शाळेची संचमान्यता आधार क्रमांक
आधारित होणार
शैक्षणिक वर्ष सन २०२१-२०२२ ची संचमान्यता आधार क्रमांकाच्या आधारे करण्याचे शासनाने संदर्भिय पत्रान्वये निर्देश दिलेले आहेत
त्यानुसार, राज्यातील सर्व शाळांची तात्पुरती (Interim) संचमान्यता दिनांक ३०/१२/२०२१ रोजीच्या आधार क्रमांक नोंद असलेल्या विद्यार्थी संख्येच्या आधारे करण्यात आलेली आहे. सद्यस्थितीस राज्यात आधार क्रमांक असलेली विद्यार्थी संख्या ८७% असून सर्व १००% विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक काढण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Aadhaar Card Based Sanch Manyata
१. दिनांक ३०/१२/२०२१ रोजीच्या शाळेच्या पटावर नोंद असलेले परंतु सरल प्रणालीमध्ये आधार क्रमांक नसलेल्या विद्यार्थ्यांचे दिनांक ३१/०३/२०२२ पर्यंत आधार क्रमांक अपडेट झाल्यानंतर आधार क्रमांक नोंद केलेले विद्यार्थी संच मान्यतेकरीता ग्राहय धरण्यात यावेत.
२. डुप्लीकेट (Duplicate) आधार क्रमांक असलेल्या विद्यार्थ्यांचा डेटा (Data) शाळास्तरावर Student Portal दुरुस्त करण्याची कार्यवाही करावी व डुप्लीकेट (Duplicate) आधार क्रमांक राहणार नाहीत याची खात्री करावी.
३. नाव, लिंग किंवा जन्मतारीख जुळत नसलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत अशा विद्यार्थ्यांची शाळेत असलेली नोंद व विद्यार्थ्याची प्रत्यक्ष शाळेत उपस्थित असल्याची खात्री करुन व सदर विद्यार्थी जवळपासच्या अन्य शाळांमध्ये दाखवले गेले नाहीत याची शहानिशा करून असे विद्यार्थी संबंधित शाळेच्या संचमान्यतेकरीता ग्राह्य धरण्यात यावेत.
४. ज्या विद्यार्थ्याने आधार क्रमांकासाठी नोंदणी केली आहे परंतु अद्यापपर्यंत आधार क्रमांक मिळालेला नाही असे विद्यार्थी संबंधित शाळेत नियमित येत असल्याची व सदर विद्यार्थी जवळपासच्या अन्य शाळांमध्ये दाखवले गेले नाहीत याची शहानिशा करुन असे विद्यार्थी संचमान्यतेसाठी ग्राहय धरण्यात यावेत.
५. ज्या विद्यार्थ्याकडे आधार क्रमांक उपलब्ध नाही व त्याने आधार क्रमांकासाठी नोंदणी देखील केलेली नाही असे विद्यार्थी संबंधित शाळेत नियमित येत असल्याची व सदर विद्यार्थी जवळपासच्या अन्य शाळांमध्ये दाखवले गेले नाहीत याची शहानिशा करुन असे विद्यार्थी संचमान्यतेसाठी ग्राहय धरण्यात यावेत.
६. वरील क्र. १ ते ५ मध्ये दर्शविण्यात आल्यानुसार सर्व शाळांची पडताळणी समितीमार्फत करण्यात यावी.
६.१ सदर पडताळणीकरीता संपूर्ण राज्यामध्ये पुढीलप्रमाणे पडताळणी समिती असेल.
1. शिक्षण विस्तार अधिकारी संबंधित बीट स्तर [ समिती प्रमुख ]
॥ केंद्र प्रमुख संबंधित केंद्र / मनपा, नपा क्षेत्रातील प्रभाग अधिकारी / प्रशासन अधिकारी संबंधित कार्यक्षेत्र [सदस्य सचिव ]
॥ अंगणवाडी पर्यवेक्षिका संबंधित कार्यक्षेत्र [सदस्य]
IV. आरोग्य कर्मचारी संबंधित कार्यक्षेत्र [सदस्य]
६.२ वरील समितीने केंद्रातील प्रत्येक शाळेस समक्ष भेट देवून सर्व विद्यार्थ्यांची खात्री दिनांक ३१/०३/२०२२ पर्यंत करावी व या पत्रासोबतच्या नमुन्यात प्रमाणपत्र गटशिक्षणाधिकारी / प्रभाग अधिकारी / प्रशासन अधिकारी यांचेकडे सादर करावे. त्याची एक प्रत केंद्र शाळेवर जतन करुन ठेवावी.
६.३ सदरील प्रमाणपत्र व विहीत माहिती सरल पोर्टलवरील केंद्र प्रमुख यांच्या लॉगीनवरुन अपलोड / नोंद करण्याची सुविधा देण्यात येईल त्यावेळी अपलोड करावे.
६.४ गटशिक्षणाधिकारी / प्रभाग अधिकारी / प्रशासन अधिकारी यांनी सरल पोर्टलवर पटाची खात्री दिनांक ०५/०४/२०२२ पर्यंत अंतिम करावी.
६.५ वरील प्रमाणे सुविधा ही केवळ शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ साठी लागू राहील.
७. संच मान्यता अंतिम झाल्यानंतर प्रचलित शासन निर्णय / परिपत्रकानुसार ऑफलाईन पद्धतीने समुपदेशन घेऊन अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन दिनांक ३१/०५/२०२२ पूर्वी करावे.
शासन परिपत्रक नुसार दिनांक 31 मार्चपर्यंत STUDENT PORTAL वर विद्यार्थ्यांची आधार संबंधी जी माहिती भरलेली आहे त्यानुसार संचमान्यता होणार आहे.
परंतु काही शाळांमध्ये काही विद्यार्थ्यांचे आधार कार्ड नसतील तरीही काळजी करण्याचे कारण नाही. वरील पत्रात नमूद केलेल्या पडताळणी समितीमार्फत शाळेतील पटसंख्येची खात्री केली जाणार आहे व त्यानुसार आधार कार्ड नसले तरीही ते विद्यार्थी संच मान्यतेसाठी ग्राह्य धरले जाणार आहे

आपली प्रतिक्रिया व सूचना