022 कालावधीत होणार आहेत.
बारावीची लेखी परीक्षा दिनांक 4 मार्च 2022 ते 7 एप्रिल 2022 या कालावधीत होईल.
SSC Board Exam इ. दहावी
दहावीच्या प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा दिनांक 25 फेब्रुवारी 2022 ते 14 मार्च 2022 या कालावधीमध्ये होणार आहेत.
दहावीची लेखी परीक्षा दिनांक 15 मार्च ते 18 एप्रिल या कालावधीत होणार आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये राज्यातील शाळा/कनिष्ठ महाविद्यालये ऑक्टोबर 2021 पासून विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीसह सुरु झाली आहेत.
त्याअनुषंगाने इयत्ता बारावी आणि इयत्ता दहावी साठी शालेय शिक्षण विभागामार्फत प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन तसेच लेखी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर परीक्षा कालावधीमध्ये मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी केले आहे
तशी परीक्षा ऑफलाइन होणार म्हणजे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाऊन परीक्षा द्यावी लागेल
माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच दहावी आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच बारावी परीक्षांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक दरवर्षी नोव्हेंबरमध्येच जाहीर होते. परंतु करोनाच्या प्रादुर्भावामुळे हे वेळापत्रक येण्यास उशीर झाला तरी विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी करावे
परीक्षेत भरपूर यश मिळवा अशी शुभेच्छा दिले आहे

आपली प्रतिक्रिया व सूचना