Summer Vacation And New Academic Year Schedule

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व

उच्च माध्यमिक शाळांची सन २०२२

ची उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष सन

२०२२-२३ सुरू करणेबाबत

! शासन निर्णय

विद्यार्थ्यांकरिता महत्वाची बातमी

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यातील इयत्ता १ ली ते ९ वी व इयत्ता ११ वी च्या शाळा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास तसेच शाळांची वेळ व कार्यकाळाबाबत संदर्भीय शासन परिपत्रकान्वये सूचना देण्यात आलेल्या आहेत.

एकवाक्यता व सुसंगती

Maharashtra School
संपूर्ण राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी सन २०२२ ची उन्हाळी सुट्टी व आगामी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये शाळा सुरू करण्याबाबत शासन स्तरावरून निर्णय घेण्याची बाब विचाराधीन होती.

उन्हाळी सुट्टी जाहीर व शाळा सुरू

१) सोमवार दिनांक ०२ मे, २०२२ पासून उन्हाळी सुट्टी लागू करून सदर सुट्टीचा कालावधी रविवार दिनांक १२ जून, २०२२ पर्यंत ग्राहय धरण्यात येवून पुढील शैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ मध्ये दुसरा सोमवार दिनांक १३ जून, २०२२ रोजी नवीन सत्रात शाळा सुरू करण्यात येतील, राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने परीपत्रक जाहीर करत माहीती दिली आहे.

तसेच जून महिन्यातील विदर्भाचे तापमान जास्त असल्याने तसेच विद्यार्थ्यांचे आरोग्य दृष्टीने विचारात घेता उन्हाळयाच्या सुट्टी नंतर नवीन सत्रात विदर्भातील शाळा चौथा सोमवार दिनांक २७ जून, २०२२ रोजी सुरू होतील, राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने परीपत्रक जाहीर करत माहीती दिली आहे

निकाल नियोजन

२) इयत्ता १ ली ते ९ वी व ११ वी चा निकाल दिनांक ३० एप्रिल, २०२२ रोजी अथवा त्यानंतर सुट्टीच्या कालावधीत लावता येईल, तथापि तो निकाल विद्यार्थी/पालकांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी संबंधीत शाळेची राहील.

सुट्टीचे समायोजन

३) शाळांतून उन्हाळयाची व दिवाळीची दीर्घ सुट्टी कमी करून त्याऐवजी गणेशोत्सव अगर नाताळ यासारख्या सणांचे प्रसंगी ती समायोजनाने संबंधित जिल्हयाच्या शिक्षण अधिकारी (प्राथमिक / माध्यमिक) यांच्या परवानगीने घ्यावी.

४) माध्यमिक शाळा संहिता नियम ५२.२ नुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकूण सुट्टया ७६ दिवसापेक्षा जास्त होणार नाहीत, याची दक्षता घेण्यात यावी.

५) आगामी शैक्षणिक वर्षापासून यापुढे दरवर्षी राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा जून महिन्यातील दुसऱ्या सोमवारी (त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतरचा दिवस) 

विदर्भातील शाळा

तसेच विदर्भातील तापमान विचारात घेता जून महिन्यातील चौथ्या सोमवारी (त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतरचा दिवस) जी तारीख असेल त्या तारखेपासून शाळा सुरू होतील.

अशाप्रकारे शासनाचे परिपत्रक निर्गमित करण्यात आले 

या शासनाचे परिपत्रकामुळे शिक्षक विद्यार्थी पालक यांचा संभ्रम दूर झाली आहे

शासनाचे परिपत्रकानुसार उन्हाळी सुट्टी वेळापत्रक व नवीन शैक्षणिक सत्र सुरुवात यासंदर्भात आता परिपूर्ण माहिती मिळाली आहे

शाळा पूर्वतयारी अभियान

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad