Class First To Eight Subject Wise Project List

पहिली ते आठवी विषयनिहाय 

प्रकल्प यादी 

वर्ग १ ली ते ८ वी प्रकल्प यादी


वर्ग शिक्षकांकरिता अतिशय उपयुक्त प्रकल्प यादी उपलब्ध करून देण्यात येत आहे विद्यार्थ्यांना प्रकल्प देण्याकरिता सोयीस्कर होईल

पहिली ते आठवी विषयनिहाय प्रकल्प यादी 

भाषा -

* पाठ्यपुस्तकातील चित्रांना अनुसरुन चित्रे जमविणे.

* चित्रे रंगविणे

* चित्रे दाखवून ओळखण्यास सांगणे.

* पाने, फुले, फळे जमविणे.

* परिसरातील प्राणी व पक्ष्यांची नांवे सांगणे.

* बडबडगीते तोंडपाठ करणे.

* परिसरातील प्राणी व पक्ष्यांची नावे सांगणे.

 * पाठ्यपुस्तकातील घटकास अनुसरुन चित्रे जमविणे.

* बडबडगीते तोंडपाठ करणे.

* चित्रे दाखवून ओळखण्यास सांगणे.  चित्रावर आधारित गोष्ट तयार करणे.

* उपयोगी परिसरातील प्राणी चित्रे व उपयोग

* परिसरातील विविध स्थळांची माहिती.

* वाढदिवस, सहल प्रसंगाचे वर्णन .

* कथा व कवितांचा संग्रह करणे.

* सार्वजनिक ठिकाणे, दुकाने इ.ठिकाणच्या नामफलकावरील सुचनांचा संग्रह 

* वृत्तपत्र कात्रणांचा संग्रह करणे. .

• नेहमी चुकणारे शब्द व त्यांचा संग्रह करणे.

* निवडक उतार्यांचा संग्रह करणे.

* भाषिक खेळ व शब्द कोडी तयार करणे.

* स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांचे फोटो जमविणे.

* शहर व खेडे येथील जीवनावर आधारित चित्रे जमवा.

* गावातील पुढीलपैकी एका व्यक्तीची भेट घेऊन माहिती मिळवा. शेतकरी, दुकान तलाठी, शिक्षिका

* देशभक्तीपर गीतांचा संग्रह करा.

• विरुद्धार्थी व समानार्थी शब्दांचा संग्रह करणे.

* विविध पत्राचे नमुने जमा करणे.

* अवांतर वाचन करून नवे शब्द संकलित करणे.

 * पाऊस विषयावरील कविता / चित्रांचा संग्रह करणे.

* शेतीबद्दलच्या गाण्यांचा संग्रह करणे.

* पाळीव प्राणी व त्यांचे उपयोग तक्ता /चित्रसंग्रह. तुळस व अन्य औषधी वनस्पतींची माहिती मिळवा.

* आपल्या गावातील पोळा सणाचे वर्णन करा.

* आईच्या प्रेमाची महती सांगणाऱ्या कवितांचा संग्रह करा.. 

* वेगवेगळ्या पाठात आलेल्या म्हणींचा संग्रह करा.

गणित -:

* दिलेल्या वस्तूतून लहान-मोठा ठरविणे.

* तराजूच्या सहाय्याने जड-हलके ओळखणे.

* आधी व नंतर घटनांची यादी करणे.

* कमी जास्त ओळखणे.

* चित्रांच्या सहाय्याने स्थान ओळखता येणे.

* परिसरातील वस्तूंचे प्रकारानुसार वर्गीकरण.

* सारखे रुप असणाऱ्या वस्तूंच्या जोड्या.

* नाण्यांचा व नोटांचा संग्रह करणे.

* पुठ्याचे विविध आकार तयार करणे .अर्धा , पाव

* दुकानास भेट देऊन व्यवहार करणे .

* आलेख कागदावर विविध आकार रेखाटा.

* बिलाच्या विविध पावत्यांचा संग्रह करणे

* विविध भौमितिक आकृत्यांची प्रतीकृती बनविणे.

* व्याख्या, सुत्र व नियमांचे संकलन करणे.

सामान्य विज्ञान -:

* परिसरातील सजीव व निर्जीव यादी करणे चित्रे जमविणे.
* परिसरातील सजीव प्राणी चित्रे जमविणे व वैशिष्ठे जमविणे. 

* परिसरातील वृक्ष व त्यांचे अवयव.

* परिसरातील प्राणी व पक्षी यांचे निवासस्थान,

* कोण काय खातो ?

* आपले शरीर संबंधित चित्रे व अवयवांचे उपयोग,

* आपल्या अन्नातील पोषक घटक.

* परिसरातील सजीव व निर्जीव यादी करणे -चित्रे जमविणे.

* परिसरातील वृक्ष व त्यांचे अवयव.

* आपले शरीर -संबंधित चित्रे व अवयवांचे उपयोग 

* चांगल्या सवयींची यादी 

 * पाण्यात विरघळणारे व न विरघळणारे पदार्थ यांची यादी.

 * प्राण्यांचे अवयव व त्यांचे उपयोग  चित्रासह 

 * ज्ञानेंद्रिये - चित्रे व त्यांचे कार्य

 * वनस्पतींच्या विविध अवयवांची कार्य 

 * बियांचा संग्रह व त्यांचे निरीक्षण 

* परिसरातील औषधी वनस्पतींची यादी व उपयोग .

* उपयुक्त प्राण्यांच्या चित्रांचा संग्रह व उपयोग 

* मातीचे प्रकार व नमुने संग्रह ,

घरातील व शाळेतील स्वच्छता विषयक सवयींची यादी.

* शाळेचा परिसर स्वच्छ राहण्यासाठी उपक्रमांची यादी करा

* पारंपारिक व अपारंपारिक ऊर्जास्त्रोतांची माहिती 

* शास्त्रज्ञांची नावे व लावलेले शोध तक्ता 

* वीस अन्नपदार्थांची यादी करा.त्यांचे चव व अवस्था नोंदवा.

* पदार्थाची स्थायू ,द्रव ,वायू गटात विभागणी 

* गावातील पाणीपुरवठा केंद्राला भेट देऊन माहिती गोळा करा.

पृष्ठवंशीय व अपृष्ठवंशीय प्राण्यांची चित्रे जमवा.

* हवा प्रदुषण व पाणी प्रदुषण याविषयी माहिती संकलित करा

* शेतीच्या औजारांची माहिती व उपयोग यांची माहिती संकलित करा.

* परिसरातील विविध वनस्पतींचे निरीक्षण करून साम्य व फरक लिहा.

* परिसरातील प्राण्यांचे निरीक्षण करा.
तक्ता वनस्पती / प्राणी, अनुकुलन उपयोग चार्ट वनस्पतीवर आढळणारे किटक, प्राणी यांचे निरीक्षण

* गहू व घेवड्याच्या अंकुराचे निरीक्षण प्राणी व परिसराशी अनुकूलन यांची यादी करा

* पाठाखालील 'ओळखा पाहू' यांचा संग्रह. आपल्या शरीरातील अवयव व त्यांचे उपयोग.

* जीवनसत्व' यादी तक्ता.

आहार संतुलित आहे का ? ' तक्ता भरणे पुस्तकातील शब्द कोडे सोडवून त्यांचा संग्रह करणे. 

* शाळेच्या आसपास विक्रीसाठी असलेले खाद्यपदार्थांची यादीकरुन झाकलेले
न झाकलेले असे वर्गीकरण करा.

* रोगप्रतिबंधक लसीकरण कार्डची माहिती मिळवा.

* 'आदर्श गांव' संकल्पना साठी यादी करा.

* शाळेचा परिसर स्वच्छ राहण्यासाठी उपक्रमांची यादी करा.

* नैसर्गिक साधन संपत्ती तक्ता

इतिहास व ना.शास्त्र  -:

* दळणवळणाच्या साधनांची नावे व चित्रे 

* ग्रामपंचायतीस भेट देऊन कारभाराची माहिती घेणे 

* संतांची चित्रे व माहिती 

* शिवरायांच्या बालपणातील घटनांचा संग्रह 

* विविध देशांच्या राजमुद्रा व ध्वजांचा संग्रह

* अश्मयुगीन हत्यारांची यादी करा,चित्रे मिळवा.

* शेतीच्या आधुनिक पद्धतीची माहिती .

* जहाजांची चित्रे जमवा.

* गड व किल्ले यांची चित्रे जमवा.माहिती संकलित करा.

* देशात बोलल्या जाणाऱ्या प्रमुख भाषा व राज्ये यांची यादी करा.

* हक्क व कर्तव्य यांचा तक्ता तयार करा.

* समाजसुधारकांची चित्रे व त्यांच्या कार्याची माहिती संकलित करा

भूगोल -:

* आपल्या परिसरातील विविध भूरुपांची माहिती 

* ऋतू ,महिने व पिके यांचा तक्ता .

 * परिसर भेट - नदी ,कारखाना .

* गावातील पाणीपुरवठा योजनेची माहिती 

* परिसरातील पिके व त्यांचा हंगाम

* शेतीस भेट व कामाचे निरीक्षण 

* गावाजवळील धरणाला भेट देऊन माहिती संकलित करणे 

 * खनिज व खडकांचे नमुने गोळा करणे 

* विविध धान्यांचे नमुने जमवा.

* परिसरातील प्रदुषणाची कारणे - यादी करा.

* गावच्या बाजाराला भेट द्या .वस्तूंची यादी करा. 

* विविध देशांचे नकाशे संग्रहीत करा

* नकाशा वाचन जिल्हा तालुका गांव.
आपल्या परिसरातील विविध भूरूपांची माहिती.

* विविध भूरूपे प्रतिकृति व चित्रे.
ओढा व नदीचे निरीक्षण,

* ऋतू, महिने व पिके याचा तक्ता.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad