१०० दिवसांकरिता वाचन अभियान
आठवडा 10 सुरू
सोमवार ते शुक्रवार
इयत्ता पहिली ते इयत्ता आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्याकरिता जानेवारी २०२२ ते एप्रिल २०२२ या कालावधीत १०० दिवसांकरिता वाचन अभियान (100 days Reading Campaign) राबविण्यात येणार आहे
आठवडा 10
वर्ग पहिली व दुसरी
चला काहीतरी बनवूया
शिक्षक/ पालक मुलाना वर्गात अग्नीचा वापर न करता काही साधे खाद्यपदार्थ तयार करायला लावणे. उदा: भेळ, सरबत इ. आणि विद्यार्थ्याना गटाद्वारे त्यासबंधी पाककृतीचे पुस्तक तयार करण्यास सांगणे.
विद्यार्थी त्यांचे पाककृती पुस्तक वर्गात वाचू शकतात.
आठवडा 10
वर्ग तिसरी ते पाचवी
माझी गोष्ट माझ्या शब्दात (मेरी कहानी, मेरी जुबानी)
• प्रत्येक विद्यार्थी नदी, झाड, गव्हाचे रोप इत्यादी गोष्टींची भूमिका/ओळख घेणे आणि त्यांच्या भूमिकेत जाऊन त्यांचा जीवन प्रवास सादर करणे
आजी आजोबांच्या गोष्टी
• शिक्षक विद्यार्थ्यांना त्यांच्या आजी-आजोबांनी सांगितलेली एक कथा-कथन करण्यास/लिहिण्यास सांगतील आणि त्यातून ते काय शिकले हे विचारतील.
• प्रत्येक विद्यार्थी ती कथा वर्गात वाचून दाखवतील.
• त्यानंतर ते असा कोणताही संग्रह वाचू शकतात (उदा. सुधा मूर्ती -आजीची कथांची बॅग)
आठवडा 10
वर्ग सहावी ते आठवी
स्थानिक भाज्यासाठी फळे शोध .
२०२१ हे वर्ष संयुक्त राष्ट्रांनी फळे आणि भाज्यांचे वर्ष म्हणून घोषित केले आहे.
• विद्यार्थ्यांना स्थानिक फळे आणि भाजीपाला त्यांचे वाण आणि विशेष वैशिष्ठ्ये याविषयी आठवडाभरात माहिती शोधण्याचे काम दिले जावे (ग्रंथालय आणि संगणक कालावधी दरम्यान)
• विज्ञान शिक्षक गोळा केलेल्या साहित्याची तपासणी करतात. या थीमवर काही अधिक संबंधित साहित्य वाचनास द्यावे.

आपली प्रतिक्रिया व सूचना