Reading Campaign Hundred Days For Student

शालेय विद्यार्थी करिता १०० दिवसांचे

 वाचन अभियान

उपरोक्त विषयाच्या संदर्भाने पायाभूत साक्षरता ही आजीवन शिक्षणाची एक आवश्यक पूर्वअट आहे. पायाभूत साक्षरता प्राप्तीसाठी वाचन सवय ही एक महत्वाची बाब आहे, म्हणून जिज्ञासू कल्पक, उत्साही, आणि सर्जनशील मुलांमध्ये वाचन सवयी विकसित होणे गरजेचे आहे. उपरोक्त विषयानुसार याच दृष्टीकोनातून भारत सरकारच्या शिक्षा मंत्रालायातर्फे राज्य सरकारच्या

सहाय्याने बालवाटिका ते इयत्ता आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्याकरिता जानेवारी २०२२ ते एप्रिल २०२२ या कालावधीत १०० दिवसांकरिता वाचन अभियान (100 days Reading Campaign) राबविण्यात येणार आहे. 


या अभियानातर्गत १०० दिवसांकरिता या पत्रासोबत आठवडानिहाय उपक्रमांचे नियोजन देण्यात येत आहे.

 दिलेल्या नियोजनानुसार उपक्रमाची आठवडानिहाय अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

 वाचन आनंददायी पद्धतीने होण्याकरिता सदर उपक्रमाची साध्या सहज व आनंददायी पद्धतीने रचना करण्यात आलेली आहे.

 या रचनाचे संचलन सुकर होण्याकरिता आवश्यक संदर्भ साहित्य स्रोत हे शाळा, घर या स्तरावर सहज उपलब्ध होऊ शकेल अशा पद्धतीने देण्यात आलेले आहे तसेच शाळा बंद असण्याच्या स्थितीत करावयाच्या कृतीही देण्यात आल्या आहेत. आवश्यक बदलांबाबतही यात सूचित करण्यात आलेले आहे. तसेच सदर अभियानाच्या अनुषंगाने सहभागी घटकांच्या भूमिका व जबाबदारी या दृष्टीने मार्गदर्शक सूचना ही पत्रासोबत देण्यात येत आहेत.

सदर विषयाच्या अनुषंगाने खालील सूचनांनुसार कार्यवाही करण्यात यावी.

१. १०० दिवसांकरिता वाचन अभियान या कार्यक्रमाची दिनांक १ जानेवारी पासून सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळांमध्ये अंमलबजावणी करण्यात यावी.

२. सर्व पर्यवेक्षक यंत्रणांनी अभियानाच्या जनजागृतीकरिता प्रयत्नशील रहावे.

३. प्रत्येक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेद्वारे सदर कार्यक्रमाच्या गुणवत्तेचे सनियंत्रण करण्याकरिता गोष्टीचा शनिवार या उपक्रमाचे समन्वयक यांना जिल्हास्तरीय नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात यावे.

४. अभियानातील विविध उपक्रमाबाबत अहवाल तयार करण्यात यावा, तसेच नोडल अधिकारी यांनी अभियानाचे योग्य व्हिडीओ तयार करून तसेच क्षणचित्रे निवडून लिंक मध्ये अपलोड करावेत. या बाबतची लिंक स्वतंत्ररित्या कळवण्यात येईल.

 ५. या वाचन अभियान उपक्रमाच्या सोशल मिडिया वरील प्रसारासाठी पुढील Hashtag वापरण्यात यावा.

 # 100days Reading Campaign #Padhe Bharat

तरी दिनांक १ जानेवारी २०२२ पासून सोबत जोडलेल्या नियोजनानुसार व सूचनांनुसार आपल्या अधिनस्त सर्व व्यवस्थापनाच्या तसेच सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये अभियानाची योग्य व यशस्वी अंमलबजावणी करण्यात यावी.

खालील लिंक वर क्लिक करुन PDF Download करा

वर्ग पहिली व दुसरी

वर्ग तिसरी ते पाचवी

वर्ग सहावी ते आठवी

उपक्रम

आठवडा १

ग्रंथालय भेट

सर्व विद्यार्थ्यांनी शाळेच्या ग्रंथालयास भेट द्यावी आणि उपलब्ध पुस्तके माहित करून घ्यावेत.

. प्रत्येक विद्यार्थ्यांला वाचनासाठी वयानुरूप पुस्तके दयावी आणि चौथ्या आठवड्यात त्याविषयी विद्यार्थ्यांला सांगू द्यावे.

घरी पुस्तक वाचन सुकर होण्यासाठी कुटुंबातील एक प्रौढ व्यक्ती सोबत उपस्थित असणे आवश्यक आहे.

वर्णमाला शब्द (बालवाटिका)

मुलाना वाळू/भूसा ने भरलेल्या ट्रे/खोका मध्ये हातांची बोटे फिरवून अक्षरे शोधण्यास लावणे. जेणे करून मुलाना अक्षरनिर्मिती समजण्यास मदत होईल.

मुलांना खेळण्याच्या पिठाच्या (चिकण माती) सहाय्याने अक्षरे बनविण्यास प्रोत्साहित करणे.

कौटुंबिक कथा (वर्ग१, २)

मुलांना कुटुंबातील सदस्याबद्दल छोट्या गोष्टी तयार करण्यास मदत करणे.

त्यांना या गोष्टी कागदावर उतरवू द्या आणि जुनी कौटुंबिक छायाचित्रे जोडू द्या.

. मुलांना सुट्ट्या, वाढदिवस आणि कौटुंबिक सुट्टया यासारख्या विशेष दिवसांबद्दलच्या गोष्टी लिहिते करणे. आणि नंतर वर्गमित्राना एकमेकांच्या सोबत कथा वाचू देणे.

उपक्रम

शाळेच्या ग्रंथालयाला प्रत्यक्ष भेट

• सर्व मुलांनी शाळेच्या ग्रंथालयाला भेट द्यावी आणि उपलब्ध पुस्तकांचा शोध घ्यावा.

• प्रत्येक मुलाला चौथ्या आठवड्यात वाचण्यासाठी आणि त्याबद्दल सांगण्यासाठी त्याच्या वयोगटानुसार पुस्तक दिले जावे..

• घरी पुस्तक वाचन सुकर होण्यासाठी कुटुंबातील एक प्रौढ व्यक्ती सोबत उपस्थित असणे आवश्यक आहे.


शाळेच्या ग्रंथालयाला प्रत्यक्ष भेट

ग्रंथालय

• सर्व मुलांनी शाळेच्या ग्रंथालयाला भेट द्यावी आणि उपलब्ध पुस्तकांचा शोध घ्यावा.

• प्रत्येक मुलाला चौथ्या आठवड्यात वाचण्यासाठी आणि त्याबद्दल सांगण्यासाठी त्याच्या वयोगटानुसार पुस्तक दिले जावे.

कुटुंबातील एक प्रौढ व्यक्ती सोबत घरी पुस्तक वाचन सुकर होण्यासाठी उपस्थित असणे आवश्यक आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad