Scholarship Exam Online Register Regular Fees

शिष्यवृत्ती परीक्षा 2022 इ. ५ वी व इ. ८ वी ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता मुदत वाढ ! परीक्षा परिषद, पुणे

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) २०२२ च्या परीक्षेची अधिसूचना परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in व

 https://www.mscepuppss.in/ या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

 सदर परीक्षेचे नियमित शुल्कासह ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दिनांक ०१ डिसेंबर ते ३१ डिसेंबर, २०२१ या कालावधीत मुदत देण्यात आलेली होती.

त्यानुसार दिनांक ३१ जानेवारी ऐवजी दिनांक 30 एप्रिल, २०२२ रोजीपर्यंतच सुधारित मुदत देण्यात येत आहे.

सदर परीक्षेकरीता ज्या शाळांनी अद्याप ऑनलाईन आवेदनपत्र भरले नसतील. त्यांनी दिनांक २५ जानेवारी, २०२२ अखेरपर्यंत सदर प्रक्रिया पूर्ण करावी.

तसेच दि. २५ जानेवारी, २०२२ रोजीपर्यंत ऑनलाईन आवेदनपत्र भरलेल्या शाळांना दि. २७ जानेवारी, २०२२ रोजीपर्यंत शुल्काचा भरणा करता येईल. सदर बदलाची सर्व संबंधितांनी गांभीर्याने नोंद घ्यावी.

ऑनलाईन आवेदनपत्र

शिष्यवृत्ती परीक्षा - २०२२ साठी शाळा नोंदणी व नियमित शुल्कासह ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यास दिनांक १५/०१/२०२२ ते दिनांक २५/०१/२०२२ या कालावधीत मुदतवाढ देण्यात आली आहे.

तथापि शाळांना शाळा माहिती प्रपत्र व ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दिनांक १५ जानेवारी, २०२२ ते २५ जानेवारी, २०२२ या कालावधीत मुदतवाढ देण्यात येत आहे.

 सदर परीक्षेकरीता ज्या शाळांनी अद्याप ऑनलाईन आवेदनपत्र भरले नसतील त्यांनी दिनांक २५ जानेवारी, २०२२ अखेरपर्यंत सदर प्रक्रिया पूर्ण करावी. 

दिनांक २५ जानेवारी, २०२२ नंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन अथवा ऑफलाईन पध्दतीने आवेदनपत्र किंवा शुल्क भरता येणार नाही, याची सर्वांनी गांभीर्याने नोंद घ्यावी. 

शिष्यवृत्ती परीक्षा

शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली आहे वाचा सविस्तर

आवेदनपत्र भरणेसाठी मुदतवाढ दिल्याने दिनांक २०/०२/२०२२ रोजी होणाऱ्या परीक्षेच्या नियोजनासाठी

पुरेसा कालावधी उपलब्ध होत नसल्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलणे क्रमप्राप्त आहे. 

सबब परीक्षेची • सुधारित तारीख यथावकाश प्रसिध्द करण्यात येईल याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

शिष्यवृत्ती परीक्षा 2022 करिता शाळेची नोंदणीची पद्धत ! 

खालील लिंक वर क्लिक करा

        शाळेची नोंदणी

आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे- ०१

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad