PUP And PSS Scholarship Exam School Registration

 शिष्यवृत्ती परीक्षा 2023 करिता

 शाळेची नोंदणीची पद्धत ! 

पूर्व उच्च प्राथमिक/पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी / इ. ८ वी ) - २०२२

 PRE UPPER PRIMARY / PRE SECONDARY SCHOLARSHIP EXAMINATION (PUP / PSS) STD. 5th & 8th 

*वर्ग पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा*


शाळा नोंदणी (School Registration) व शाळा माहिती प्रपत्र (School Profile) भरण्याबाबत मुद्देनिहाय सूचना

शाळा नोंदणी (School Registration) प्रपत्रात भरलेली माहिती अचूक असल्याची खात्री स्वतः मुख्याध्यापकांनी करावी. ★ शाळा नोंदणी, शाळा माहिती प्रपत्र व ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याच्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.

★ माहिती अचूक असल्याची खात्री झाल्यानंतरच Submit & Confirm बटनावर Click करावे. 

★ Submit & Confirm बटनावर Click केल्यानंतर माहितीमध्ये कोणताही बदल करता येणार नाही.

शाळा नोंदणी (School Registration 

खालील लिंक वर क्लिक करा

        शाळेची नोंदणी

शाळेची नोंदणी झाल्यावर आता विद्यार्थ्यांचे फॉर्म भरू शकता विद्यार्थ्यांचे फॉर्म भरण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करा

   शाळेची Login

● www.mscepune.in अथवा https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर भेट दयावी. शिष्यवृत्ती परीक्षा २०२३ या बटनावर क्लिक करावे.

संकेतस्थळावरील उपक्रम (शाळांसाठी) या मथळयाखालील शाळा नोंदणी या बटनावर क्लिक करावे.

शाळा नोंदणी या बटनावर क्लिक केल्यानंतर शाळा नोंदणी फॉर्म उपलब्ध होईल. तो भरण्यासाठी खालीलप्रमाणे मुद्देनिहाय सूचना देण्यात येत आहेत.

UDISE सांकेतांक -

या मुद्दयापुढील चौकटीत आपल्या शाळेचा 11 अंकी UDISE सांकेतांक टाईप करून Enter बटन प्रेस करावे.

• त्यानंतर SCHOOL NAME या रकान्यात आपल्या शाळेचे नाव दिसेल. सदर नाव आपल्या शाळेचे असल्यास Is this your school name ? या रकान्यातील Yes बटनावर क्लिक करावे अन्यथा No बटनावर क्लिक करावे.

शाळेचे पूर्ण नाव -

या मुद्यापुढील चौकटीत आपल्या शाळेचे UDISE सिस्टममध्ये नमूद केलेले नाव आपोआप (By Default) येईल.

शाळा माहिती प्रपत्रात शाळेच्या नावात काही दुरुस्ती असल्यास शाळेच्या लेटरहेडवर संबंधित मुख्याध्यापकाच्या सही व शिक्क्यासह हेल्पलाईन ईमेलला विनंती अर्ज सादर करावा.

शाळा व्यवस्थापन प्रकार

• या मुद्दयापुढील चौकटीच्या ड्रॉप डाऊन लिस्ट मधील अचूक पर्याय निवडा. (ड्रॉप डाऊन लिस्ट जिल्हा परिषद, महानगरपालिका, राज्य शासन, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत, खाजगी मान्यताप्राप्त अनुदानित खाजगी मान्यताप्राप्त विनाअनुदानित, खाजगी मान्यताप्राप्त कायम विनाअनुदानित, मान्यताप्राप्त स्वयं अर्थसहाय्यित कटकमंडळ व केंद्र शासन)

शाळेत शिकविला जाणारा अभ्यासक्रम

●आपल्या शाळेत जो अभ्यासक्रम शिकविला जातो, तो पर्याय अचूकपणे निवडा.

• एकापेक्षा जास्त अभ्यासक्रम शाळेत शिकविले जात असतील तर जेवढे पर्याय लागू आहेत तेवढे सर्व पर्याय निवडावेत.

• येथे निवडलेला / निवडलेलेच अभ्यासक्रम विद्यार्थ्यांचे ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठी उपलब्ध

होतील.

लक्षात ठेवा -

• केवळ महाराष्ट्र शासनाचा (एमएससीईआरटी) अभ्यासक्रम राबविणाऱ्या शाळांतील विद्यार्थी गुणवत्तेनुसार शिष्यवृत्तीस पात्र ठरतात.

CBSE / ICSE व इतर अभ्यासक्रमाच्या शाळांतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जात नाही.. (संदर्भ : शासन निर्णय क्र. एफईडी-४०१४/६४३/प्र.क्र.४ / एसडी-५, दि. १५/११/२०१६) • ऑनलाईन आवेदनपत्रात चुकीचा अभ्यासक्रम नोंदविल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांवर राहील. अशा मुख्याध्यापकांविरुध्द शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्याची शिफारस करण्यात येईल.

शाळा माध्यम

• या मुद्द्याच्या ड्रॉप डाऊनमध्ये उपलब्ध असलेल्या पंधरा माध्यमांपैकी (मूळ व सेमी इंग्रजी माध्यमांसह) शाळेस लागू असलेले माध्यम निवडा.

• एकापेक्षा अधिक माध्यमातून शिक्षण दिले जात असेल तर जेवढया माध्यमातून शाळेत शिक्षण दिले जात

आहे तेवढया सर्व माध्यमांच्या पर्यायांची अचूकपणे निवड करावी. ● येथे निवडलेले / निवडलेली माध्यमेच विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन आवेदनपत्रात उपलब्ध होतील.

शाळेचा प्रकार -

आपली शाळा 'आश्रमशाळा' असल्यास ड्रॉप डाऊनमधील पहिल्या तीन पर्यायांमधून योग्य तो पर्याय निवडावा. • आपली शाळा कोणत्याही प्रकारची आश्रमशाळा नसल्यास 'आश्रमशाळा व्यतिरिक्त इतर शाळा' हा

शेवटचा पर्याय निवडावा.

क्षेत्र -

या मुद्दयाच्या ड्रॉप डाऊनमधून शाळेच्या क्षेत्राची अचूक निवड करावी.

• राज्यातील ग्रामपंचायतीच्या नियंत्रणाखालील सर्व गावे / वस्तीमधील (लोकसंख्या विचारात न घेता) शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची गणना "ग्रामीण" (RURAL) भागात करण्यात यावी.

• तसेच नगरपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका व महानगरपालिका परिक्षेत्रातील शाळांची गणना "शहरी" (URBAN) भागात करण्यात यावी. शाळा ज्या क्षेत्रात आहे तेच क्षेत्र ग्राह्य धरण्यात येईल. (संदर्भ शासन निर्णय क्र. एफईडी-४०१४/६४३/प्र.क्र.४ / एसडी-५, दि. १५/११/२०१६)

• लक्षात ठेवा ग्रामीण व शहरी क्षेत्रासाठी वेगवेगळे शासनमान्य शिष्यवृत्ती संच आहेत. चुकीचे क्षेत्र निवडल्यामुळे विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित मुख्याध्यापकांची राहील. अशा मुख्याध्यापकांविरुध्द शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्याची शिफारस करण्यात येईल.

शाळेचा Email आयडी -

• शाळेचा ईमेल आयडी इंग्रजी स्मॉल लेटर्समध्ये व अचूक फॉरमॅटमध्ये टाईप करावा.

• त्यानंतर Confirm School Email Id या रकान्यामध्ये शाळेचा ईमेल आयडी इंग्रजी स्मॉल

लेटर्समध्ये व अचूक फॉरमॅटमध्ये पुन्हा टाईप करावा.

 • येथे नोंदविलेल्या ईमेल आयडीवर आपणास Username व Password पाठविण्यात येईल.

शाळेत इंटरनेट कनेक्शन आहे का ?

या मुद्दयापुढील होय / नाही पैकी योग्य पर्याय निवडावा.

शाळेचा पूर्ण पत्ता - स्थानिक पत्ता

• घर नंबर, सर्व्हे नंबर, रस्ता, वॉर्ड, पेठ, क्षेत्र व जवळची खूण चौक, स्टेशन, स्टैंड, हॉस्पीटल, इत्यादीच्या जवळ अशी माहिती या मुद्दयासमोरील चौकटीत शाळेचा पूर्ण पत्ता इंग्रजी कॅपिटल लेटर्स मध्ये टाईप करा.

येथे शाळेचे नाव टाईप करण्याची आवश्यकता नाही.

गाव / शहर

• या मुद्यापुढील चौकटीत आपल्या शाळेचे UDISE सिस्टममध्ये नमूद केलेले शाळेचे गाव / शहर आपोआप (By Default) येईल.

• त्यामध्ये काही दुरुस्ती असल्यास शाळेच्या लेटरहेडवर संबंधित मुख्याध्यापकाच्या सही व शिक्क्यासह हेल्पलाईन ईमेलला विनंती अर्ज सादर करावा..

पोस्ट -

• या मुद्दयाखालील चौकटीत पोस्ट (पोस्टाचे ठिकाण व गाव) इंग्रजी कॅपिटल लेटर्स मध्ये टाईप करा.

● जिल्हा

या मुद्यापुढील चौकटीत आपल्या शाळेचे UDISE सिस्टममध्ये नमूद केलेला शाळेचा जिल्हा आपोआप (By Default) येईल.

● त्यामध्ये काही दुरुस्ती असल्यास शाळेच्या लेटरहेडवर संबंधित मुख्याध्यापकाच्या सही व

शिक्क्यासह हेल्पलाईन ईमेलला विनंती अर्ज सादर करावा.

तालुका / तहसिल

• या मुद्यापुढील चौकटीत आपल्या शाळेचे UDISE सिस्टममध्ये नमूद केलेला शाळेचा तालुका / तहसिल आपोआप (By Default) येईल.


त्यामध्ये काही दुरुस्ती असल्यास शाळेच्या लेटरहेडवर संबंधित मुख्याध्यापकाच्या सही व

शिक्क्यासह हेल्पलाईन ईमेलला विनंती अर्ज सादर करावा.

• पिनकोड -

• या मुद्यापुढील चौकटीत आपल्या शाळेचे UDISE सिस्टममध्ये नमूद केलेला शाळेचा

पिनकोड आपोआप (By Default) येईल.

 • त्यामध्ये काही दुरुस्ती असल्यास शाळेच्या लेटरहेडवर संबंधित मुख्याध्यापकाच्या सही व शिक्क्यासह हेल्पलाईन ईमेलला विनंती अर्ज सादर करावा.

• दूरध्वनी क्रमांक -

STD कोडसह शाळेचा दूरध्वनी क्रमांक नमूद करावा. शाळेस दूरध्वनी नसल्यास मुख्याध्यापकांचा मोबाईल क्रमांक टाकावा.

शाळा संलग्नता शुल्क

• हे शुल्क दरवर्षी शाळेने भरणे आवश्यक आहे. NTS किंवा NMMS परीक्षेसाठी शाळा संलग्नता शुल्क भरले असले तरीही शिष्यवृत्ती परीक्षेकरीता शाळा संलग्नता शुल्क रु. 200/- भरणे अनिवार्य राहील.

मुख्याध्यापकाची माहिती -

• या मुद्दयामधील पाच वेगवेगळया चौकटीत अनुक्रमे मुख्याध्यापकांचे आडनाव, प्रथम नाव, मधले नाव, मोबाईल क्रमांक (१० अंकी), ईमेल आयडी अचूकपणे टाईप करा.

• येथे नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर आपणास Username व Password पाठविण्यात येईल. उपरोक्तनुसार सर्व माहिती भरून झाल्यानंतर पुन्हा एकदा तपासून माहिती अचूक असल्याची खात्री करुनच Submit बटनावर क्लिक करावे.

शाळा माहिती प्रपत्र

 School Profile

शाळा नोंदणी मधील Submit बटनावर क्लिक केल्यानंतर शाळा नोंदणी प्रपत्रात नमुद केलेल्या शाळेच्या ईमेल आयडी व मुख्याध्यापकाच्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेल्या Username a Password च्या आधारे लॉगीन करावे.

• त्यानंतर शाळा नोंदणी प्रपत्रामध्ये नमुद केलेली सर्व माहिती आपणास दिसेल. त्यामध्ये काही दुरुस्ती असल्यास शाळेच्या लेटरहेडवर संबंधित मुख्याध्यापकाच्या सही व शिक्क्यासह हेल्पलाईन ईमेलला विनंती अर्ज सादर करावा.

• संपर्कासाठी वैकल्पिक मोबाईल क्रमांक अथवा दुरध्वनी क्रमांक नमुद करावा.

• मुख्याध्यापकांचा फोटो व स्वाक्षरी शाळा माहिती प्रपत्रात अपलोड करणे अनिवार्य आहे.

> मुख्याध्यापकांचा फोटो व स्वाक्षरी अपलोड करण्याची कार्यपध्दती ८.५ से. मी. X ४.५ से. मी. आकाराच्या पांढऱ्या कागदावर रंगीत फोटो चिकटवून त्याखाली काळया शाईच्या पेनाने स्पष्ट स्वाक्षरी करावी. सदरचा फोटो व स्वाक्षरी स्कॅन करावी.

• फोटो व स्वाक्षरी .JPG, JPEG किंवा PNG या फॉरमॅटमध्ये सेव्ह करावी. > फोटो व स्वाक्षरीच्या फाईलची साईज १०० kb पेक्षा जास्त नसावी.

● उपरोक्तनुसार सर्व माहिती भरुन झाल्यानंतर Submit & Confirm बटनावर Click करावे.

• Submit & Confirm बटनावर Click केल्यानंतर माहितीमध्ये कोणताही बदल करता येणार नाही.

टिप -

● उपरोक्त मुद्दयांबाबतच्या पुराव्याची कागदपत्रे शाळेत जतन करून ठेवावीत.

• परिषदेस उपरोक्त कागदपत्रांची आवश्यकता असेल तेव्हा ती परिषदेच्या सूचने प्रमाणे यावीत.

खालील लिंक वर क्लिक करून नमुना फार्म डाऊनलोड करा

मुख्याध्यापक नोंदणी फॉर्म

वर्ग पाचवी विद्यार्थी नोंदणी फॉर्म

वर्ग आठवी विद्यार्थी नोंदणी फॉर्म

तांत्रिक मदत

ई-मेल : puppsshelpdesk@gmail.com

हेल्पलाईन नंबर :

02067351700 / 8956470891 / 8956470892/ 8956470893/8956470894/8956470895/

8956470896

संपर्क

पत्ता :

 आयुक्त,

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,

१७, डॉ. आंबेडकर मार्ग,

पुणे - ४११००१

दूरध्वनी क्रमांक : ०२०-२६१२३०६६/६७

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad