Ads Area

Reading Campaign Four Week For Student

१०० दिवसांकरिता वाचन अभियान

कालावधी दिनांक 24 ते 29 जानेवारी 2022

 आठवडा ४ सुरू


बालवाटिका ते इयत्ता आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्याकरिता जानेवारी २०२२ ते एप्रिल २०२२ या कालावधीत १०० दिवसांकरिता वाचन अभियान (100 days Reading Campaign) राबविण्यात येणार आहे

वर्ग पहिली व दुसरी

सहभागी वाचन


  • साक्षरतेच्या सुरवातीच्या टप्प्यावर सहभागी वाचन फार महत्वाचे असते
  • इयत्ता पहिली आणि दुसरीसाठी ही वाचन पद्धती अतिशय प्रभावी ठरते.
  • शिक्षक मुलांना वाचून दाखवत असताना पुस्तकातील मजकूर आणि चित्रांकडे मुलांचे लक्ष वेधले जाते. 
  • मुलांचा कल लिखित शब्द उच्चारलेल्या शब्दासोबत जुळवून घेण्याकडे असतो. 
  • त्यामुळे मुले हळूहळू पुस्तके वाचण्याचा प्रयत्न करतात. या प्रक्रियेतून शिक्षक पुस्तक डावीकडून उजवीकडे अभिव्यक्तीसह कसे वाचतात, हे देखील मुले शिकतात.

शाळा ग्रंथालयास भेटी

पहिल्या आठवड्यात ग्रंथालयातून दिलेल्या पुस्तिकेवर मुलांना व्यक्त होण्यास सांगणे.

पुस्तकांचे वाचन मुलांना १४ व्या आठवड्यापर्यत आवश्यक आहे त्यासाठी इतर वयानुरूप योग्य असे पुस्तक मिळवून देणे

आठवडा ४

वर्ग तिसरी ते पाचवी

दृश निश्चिती - (सेट द सीन)
• शिक्षक वर्गाला ४ किंवा ५ च्या गटात विभागतात.
• तो किंवा ती त्यांना दृश्यासह सादर करते (कोणत्याही दृश्याचे वर्णन करते, उदाहरणार्थ: जुना किल्ला, वाळवंट किंवा खेळाचे मैदान) आणि राजा किंवा राणी, ड्रॅगन, शेतकरी, उंट, जादूगार, मुले यांसारख्या दृश्यामधील पात्रांचे वर्णन करते.
मग शिक्षक त्यांना एक लघुकथा तयार करण्यास सांगतात जी लघुकथा गटातील एक सदस्य मोठ्याने वाचू शकेल.

शाळेच्या ग्रंथालयाला प्रत्यक्ष भेट -
• प्रत्येक मुलाने वाचलेल्या पुस्तकाबद्दल काही ओळी सांगायच्या आहेत जे त्यांना आठवडा १ मध्ये ग्रंथालयातून दिले होते.
पुस्तकांचे वाचन मुलांना १४ व्या आठवड्यापर्यत आवश्यक आहे त्यासाठी इतर वयानुरूप योग्य असे पुस्तक मिळवून देणे.
आठवडा ४

वर्ग सहावी ते आठवी


मित्रांसोबत वाचा, मनोरंजनासाठी वाचा

• प्रत्येक विद्यार्थ्याला त्याने आधी वाचलेली आणि खूप आवडलेली कोणतीही लघुकथा निवडण्यास सांगणे.

त्याने किंवा तिने ही कथा दुसऱ्या विद्यार्थ्याला किंवा लहान भावंडाला कथा वाचण्यास सांगणे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad